निवड कशी कराल ?
सोने व रिअल इस्टेटमधील मंदावलेले भाव आणि खाली येणारे व्याजदर यामुळे गुंतवणूकदार इक्विटी व म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत. म्युच्युअल फंड उद्योगाने गुंतवणूकदारांना त्यांच्या गरज, अपेक्षा व जोखीम (रिस्क) घेण्याच्या तयारीप्रमाणे अनेक योजना आणलेल्या आहेत. या फंडांचे आपण दोन प्रकारांत वर्णन करू शकतो- इक्विटी आणि डेट फंड. कोणत्याही फंडामध्ये दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते- एकरकमी आणि सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी). . आपले वय , जोखीम घ्याची तयारी ,यावर कोणता फंड निवडावा हे थोडक्यात पहा !! फंड प्रकार 1) कमी जोखीम ः प्रथमच गुंतवणूक करणारे, ज्येष्ठ नागरिक, मुदत ठेवींसारखा (एफडी) सुरक्षित परतावा अपेक्षिणाऱ्यांसाठी योग्य. अ) इक्विटी सेविंग्ज स्कीम ः गुंतवणूक…