फ्लोटिंग रेट फंड

अनेक व्यावसायिक संस्था किंवा व्यक्ति आपले व्यावसायिक व्यवहार बँकेच्या करंट अकाउंट अथवा बचत खात्यामार्फत करतात. करंट अकाउंटवर जी रक्कम असेल तिला काहीही व्याजप्राप्ती होत नाही. तसेच बचत खात्यावरील रकमेवर मिळणारे ३ % ते ४ % व्याज हे चाक्रवाढीच्या स्वरूपात नसते. बँकेच्या खात्यात बिनव्याजी असलेली रक्कम किंवा काही दिवासांसाठी न लागणारी रक्कम आपण म्युचुअल फंडाच्या "फ्लोटिंग रेट फंड" किंवा कॅश मॅनेजर किंवा जीसेक फंड किंवा ट्रेझरी adavntage फंड यामधे कमीत कमी दोन दिवसांसाच्या कालावाधीसाठीसुध्दा ठेऊ शकतो व त्यावर सामान्यपणे ६% ते ८% व्याजही मिळवू शकतो. हे व्याज चक्रवाढ गतीचे (CAGR) असते. साधारणतः सर्व बँका शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी बंद असतात त्यामुळे सुट्ट्या…

सोप्या योजना घ्या!

अधिक वैशिष्ठे असलेले उत्पादन किंवा योजना सर्वात चांगली असते, असा सर्वसाधारण समाज आहे. उत्पादन मग ते स्मार्टफोन अॅप्लिकेशन (अॅप) असो, पिझ्झा असो किंवा तुमच्या मुलांसाठीचे प्लेस्कूल असो; जेवढे विविध लाभ अधिक तेवढी ती चांगली असा दृढ समाज आहे. हाच समाज आर्थिक योजनांच्या बाबतीतही असतो, ही बाब काहीशी चिंताजनक आहे. गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेण्यासाठी सर्व बाबी अत्यंत सोप्या असणे आवश्यक असते.बचतीच्या योजनांबाबत विचार केल्यास, त्यंचा साधेपणा हे केवळ महत्वाचे लक्षण ठरते असे नव्हे; तर ते सर्वथा गरजेचेही असते. गुंतवणूकदाराला एखादी आर्थिक सेवा किंवा एखादी आर्थिक योजना पूर्णपणे कळलीच नाही, तर मग समस्या निर्माण होतात. अशी समाज गुंतागुंतीच्या आर्थिक योजनांच्या बाबतीत येत…

गुंतवणूक घोटाळे…

पुष्कळ प्रकारचे गुंतवणूक घोटाळे असतात. जे की, तुम्हाला आकर्षित करून कोंडीत पकडू शकतात. त्यामुळे त्यांना टाळणेच योग्य. पसरवा आणि फसवा : या प्रकारात तुम्हाला एक इमेल किंवा एसएमएस प्राप्त होईल. ज्यात तुम्हाला म्हणतील कि जीवनातील गुंतवणुकीसाठी सर्वात उत्तम संधी. यात तुम्हाला टी व्यक्ती किंवा कंपनी याबद्दल माहिती नसते. ते कशा प्रकारे स्वतःच्या मोठ्या किमतीचा माल मागे लागून विकताहेत हे ही समजणार नाही. जस जसे गुंतवणूकदार यात फसत जातात त्या कंपनीच्या शेअर किंमती गगनाला भिडतात. एकदा का किंमत सर्वोच्च स्तराला पोहचली की मग घोतालेबाज व्यक्ती त्याचे शेअर विकून मोकळा होतो व त्या शेअरच्या किमती एकदम पडतात. शेवटी तुमच्यापाशी ज्यांची काहीच किंमत…

सेवा निवृत्ती विशेष

सेवानिवृत्ती नियोजन म्हणजे, काही पैसा बाजूला काढून ठेवणे किंवा अशी संपत्ती आपल्यापाशी असणे ज्यातून आपणास उतारवयात उत्पन्न प्राप्त होईल. हे सर्व निवृत्तीपर्यंत पोहोचण्याच्या आधीच करून ठेवायला हवे. निवृत्ती योजनेशी विविध पैलू निगडीत असतात. त्यामुळे कधीहि लवकर सुरुवात करणे फायद्याचेच ठरते. तुम्ही तुमचे निवृत्ती लक्ष्य सुनिश्चित करा. निवृत्तीपूर्वीच तुम्हाला निवृत्तीसाठी बचत योजना सुरु करणे गरजेचे होईल. खाली दिलेल्या चार पायऱ्यांचा व्यवस्थित अवलंब करा जेणे करून तुमचा अतिशय आदर्श असा निवृत्ती नियोजनाचा मार्ग सूकर होईल. सर्व प्रथम हे निश्चित करा की निवृत्तीनंतरच्या काळात समाधानी जीवन जगण्यास तुम्हाला किती पैसे उत्पन्न लागणार. एक लक्षात ठेवा, यात वाढणारे इस्पितळ खर्च, इतर खर्च व कुटुंबाकरिता…

End of content

No more pages to load