तरुणाईसाठी!!

  pocket money पासून credit कार्ड मिळेपर्यंतचा प्रवास हा तरुणाईचा एक uptrend असतो . म्हणजेच शाळा , - कॉलेज ,- उच्चशिक्षण व प्लेसमेंट हाच तो प्रवाह होय ! पण एकदा का नोकरी लागली कि बर्याच जणांना अनावश्यक वस्तू खरेदीचा मोह आवरत नाही व हाती credit कार्ड आल्यावर तर खरेदी होतच राहते .पण हीच ती वेळ व हाच तो क्षण असतो की ज्यावेळी अनावश्यक खरेदी थांबवून बचतीची सवय लावून नियोजनबद्ध गुंतवणुकीची सवय अंगीकारण्याचा !! दरमहाचे बारीक सारीक खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून जे पैसे शिल्लक राहातील त्याचे short term goal, medium term goal , long term goal , व आपली निवृत्ती याचे…

एक हजारात दहा लक्ष !!

  मराठीमध्ये  "लाखाचे बाराहजार करणे " अशी   एक जुनी म्हण आहे. म्हणूनच या लेखाचे शीर्षक "एक हजारात दहा लक्ष" असे वाचकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी ठेवले असावे असे आपल्याला वाटेलच . पण नाही , ही खरेच वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच कमाल आहे एका म्युच्युअल फंडाची!! reliance growth या फंडामध्ये ८ऑक्टोबर १९९५ रोजी ज्यांनी एक हजार रुपये ठेवले त्यांना आज रोजी दहा लक्ष रुपये मिळाले आहेत !! बावीस वर्षातील ही या फंडामधील वाढ आहे.पण फार थोड्या लोकांना हा फायदा घेता आला आहे .कारण त्यांच्याकडे थांबून दीर्घावधीमधील आपल्या गुंतवणुकीची वाढ पाहण्याचा " पेशन्स " नव्हता . आपल्यापैकी अनेकांकाकडे तो नाही . या…

जीवनशैली

आपले उत्पन्न व खर्च यावर अवलंबून असते तीच आपली जीवनशैली असे सर्वसाधारणतः म्हटले जाते. माणूस किंवा कुटुंब कितीही मिळवते असले तरी त्यांचे खर्च उत्पन्न नुसार वाढतेच असतात. काहीजण आपले खर्च कसेही करतात व राहिली शिल्लक तर त्याला बचत संबोधून त्याची आवश्यकतेनुसार गुंतवणूक करतात. बचत वाढवण्याचा एक सोपा उपाय सांगतो, दर महिन्याला आपण करीत असलेले खर्च विभागणीवार लिहावेत. म्हणजेच किराणा/घरखर्च/गाडीखर्च/विमा हप्ते/आवर्त ठेवी/मुलांचे शिक्षण/वीज बिल/पाणी बिल अशा स्वरूपात त्याची विभागणी करावी. हल्ली स्मार्ट फोनमध्ये ही विभागणी करून खर्च लिहिण्यासाठी अॅप्स सुध्दा उपलब्ध आहेत. दोन ते तीन महिने जसे आहे तसे खर्च लिहिल्यास आपण या सर्व खर्चाच्या विभागणीचा आढावा घेऊ शकतो. व गाडीचा…

गरज अर्थसाक्षरतेची

  सन १९९० मध्ये मी चिपळूणला असताना आमच्या शेजारी पोस्ट ऑफिस होते व तेथील पोस्टमास्तर माझ्याकडे बचतीचा मंत्र सांगण्यासाठी आले . त्यांनी दरमहा रू. ५०० / - ची NSC तुम्ही सुरु करावी असे सांगून ६ वर्षात ही रक्कम दुप्पट होईल त्याची पुनर्गुंतवणूक ४ वेळा  त्याच योजनेत करावी आणि निवृत्तीच्या  वेळी या परताव्याची रक्कम अतिरिक्त निवृत्तीवेतन म्हणून आपणास मिळू शकेल असे सांगितले . त्यांची योजना स्वीकारून मी सहा वर्षे दरमहा रू.  ५०० /- ची NSC घेऊ लागलो . पण नंतर व्याजदर कमी कमी होत गेले , माझी चिपळूण येथून बदलीही झाली , व सर्वात महत्वाचे म्हणजे पोस्टल सेवेतील दिरंगाईमुळे ही मूळ…

संतुलन

संतुलन -- बॅलन्स्ड फंडकोठेही कोणत्याही माणसाचा जीवनात परिपूर्ण संतुलन साधण्याचा प्रयत्न असतो.कामाच्या ठिकाणी संतुलित वातावरण, नातेसंबंधात संतुलन जसे आवश्यक तसे, आपल्या कष्टाचा पैसा जेथे गुंतवतो तेथे संतुलन हवेच.बॅलन्स्ड फंड म्हणजे बाजारातील उलथापालथीत किंवा वादळवाऱ्यात तग धरून राहण्यासाठी गुंतवणूक सुरक्षित ठेवणे याच्याशीच संलग्न आहे. यामध्ये “ वृध्दी ” होण्याच्या दृष्टीकोनातून किमान जोखीम ठेवण्याचे संतुलन फंड मॅनेजर राखतो.यामध्ये वृद्धीच्या दृष्टीने ६०% ते ७०% गुंतवणूक समभागात असते व ३०% ते ४०% गुंतवणूक रोख्यामध्ये ठेवली जाते.बाजार तेजीत असताना मोठे समभाग घेऊन फायदा मिळविला जातो व जेव्हा मंदी सुरु असते तेव्हा हा फायदा रोख्यामध्ये गुंतवून जोखीम कमी केली जाते हा फेरबदल बाजाराच्या स्थितीवर केला जातो.या…

पतपेढ्यांसाठी फंड

आपल्या भागात अनेक पतपेढ्या चांगल्या रितीने कार्यरत आहेत. बऱ्याच पतपेढ्या कर्जमागणीचा पुरवठा करण्यासाठी आपल्याकडील ठेवी चालू खाते (Current Account) मध्ये ठेवतात व त्यावर त्यांना काहीही व्याज मिळत नाही. तसेच जर ही रक्कम ६ महिन्यांच्या किंवा वर्षभराच्या कालावधीसाठी Fix Deposit मध्ये ठेवली तर कर्जमागणी झाल्यावर ह्या Fix Deposits मोडाव्या लागतात किंवा त्यावर Overdraft घ्यावा लागतो व याद्वारे पतपेढ्यांचे किमान २% पर्यंत नुकसान होऊ शकते.तथापि जर ही रक्कम G. Sec फंड किंवा Floating Rate फंड मध्ये ठेवल्यास त्यावर दरदिवशी व्याज प्राप्ती होऊ शकते व संस्थेचा फायदा होतो. साधारणतः हे व्याज ७% ते ८% पर्यंत असते. हा व्याजदर चक्रवाढ पद्धतीचा असतो हेही तितकेच…

दीर्घ मुदत योजना

UTI LONG TERM ADVANTAGE FUND SERIES V सर्व म्युच्युअल फंड घराणी अशा प्रकारच्या विविध योजना विक्रीसाठी वेळोवेळी बाजारात आणत असतात. सर्वसाधारणतः त्यामधे ‘भरलेली रक्कम ही तीन वर्षापर्यंत काढता येत नाही.’ तथापि मिळणारी रक्कम ही “टॅक्स फ्री” असते व पैसे जमा करणे किंवा काढणे या सर्व बाबी आधुनिक सोई सुविधा वापरून- Mobile App व्दारे सुध्दा करणे शक्य आहे. ही युटीआय तर्फे सुरु असलेली 80 C अंतर्गत सवलत देणारी मार्केटलिंक योजना आहे.यात भरलेले पैसे तीन वर्षे काढता येत नाहीत. पण ही योजना तीन ते दहा वर्षापर्यंत सुरु राहते .अशा प्रकारच्या अनेक योजना सर्व म्युच्युअल फंड हाउसेस NFO या प्रकाराखाली आणत असतात. 

कन्यादान योजना

LIC ऑफ इंडिया (Life Insurance Corporation of India) तर्फे मुलींसाठी कन्यादान योजनासुद्धा अत्यंत आकर्षक स्वरूपात सुरु आहे.साधारणपणे सध्या मुलीच्या लग्नाचा खर्च ५ लाख रु. आहे. १५ वर्षानंतर तो किमान १२ लाख होऊ शकतो व कदाचित २५ वर्षानंतर तो ३० लाख होऊ शकतो. या योजनेत दररोज रु. १५३/- मात्र  २२ वर्षांपर्यंत जमा केल्यास २५ व्या वर्षी LIC तर्फे रु. ३३,००,००० मिळू शकतात व या कालावधीत पालकांचे काही बरे- वाईट झाल्यास हा सगळा भार LIC तर्फे उचलला जातो.या संदर्भातील विस्तृत माहितीसाठी LIC चे विमा प्रतिनिधी श्री. विठ्ठल दिनकर उर्फ भाऊ साळगावकर यांच्याशी संपर्क साधावा-मोबाईल क्र. - ९४२२४३४८२७दूरध्वनी क्र. – ०२३६५ २५३२८५

एचडिएफसी कॅन्सर फंड

म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करून त्यतील मिळणारा डीव्हिडंड किंवा फायदा एखादा गुंतवणूकदार कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाशी सामना करणाऱ्या व्यक्तींना मदत करणाऱ्या संस्थेकडे वर्ग करण्याची सोय सुध्दा म्युचुअल फंडातर्फे केली आहे. फक्त अशा सेवाभावी संस्थांची निवड करण्याचा अधिकार गुंतवणूकदाराला नाही. एचडीएफसी म्युचुअल फंडाने सुध्दा HDFC DEBT FUND FOR CANCER CURE 2014 अशी सेवा सुरु केली आहे. एखादा गुंतवणूकदार कोणालाही न समजता आपली आर्थिक मदत अशा संस्थेला परस्पर करू शकतो हे या फंडांचे वैशिष्ठ्य आहे. या साठी गुंतवणूक दाराने फक्त आपल्याला मिळणारा नफा कुठे वर्ग करावयाचा त्यावर टीकमार्क केले की ही बाब पूर्ण होऊ शकते. एचडीएफसी म्युच्युअल फंड हा क्लोज एन्डेड फंड असून…

End of content

No more pages to load