Credit Card बिल भरण्यास उशीर ? विलंब शुल्क नाही लागणार

आजच्या काळात बहुतेक लोक खरेदीसाठी क्रेडिट कार्डाचा वापर करतात. क्रेडिट कार्डाद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेची चिंता न करता पेमेंट करू शकता. क्रेडिट कार्डेही वापरण्यास सोपी असतात आणि त्याचे अनेक फायदेही असतात. पण लक्षात घ्या की क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची अंतिम तारीख असते, ज्याचे पालन करणे अनिवार्य असते. बिल दिल्यानंतर एका ठराविक तारखेपर्यंत तुम्हाला बिल भरावे लागेल. मात्र, अंतिम मुदत चुकल्यास आपल्याला दंड भरावा लागतो तसेच तुमचा क्रेडिट स्कोअरही खराब होण्याचा धोका आहे. अनेक वेळा लोक क्रेडिट कार्डचे बिल देय तारखेला भरायला विसरतात. अशा स्थितीत त्यांचा क्रेडिट स्कोर खराब होतो. मात्र, देय तारखेनंतरही तुम्हाला दंडाशिवाय क्रेडिट कार्ड बिल भरण्याची…

वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी

विवाह हा नवदाम्पत्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असतो. आपापल्या कुवतीप्रमाणे खर्च करून हा सोहळा जास्तीत जास्त कसा चांगला करता येईल यासाठी संबंधित प्रयत्नशील असतात. आजकाल ‘डेस्टिनेशन वेडिंग’सुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. बऱ्याचदा प्रत्यक्ष विवाह ठरल्यानंतर पुढील ४-६ महिन्यांत विवाह समारंभ ठरविला जातो व त्यानुसार विवाह स्थळ, मंगल कार्यालय, हॉटेल किंवा एखादे विशिष्ट स्थळ (डेस्टिनेशन) ठरविले जाते. विवाह समारंभात प्रामुख्याने सोने, कपडे, मंगल कार्यालय/ हॉटेल, जेवणावळी, मेहंदी, व्हिडीओ शूटिंग यावर खर्च होणार असतो व याचे पूर्वनियोजन आणि तयारी केली जाते. अर्थात त्यासाठी आवश्यक ते पेमेंट करावे लागते. काही वेळा नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटनेमुळे हा समारंभ पुढे ढकलावा लागतो किंवा रद्द…

१२ वी पास मुलगा झाला करोडपती—संकर्ष चंदा

जेव्हा कधी शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांचा उल्लेख येतो, तेव्हा दिवंगत राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, विजय केडिया, आशिष कोचलिया आणि डॉली खन्ना यांच्यासह अनेक बड्या गुंतवणूकदारांची नावे लोकांच्या समोर येतात. पण भारतात अनेक तरुण गुंतवणूकदारांनीसुद्धा शेअर बाजारातून लाखोंनी पैसा कमावला आहे. लोकांना कदाचित तरुण वयातील नवीन गुंतवणूकदारांबद्दल माहिती नसेल. आता या यादीत एका २४ वर्षीय मुलाचे नाव सामील झाले आहे, ज्याने कॉलेजला जाण्याच्या वयात शेअर बाजाराचा मार्ग स्वीकारला आणि तो कोट्यधीश झाला. हैदराबाद येथील संकर्ष चंदा (२४) यानं केवळ १७ वर्षांचा असताना भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी संकर्षने शेअर मार्केटमधून १०० कोटी रुपये कमावले.…

*लिक्वीलोन- नवीन गुंतवणूक सुविधा *

*लिक्वीलोन- नवीन गुंतवणूक सुविधा * सध्या बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणे ही बाब सोपी झाली आहे.त्याबरोबरच *P2P लेंडिंग * हा प्लॅटफ़ॉर्मसुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने कर्जाची रक्कम उपलब्ध करून देत आहे. आणि असाच एक सुंदर प्लॅटफ़ॉर्म प्रूडंट कनेक्ट या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर कंपनीने तयार केला आहे. त्यात ५ दिवस ते ६ महिने किंवा वर्षभरासाठी आपण गुंतवणूक केल्यास आपल्याला 8% ते 9.15 % प्रतिवर्ष या दराने परतावा मिळतो. आणि *हा परतावा Assured आहे * यातील सर्व व्यवहार हे online असून परतावा सुद्धा redemation ऑर्डर केल्यावर ४८ तासामध्ये आपल्या बँक खात्यात जमा होतो. आणि या सर्व प्रकियेला “लिक्वीलोन” असे संबोधले जाते. गुंतवणुकीच्या या…

‘लिक्विड फ़ंड’ (लिफ) कसे काम करतात ?

'लिक्विड फ़ंड' (लिफ) कसे काम करतात हे जाणून घेण्याअगोदर लिफ म्हणजे काय, हे समजून घेऊया !! बऱ्याचदा अशी काही परिस्थिती उद्भवते की अचानक काही थोड्या काळासाठी आपल्या बचत खात्यात काही रक्कम येऊन पडते, जिची आपल्याला लगेचच काही गरज नसते, उदा: मनी बॅक पॉलिसीचे पैसे, शेअर्समधील चढ उताराचा फायदा घेण्यासाठी विकलेल्या शेअर्सचे पैसे किंवा ऑफिस ने दिलेला प्रोत्साहन भत्ता वगैरे. हे पैसे जर नुसतेच बचत खात्यात राहिले तर 3 ते 4 टक्के व्याज मिळेल. त्यापेक्षा कुठेतरी थोड्या काळासाठी गुंतवले, तर? कारण, अजून सहा महिन्यांनी तुम्हाला नवी बाईक घ्यायची आहे, तेव्हा ते पैसे लागतील, किंवा अजून कशाकरिता… एक गोष्ट आपल्या लक्षात आली…

लहान बचत योजनांसाठी आधार आणि पॅन अनिवार्य

आता तुमच्याकडे पॅन आणि आधार नसेल तर तुम्ही छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही. अर्थ मंत्रालयाने अल्पबचत योजनेत गुंतवणुकीबाबत नियम बदलले आहेत आणि याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), सुकन्या समृद्धी योजना (SSY), पोस्ट ऑफिस बचत योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) यासारख्या लहान बचत योजना सुरू करण्यासाठी पॅन आणि आधार अनिवार्य करण्यात आले आहेत. ही अधिसूचना ३१ मार्च २०२३ रोजी जारी करण्यात आली आहे. लहान बचत योजनांसाठी केवायसी प्रक्रियेचा भाग म्हणून आधार आणि पॅन अनिवार्य करण्यात आले आहेत. आता सरकारी अल्पबचत योजनांसाठी आधार आवश्यक झाले असून गुंतवणूक मर्यादेपेक्षा जास्त असल्यास पॅनकार्डही द्यावे…

आय सी आय सी आय लोम्बार्डची कुठेही cashless सुविधा

खासगी क्षेत्रातील आघाडीच्या सर्वसाधारण विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड यांनी आपल्या आरोग्य विमा पॉलिसीधारकांसाठी एनीव्हेअर कॅशलेस या अनोख्या सुविधेची घोषणा केली आहे. आरोग्य विमा क्षेत्रातील ही अशी पहिल्या स्वरुपाची सुविधा आहे. एखादे रुग्णालय जरी आयसीआयसीआय लोम्बार्डच्या सध्याच्या हॉस्पीटलच्या शृंखलेत समाविष्ट नसले तरी या सुविधेआधारे विमाधारकांना कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस सुविधेचा लाभ घेता येईल. ग्राहकांना त्यांच्या खिशातून कोणताही नवा पैसा त्यासाठी खर्च करावा लागणार नाही.!!

SIP मधून पैसे कसे काढायचे?

एसआयपीमधून पैसे काढताना कोणते घटक लक्षात घेतले पाहिजेत? पैसे कधी काढले जावे आणि कोणत्या प्रकारचे कर आकारले जाऊ शकतात? हे आज थोडक्यात पाहूया !! रिडेम्पशनपूर्वी लॉक इन पीरियड तपासायला हवा. ELSS मध्ये 3 वर्षांचा लॉक-इन आहे. जर गुंतवणूक एसआयपीद्वारे केली गेली असेल, तर फक्त पहिली एसआयपी ३ वर्षांनी आणि दुसरी तीन वर्ष १ महिन्यानंतर काढता येऊ शकते. जर फंडचा परतावा चांगला सुरू असेल तर आणि पैशाची तत्काळ गरज नसेल, तर पहिल्या एसआयपीपासून ४ वर्षांनी एकरकमी पैसे काढले जावेत. काही फंडांना ठराविक वेळेपूर्वी रिडीम केल्यास १% किंवा त्याहून अधिक एक्झिट लोड शुल्क भरावे लागते. इक्विटी फंडांच्या बाबतीत, वेळ फ्रेम सहसा एक…

पोस्ट ऑफिस ची ATM सुविधा

पोस्ट ऑफिसकडुन सेविंग अकाउंट होल्डरसाठी एटीएम कार्डची सुविधा देण्यात येते. बँक एटीएम कार्डनुसारच या एटीएम कार्डचा वापर केला जातो. तुम्हीदेखील पोस्ट ऑफिसमधील सेविंग्स अकाउंटसाठी एटीएम कार्ड घेतले असेल, तर त्यावरील ट्रान्झॅक्शनचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटनुसार एका दिवसात एटीएम कार्डमधून २५ हजार रुपये काढता येतात. एका ट्रान्झॅक्शनमध्ये १० हजार रुपये इतकी रक्कम काढता येते. ट्रान्झॅक्शन चार्ज जर तुम्ही मेट्रो सीटीतील रहिवाशी असाल तर एका महिन्यात दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून ३ वेळा फ्री ट्रान्झॅक्शन करू शकता. तसेच नॉन मेट्रो सीटीसाठी ५ वेळा फ्री ट्रान्झॅक्शन करता येते. पोस्ट ऑफिसच्या एटीएममधून ट्रान्झॅक्शन केल्यास कोणत्याही शुल्क आकारले जात नाही. दुसऱ्या बँकेच्या…

लवकरच सुरु होणार सोशल स्टॉक एक्सचेंज

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. बाजार नियामक सेबीने प्रमुख स्टॉक एक्स्चेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंजला (एनएसई) त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एक वेगळा विभाग म्हणून सोशल स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यासाठी अंतिम मंजुरी दिली आहे. एनएसईने गुरुवारी याबाबत माहिती देताना सांगितले की सेबीकडून २२ फेब्रुवारी रोजी मार्केट एक्सचेंजला अंतिम मंजुरी मिळाली आहे. सोशल स्टॉक एक्स्चेंजवर फक्त सामाजिक उपक्रमांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाईल. एनएसईचे सोशल स्टॉक एक्सचेंज सुरु करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजाच्या भल्यासाठी काम करणारे ट्रस्ट आणि चॅरिटेबल संस्थांना (NPOs) शेअर बाजारातून निधी उभारण्यास मदत करण्याचा आहे. भारतापूर्वी सोशल स्टॉक एक्सचेंज आधीच इंग्लंड, कॅनडा आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये कार्यरत आहे. SSE वर फक्त…

End of content

No more pages to load