बँक FD ला पर्याय आहे———
घरी आल्यावर बाबांचा पडलेला चेहरा बघून शशांकने विचारले... बाबा, काय झालंय? तुम्ही एवढ्या चिंतेत का दिसताय? बाबा: अरे बॅंकांच्या व्याजाचे दर दिवसेंदिवस कमीच होत चाललेत. यावेळेस तर मला "एफडी'वर फक्त वार्षिक 7 टक्केच व्याज मिळालं. बेटा, आता मात्र दर महिन्याला मिळणाऱ्या पैशांत नक्कीच आमचा खर्च नाही भागणार. आता मात्र आम्हाला तुझ्याकडून दर महिन्याला आर्थिक मदत नक्की लागणार. शशांकच्या बाबांनी निवृत्त झाल्यावर आपली सारी पुंजी बँक FD मध्ये ठेवली आहे व त्याच्या व्याजावर त्यांचा आजपर्यंत उदरनिर्वाह व्हायचा. वरील संभाषणांतून आपल्याला असे जाणवते, की बॅंकेच्या "एफडी'चे व्याजदर दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि आपल्याला लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंच्या किमती मात्र वाढत आहेत. कारण फक्त…