काय करू नये??

एक चांगला गुंतवणूकदार केवळ चांगली गुंतवणूकच करत नाही तर तो चूका टाळतो, गुंतवणूकीच्या नावाखाली चालणा-या ट्रॅपमधे फसत नाही, भुलथापांना बळी पडत नाही व अभ्यासपूर्ण निर्णय घेतो. पण केवळ इतकेच पुरेसे नाही. अनेकदा गुंतवणूकदार मानसीक चुका करतात ज्यामूळे नुकसान करून घेतात. ह्यासाठी काय करू नये ह्याची ही सूची : नवीन गुंतवणूकदारासाठी IPO हाच उत्तम व कायमस्वरूपी पर्याय आहे कंपन्यांना आपले शेअर्स किती मूल्याने विकायचे आहे याचा अधिकार असल्याने IPO तील खरेदीत आपल्या अपेक्षेएवढा फायदा होताच विक्री करणे उचित.  माझ्या ब्रोकरने टीप दिली आहे! शेवटी ब्रोकर हा माणूस आहे, चूक होऊ शकते. टिप देताना ब्रोकरने कधी दिली व तुम्हाला ती कधी मिळाली,…

आदर्श पोर्टफोलिओ

पोर्टफोलिओमधे खूप वैविध्य असेल तर फायदा होतोच असे नाही. योग्य सल्लागाराकडून पोर्टफोलिओ बनवून घेतल्यास चांगल्या प्रमाणात प्राप्ती होऊ शकते. खालील पोर्टफोलिओ पहा : फ्युचर्स आणि ऑप्शन्स या मार्केटचे वैशिष्टय म्हणजे कमी पैसे असताना १०% ते १५% मार्जिनवर आपण शेअर्सचे लॉट खरेदी करू शकतो व आपला फायदा द्विगुणीत होऊ शकतो. खरेदीच्या पवित्र्याला Long Position व विक्रीच्या पवित्र्याला Short Position म्हणतात. महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ह्या पोझिशन्स ऑटो स्क्वेअर ऑफ होऊ शकतात. ह्या व्यवहारामधे लागणारे कर बरेच कमी आहेत.

रिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड

युनोच्या लोकसंख्या वाढीच्या अभ्यासानुसार माणसाचे सरासरी आयुष्य हे २०५० पर्यंत ७५ वर्षे होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाढत्या माहागाइला तोंड देण्यासाठी आपले उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न हे करावेच लागतात. सेवानिवृत्ती नंतरचे नियोजन तर अपरिहार्य आहे. हा विषय लक्षात घेऊन युटिआय ने एक निवृत्ति विशेष योजना साकारली आहे. तिची वैशिष्ठे खालील प्रमाणे :यामधे दरमहा किमान रु. ५०० भरणे आवश्यक आहे.यामधून मिळणाऱ्या परताव्याचा व्याजदर हा साधारणतः ११% पेक्षा जास्त (CAGR) चक्रवाढीसह मिळू शकतो.वर्षात एकूण जमा रकमेवर 80 c अंतर्गत करसवलत प्राप्त होते.भरलेली रक्कम ५ वर्षानंतर केव्हाही काढता येते. यामधे गुंतवणुकीसाठी कमाल वयोमर्यादा नाही.यामधे online व अॅपद्वारे सुध्दा गुंतवणूक करता येते.बँकेद्वारे एकदा सूचना देऊन पैसे…

चॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड

‘युनिट ट्रस्ट’ या म्युच्युअल फंडामधे धर्मादाय संस्था किंवा गृहनिर्माण संस्था आपला निधी ठेऊ शकतात. हे खाते उघडण्यासाठी संस्थेकडे फक्त स्वतःचे पॅन कार्ड व बँक खाते असणे आवश्यक असते. यामधे मिळणारे व्याज हे बॅंकेतर्फे मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असल्याने संस्थेचा अंतिमतः फायदा होतो. तसेच अशा फंडामधे निधी गुंतवणे हे लेखापरिक्षकाच्या दृष्टीने चुकीचे होत नाही. या खात्यात असलेला निधी हा केव्हाही काढणे शक्य असते.

व्याजरहीत (0%) कर्ज योजना

हीयोजना कुठल्या कंपनीची किंवा बॅंकेची नसून श्री प्रदीप जोशी ह्यांच्या संकल्पनेतून साकारलेली अफलातून योजना आहे. ह्यामुळे कोणतेही दीर्घ मुदतीचे कर्ज 0% व्याजदराने वापरता येउ शकते, केवळ नियोजनाच्या माध्यमातून.उदाहरण :-समजा तुम्ही रु. १० लाख रुपयांचे कर्ज २० वर्ष मुदतीने ९.५% व्याजाने घेतले आहेत्याचा मासिक हप्ता रु. ९,३२१/- आहेम्हणून २० वर्षात तुम्ही :मुळ कर्ज – रु. १० लाखव्याज – रु. १२.३७ लाखअसे एकूण रु. २२.३७ लाख रुपये परत देता.तुमचे व्याज परत मिळविण्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या कर्ज रकमेपैकी ०.१०% रक्कम SIP मधे गुंतवा.इथे तुमचे रु. १० लाख कर्ज आहे म्हणजेच ०.१०% रक्कम होते रु. १०००.ही रु. १००० ची SIP २० वर्षासाठी Equity किंवा…

युनीट लिंक इन्शुरन्स प्लान

युटीआय म्युच्युअल फंडा तर्फे सर्वात जुनी परंतू परताव्यात सातत्य असणारी युलिप (Unit Link Insurance Plan) ही एक अत्यंत सुंदर अशी योजना आहे. ज्यांना जीवन विमा संरक्षणासह भांडवल वृध्दिचाही लाभ अपेक्षित आहे अशा सर्वांसाठी ही अत्यंत सुंदर अशी योजना आहे. गेली ४५ वर्षे ही योजना कार्यान्वित असून यामध्ये मिळणाऱ्या परताव्याचा दर हा ११% पेक्षा जास्तही राहू शकतो. याच नावाने अन्य फंड घराण्यांनी सुरु केलेल्या योजनांद्वारे मिळणारा परतावा थोडाफार कमी आहे हेही निदर्शनास आले आहे. वय वर्ष १२ ते ५५ १/२ पर्यंतची कोणतीही व्यक्ती किमान रु. ५०० भरून यामधे सहभागी होऊ शकते व या सदस्याला १५ वर्षांपर्यंत रु. ९०,००० किमान संरक्षण प्राप्त होते.…

नेशनल पेन्शन स्कीम

युनोच्या लोकसंख्यावाढीच्या अभ्यासानुसार माणसाचे सरासरी आयुष्य हे २०५० पर्यंत ७५ वर्षे होणार आहे.त्यामुळे प्रत्येकाला वाढत्या माहागाईला तोंड देण्यासाठी आपले उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न हे करावेच लागतात. राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना ही सर्वांसाठी सन २००८ पासून सुरु झाली असून केंद्र सरकार सन २०१७/२०१८ पर्यंत काही रक्कम प्रोत्साहन म्हणून हे खाते उघडणाऱ्या व्यक्तीला देणार आहे.हे खाते उघडणाऱ्या प्रत्येकाला Permenent Retirement Account Number (PRAN) प्राप्त होतो व तो कायमस्वरूपी राहतो.यामधे Tier I Account व Tire II Account अशी दोन प्रकारची खाती असतात. Tire I मधून भरलेले पैसे निवृत्ती पर्यंत काढण्याचा पर्याय नसतो. Titre II साठी अधून मधून पैसे काढणे शक्य असते, तथापि यात करसवलत मिळत…

इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम

आजकाल सामान्य नोकरदार सुध्दा भरघोस पगारामुळे Income Tax भरणा करण्याच्या छत्राखाली येऊ शकतो. गेल्या वर्षी किंवा याही वर्षी करभरणा करण्याच्या स्लॅबमध्ये भरघोस सवलत मिळेल असे वाटत होते पण...... इन्कमटॅक्स Act कलम 80 C अंतर्गत आपण विविध योजनांमधे रु. १.५० लाख पर्यंतची गुंतवणूक केल्यास तेवढी रक्कम आपणास “कर सवलत” या सदराखाली गृहीत धरता येते हे जवळ जवळ सर्वांना माहिती आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी कोणीही पगारदार व्यक्ती ही सवलत घेण्यासाठी PPF खाते, N.S.C किंवा जीवन विमा फार झाले तर ५ वर्षे बँकेतील ठेवी यामधे गुंतवणूक करून ही सवलत प्राप्त करून घेतो. पण या बचतीतून म्हणावा तेवढा परतावा मुदतींती मिळत नाही व काही…

सुकन्या समृद्धि योजना

भारतात अजूनही स्त्रीभ्रूणहत्या होते. मुलगी जन्मली की एक, दोन दिवसात अर्भकाची हत्या करण्याचे प्रकार होतात. मग अशा घटना थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२- जानेवारी- २०१५ रोजी “सुकन्या समृध्दी योजना” ही योजना सुरु केली आहे.या अंतर्गत मुलीच्या पालकांनी मुलीच्या वयाच्या दहा वर्षापूर्वी कमीत कमी रु. १००० deposit ठेवून पोस्ट ऑफिस किंवा बॅंकेत असे खाते उघडावे. समजा पाच वर्ष वयाच्या मुलीच्या नावाने दरमहा रु. १००० ठेव जमा केली तर दरवर्षी रु. १२००० प्रमाणे १४ वर्षात रु. १,६०,००० होतील यावर व्याजासह रु. ६,३१,००० मिळू शकतात. यावर ९% पेक्षा जास्त व्याजदर आहे. याचे व्याज करमुक्त आहे.मुलीच्या लग्नापर्यंत किंवा वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत हे खाते…

बाल भविष्य योजना

सध्याच्या काळात आपल्या मुलांचे शिक्षणरुपी भविष्य पूर्ण करण्यासाठी आपण अपेक्षा करतो त्यपेक्षाही कितीतरी जास्त पैसा लागू शकतो. K. G. तील प्रवेशापासून ते अभियांत्रिकी वा वैद्यकीय शिक्षणासाठीच्या खर्चात सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी आपण बाळाचे भवितव्य उज्वल होण्यासाठी “UTI- Children’s Carrier Plan” या योजनेद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. ही योजना १९७३ पासून सुरु करण्यात आली असून अत्यंत चांगला परतावा आतापर्यंत या योजनेतून अनेकांनी घेतला आहे. ही एक म्युच्युअल फंडावर आधारित योजना आहे. म्युच्युअल फंड मॅनेजर हे पैसे ६०% डेट फंड व ४०% इक्विटी फंडात गुंतवितो. यामधे दरमहा रु. १००० गुंतविल्यास त्याचे बाल सज्ञान होईपर्यंत (वय वर्ष १८…

End of content

No more pages to load