एस. आय . पी. बद्दल अधिक काही —-

म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे गुंतवणूक करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये वेळेचा फार मोठा वाटा आहे. मध्यम गुंतवणूकदार त्यांची दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड  निवडू शकतात. धोकादायक श्रेणी निवडू नका कारण तुम्हाला अत्यंत अस्थिरता आणि संभाव्य नुकसान हाताळणे कठीण जाईल. नेहमी लक्षात ठेवा की आपण प्रचलित बाजार परिस्थिती किंवा टॉपर्स किंवा श्रेणींवर आधारित म्युच्युअल फंड कधीही निवडू नये. तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर नेहमी भर द्या. १. गुंतवणुकीचे पहिले सूत्र म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी काही खास सूत्रे आहेत. पहिले सूत्र १५१५१५ आहे. या फॉर्म्युल्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने १५ वर्षांसाठी १५ टक्के परताव्याच्या दराने दरमहा १५…

माझी मुलगी सहा महिन्यांची आहे ! तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली ?

तुमची मुलगी काही महिन्यांचीच आहे. जर आता पासून तुम्ही तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी चांगल्या आणि योग्य आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक केली तर तुमची चिंता दूर होऊ शकेल . गुंतवणुकीचा काही हिस्सा इक्विटी म्युच्युअल फंडात आणि काही हिस्सा डेट मालमत्ता वर्गात टाका . पण या चिंता आणि तणावाच्या खाली चुकीच्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करू नका . डेट मालमत्ता वर्गासाठी तुमच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेतच गुंतवणूक करा. लवकरात लवकर तिच्या साठी हे खाते उघडा . केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत हे खास गुंतवणुकीचे साधन मुलींच्या पालकांसाठी उपलब्ध करून दिले आहे . मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ…

आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार !!!

कोरोना व्हायरसच्या चिंतेमुळे जागतिक शेअर बाजारांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. गुंतवणूकदार कमालीचे धास्तावलेले आहेत. कोरोना विषाणूमुळे आलेल्या साथीचे जागतिक अर्थकारणावर दीर्घकालीन दुष्परिणाम होईल अशी भीती ही व्यक्त होत आहे. या सर्व गोष्टींचा गुंतवणुकीदारांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. तथापि हि जागतिक मंदीची भीती कितीही खरी असली तरी ,इक्विटी गुंतवणूकदार या संकटाचा हि चांगल्या प्रकारे सामना करू शकतात आणि त्यासाठी काय आवश्यक आहे तर संयमित मनोवृत्ती आणि उज्वल भविष्य काळावरचा विश्वास... सध्याच्या जागतिक अस्थिर आर्थिक स्थितित तर अशा बातम्यांवर आधारित कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपण शेअर बाजारात दीर्घकालीन दृष्टिकोन ठेऊन डोळसपणे चांगल्या कंपन्यांमध्ये किंवा चांगल्या म्युच्युअल फंडामध्ये नियमित…

शेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते?

डीलिस्ट हा शब्द काही दिवसांपूर्वी खूप वापरला जात असे ज्या वेळेला वेदांता कंपनी ने डिलिस्टिंग जाहीर केले व त्याची किंमत जाहीर केली परंतु त्यांचे डीलिस्टिंग पूर्णतः अपयशी ठरले व त्यांना ते मागे घ्यावे लागले. डीलिस्टिंग म्हणजे थोडक्यात शेअर बाजारातील त्याचा प्रवेश बंद करणे, त्या शेअरची खरेदी विक्री बंद करणे असे होय. थोडक्यात आयपीओ प्रोसेस च्या विरुद्ध ही प्रोसेस आहे. परंतु मग शेअर बाजारांमध्ये एकदा आयपीओ द्वारे किंवा इतर मार्गाने आलेली कंपनी ही डीलिस्टिंग हा पर्याय का निवडते:- डीलिस्टिंग मध्ये दोन प्रकार आहेत :- १. स्वेच्छेने होणारे डीलिस्टिंग. २. अनिवार्य केलेले डीलिस्टिंग. मग कंपन्या डीलिस्टिंग चा पर्याय का निवडते :- १.…

गुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात?

जेव्हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असते तेव्हा बहुतेक वेळा सामान्य गुंतवणूकदार काय करतात? आपल्यापैकी बरेचजण प्रसिद्ध वेबसाइटवर जातात आणि म्युच्युअल फंडाची स्टार रेटिंग पाहतात. आपल्याला एकाच वेबसाइटवर अवलंबून राहणे धोक्याचे वाटत असल्याने आपण अशा २/३ वेबसाइट्सवर जाऊन स्टार रेटिंग तपासतो आणि या सगळ्या वेबसाइटवर ज्या म्युच्युअल फंडाचे नाव असेल अशा फंडाला पसंती दर्शवतो. आपली मासिक गुंतवणूक ५/१० हजार जरी असेल तरीही आपण ४/५ स्टार फंडांची निवड करतो. १/२ हजाराची गुंतवणूक करताना ५ फंडांची निवड केल्यास आपल्याला वाटते कि आपण आपल्या जोखमीला कमी केले . परंतु असे करून आपण खरोखरच गुंतवणुकीत वैविध्य आणले की त्याच त्याच प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून…

दैनंदिन खर्च आटोक्यात कसा ठेवावा?

जीवनशैली ही समाज, संस्कृती, एखादा गट किंवा काही व्यक्तींनी स्थापित केलेली आहे. यामध्ये एकमेकांसोबत वागणूक, संवाद, वस्तूंची देवाणघेवाण आणि उपभोग, कार्य, उपक्रम, आणि स्वारस्य यासारख्या गोष्टींचा समावेश आहे ज्यात एखाद्या व्यक्तीने आपला वेळ कसा घालवायचा याचे वर्णन केले आहे. अलीकडे आपल्या जीवनशैलीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि आपण या नवीन जीवनशैलीनुसार आपली हि जीवनशैली तशीच उंचावण्याचा प्रयत्न करत असतो. आजकाल जीवनशैली खर्चाच्या नावाखाली आपण अनावश्यक गोष्टींवर खर्च करत राहतो. आपल्याला असे वाटते की आमची सामाजिक स्थिती अबाधित ठेवण्यासाठी हे खर्च अनिवार्य आहेत. आपण लहान असताना आपली अशी जीवनशैली होती का? आपल्या आई-वडिलांनी आपली जीवनशैली कायम ठेवण्यासाठी बरेच पैसे खर्च केले…

आर्थिक नियोजनाचे महत्व

आर्थिक नियोजनाचे महत्व आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने गेली दोन वर्षे अनेकांसाठी थोडीफार कठीण ठरली आहेत. lockdown,पगार कपात, व्यवसायावरील बंधने, वैद्यकीय खर्च या कारणास्तव अनेकांना आर्थिक फटका बसला आहे.,आणि त्यामुळेच आर्थिक शिस्तीचे महत्व समजले आहे.त्या दृष्टीने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या कालावधी हा खूप महत्वाचा ठरतो. वर्षभर आर्थिक तणाव राहू नये या दृष्टीने अर्थवर्षाच्या पहिल्या महिन्यापासून काही महत्वाच्या बाबीवर लक्ष केंद्रीत केल्यास कोणताही आर्थिक तणाव येऊ शकतात नाही. यासंबधात महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे:- १. खर्चावर नियंत्रण – आपला खर्च कसा होत आहे यासाठी खर्च होणारा प्रत्येक पैसा कुठे खर्च होतो हे लिहून ठेवल्याने अनावश्यक बाबीवरील खर्च टाळता येणे शक्य होते. यासाठी अनेक लहान मोठी app…

अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी—-

आपण काम आपली उपजीविका मिळवण्यासाठी करत असतो. पगाराचे उत्पन्न, व्यवसायाचे उत्पन्न, भाड्याचे उत्पन्न, व्याज आणि लाभांश इत्यादी उत्पन्नाची बरीच साधने आहेत. आपण अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो इंग्लिश मध्ये एक म्हणं प्रसिद्ध आहे “पेनी सेव्ह इज पेनी अर्न्ड ”. प्रत्येक महिन्यात अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी वेगवेगळ्या मालमत्ता वर्गात योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास बचत हि अधिक उत्पन्न देण्याचे साधन बनू शकते. आपल्या पगाराशिवाय अधिक उत्पन्न Passive Income (निष्क्रीय उत्पन्न ) मिळवण्याचे मार्ग मी वरील परिच्छेदात उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पारंपारीक स्त्रोतांचा जसे कि भाड्याचे उत्पन्न, व्याज आणि लाभांश उल्लेख केला आहे. या डिजिटल आणि आधुनिक जगात आपल्याकडे अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे भिन्न स्त्रोत आहेत.…

गुंतवणुकीचा फॉर्म्युला

मला बऱ्याचवेळा गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीचे अवलोकन करून काही बदल असल्यास सुचवा अशी विनंती करतात. अश्या गुंतवणुकीदारांच्या पोर्टफोलिओ चे अवलोकन करताना बऱ्याच वेळा असे आढळून आले आहे कि त्यांची गुंतवणूक कोणत्याही आर्थिक ध्येयाशिवाय केलेली असते. अश्या प्रकारच्या गुंतवणुकीत दूरदृष्टीचा अभाव असून ती दिशाहीन असते. अशाच एका तरुण गुंतवणूकदारांचा ई-मेल आला आहे. मी त्याला सुचवलेला गुंतवणुकीचा फॉर्म्युला तुम्हालाही हा गुंतवणुकीचा फॉर्म्युला उपयोगी पडेल !! ध्येय आधारित गुंतवणूक करा : मी नेहमीच सांगत असते की गुंतवणूकीची प्रक्रिया एखाद्या आर्थिक उद्दीष्टाला दृष्टिक्षेपात ठेऊन सुरु करा. बऱ्याचवेळा नुकतेच कमावते झाल्यावर नेमके आर्थिक लक्ष नसते. अश्यावेळेस संपत्ती निर्मिती हे लक्ष असू शकते. बरेच तरुण गुंतवणूकदार अश्या…

*आज व्हॅलेंटाईन डे ! *

आज व्हॅलेंटाईन डे ! * आज आपल्या वॅलेन्टाईनला आपण नव्या स्वरूपाच्या गिफ्ट देऊन *अर्थसाक्षर * करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकायला शिकवा ! अशा वेगळ्या स्वरूपाच्या चार *गिफ्ट्स * मी आज सांगणार आहे ! १ ) आपल्या वॅलेंटाईनच्या नावे डिमॅट खाते उघडून त्याचा पासवर्ड द्यावा की ज्यामुळे equity इन्व्हेस्टमेंट संबंधी माहिती घ्यायला सुरवात होऊ शकेल ! २ ) बरेच लोक आज दागिने खरेदी करून गिफ्ट देतात पण मी आपल्याला आज *गोल्ड बॉण्ड खरेदी * करून गिफ्ट द्यावी असे सुचवत आहे ! ते सांभाळणे सोपे असून विक्री करून पैसे उपलब्ध करणे सोपे असते ! ३) आपले कुटुंबीय हेही आपले एका तऱ्हेने वॅलेन्टाईनच…

End of content

No more pages to load