फॉर्म क्रमांक 15 G / H
मध्यम वर्गीय किंवा ज्येष्ठ नागरिक एप्रिल / मे महिन्यात हा फॉर्म भरण्यासाठी बँकेत जातात , व बँक अधिकारी सांगेल त्या ठिकाणी सह्या करून येतात . गेल्या काही वर्षात बहुतांशी बँकांचे core बँकिंग झाल्याने असे प्रत्येक बँकेत फॉर्म १५ G/H भरणे कदाचित धोकादायक होऊ शकते . मुळात हा फॉर्म म्हणजे एक प्रतिज्ञापत्र आहे. ज्याचे उत्त्पन्न करमर्यादेपेक्षा जास्त आहे त्याने हा फॉर्म भरू नये . कारण आपल्याला बँकेत ठेवलेल्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजामधून TDS कापला जाऊ नये म्हणून आपण ह्या फॉर्मवरील सह्याद्वारे घोषणापत्र देतो व आपला उद्गमस्थानी कर कपात करू नका असे बँकेला सांगत असतो. बँकेच्या एका शाखेतील व्याज जरी करकपातीच्या मर्यादेच्या आत…