बँकिंग फंड घ्याच !!
बँकांचे शेअर्स चांगला परतावा देतात हा माझा अनुभव. पण ह्याला बँक of इंडिया व महाबंक यांनी मात्र समभाग धारकांना धोका दिला आहे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या आवडत्या शेअर्सची यादी काढली, तर त्या यादीत अनेक बॅंकांचे शेअर अग्रभागी येतील. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बॅंका महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योग- व्यवसायांच्या भरभराटीसाठी आवश्यक असलेले स्थिर भांडवल, खेळते भांडवल आणि सामान्य लोकांच्या सर्व कर्जांच्या गरजा भागविणाऱ्या बॅंकांचे महत्त्व भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत खूप आहे. यामुळेच उत्तम बॅंकांचे शेअर आपल्याकडे असावेत, असे प्रत्येकाला वाटणे साहजिक आहे. वेगाने व्यवसाय वाढणाऱ्या बॅंकेचा शेअर किती फायदा मिळवून देऊ शकतो, याचे उदाहरण पाहायचे असल्यास येस बॅंकेच्या…