करसवलत व शिक्षण कर्ज
काळानुसार महागाई ही सर्वच क्षेत्रांत वाढलेली आहे. या नियमाला शिक्षण क्षेत्रदेखील अपवाद नाही. अलीकडे शैक्षणिक खर्चांमध्ये प्रचंड वाढ झालेली असल्याने अनेकजण शैक्षणिक कर्ज घेताना दिसतात. अशा या शैक्षणिक कर्जावर प्राप्तिकर सवलतमिळते . कलम 80-ई वैयक्तिक करदाता सोडून इतर करदात्यांसाठी (जसे हिंदू अविभक्त कुटुंब, भागीदारी संस्था, कंपनी आदी) या कलमाखाली सवलत मिळत नाही. शैक्षणिक कर्जावरील भरलेल्या केवळ व्याजाचीच सवलत मिळते. शैक्षणिक कर्ज हे वित्तीय संस्था (बॅंक आदी) किंवा मान्यताप्राप्त संस्थांकडूनच घेणे अनिवार्य असते. शिवाय, शैक्षणिक कर्ज हे उच्चशिक्षणासाठी घेतले गेलेले पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट अशी, की या कलमात कोठेही उच्च शिक्षण हे भारतातच घेतले गेले पाहिजे, असा उल्लेख नसल्यामुळे भारताबाहेर अर्थात…