गरज अर्थसाक्षरतेची

  सन १९९० मध्ये मी चिपळूणला असताना आमच्या शेजारी पोस्ट ऑफिस होते व तेथील पोस्टमास्तर माझ्याकडे बचतीचा मंत्र सांगण्यासाठी आले . त्यांनी दरमहा रू. ५०० / - ची NSC तुम्ही सुरु करावी असे सांगून ६ वर्षात ही रक्कम दुप्पट होईल त्याची पुनर्गुंतवणूक ४ वेळा  त्याच योजनेत करावी आणि निवृत्तीच्या  वेळी या परताव्याची रक्कम अतिरिक्त निवृत्तीवेतन म्हणून आपणास मिळू शकेल असे सांगितले . त्यांची योजना स्वीकारून मी सहा वर्षे दरमहा रू.  ५०० /- ची NSC घेऊ लागलो . पण नंतर व्याजदर कमी कमी होत गेले , माझी चिपळूण येथून बदलीही झाली , व सर्वात महत्वाचे म्हणजे पोस्टल सेवेतील दिरंगाईमुळे ही मूळ…

संतुलन

संतुलन -- बॅलन्स्ड फंडकोठेही कोणत्याही माणसाचा जीवनात परिपूर्ण संतुलन साधण्याचा प्रयत्न असतो.कामाच्या ठिकाणी संतुलित वातावरण, नातेसंबंधात संतुलन जसे आवश्यक तसे, आपल्या कष्टाचा पैसा जेथे गुंतवतो तेथे संतुलन हवेच.बॅलन्स्ड फंड म्हणजे बाजारातील उलथापालथीत किंवा वादळवाऱ्यात तग धरून राहण्यासाठी गुंतवणूक सुरक्षित ठेवणे याच्याशीच संलग्न आहे. यामध्ये “ वृध्दी ” होण्याच्या दृष्टीकोनातून किमान जोखीम ठेवण्याचे संतुलन फंड मॅनेजर राखतो.यामध्ये वृद्धीच्या दृष्टीने ६०% ते ७०% गुंतवणूक समभागात असते व ३०% ते ४०% गुंतवणूक रोख्यामध्ये ठेवली जाते.बाजार तेजीत असताना मोठे समभाग घेऊन फायदा मिळविला जातो व जेव्हा मंदी सुरु असते तेव्हा हा फायदा रोख्यामध्ये गुंतवून जोखीम कमी केली जाते हा फेरबदल बाजाराच्या स्थितीवर केला जातो.या…

सोप्या योजना घ्या!

अधिक वैशिष्ठे असलेले उत्पादन किंवा योजना सर्वात चांगली असते, असा सर्वसाधारण समाज आहे. उत्पादन मग ते स्मार्टफोन अॅप्लिकेशन (अॅप) असो, पिझ्झा असो किंवा तुमच्या मुलांसाठीचे प्लेस्कूल असो; जेवढे विविध लाभ अधिक तेवढी ती चांगली असा दृढ समाज आहे. हाच समाज आर्थिक योजनांच्या बाबतीतही असतो, ही बाब काहीशी चिंताजनक आहे. गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेण्यासाठी सर्व बाबी अत्यंत सोप्या असणे आवश्यक असते.बचतीच्या योजनांबाबत विचार केल्यास, त्यंचा साधेपणा हे केवळ महत्वाचे लक्षण ठरते असे नव्हे; तर ते सर्वथा गरजेचेही असते. गुंतवणूकदाराला एखादी आर्थिक सेवा किंवा एखादी आर्थिक योजना पूर्णपणे कळलीच नाही, तर मग समस्या निर्माण होतात. अशी समाज गुंतागुंतीच्या आर्थिक योजनांच्या बाबतीत येत…

गुंतवणूक घोटाळे…

पुष्कळ प्रकारचे गुंतवणूक घोटाळे असतात. जे की, तुम्हाला आकर्षित करून कोंडीत पकडू शकतात. त्यामुळे त्यांना टाळणेच योग्य. पसरवा आणि फसवा : या प्रकारात तुम्हाला एक इमेल किंवा एसएमएस प्राप्त होईल. ज्यात तुम्हाला म्हणतील कि जीवनातील गुंतवणुकीसाठी सर्वात उत्तम संधी. यात तुम्हाला टी व्यक्ती किंवा कंपनी याबद्दल माहिती नसते. ते कशा प्रकारे स्वतःच्या मोठ्या किमतीचा माल मागे लागून विकताहेत हे ही समजणार नाही. जस जसे गुंतवणूकदार यात फसत जातात त्या कंपनीच्या शेअर किंमती गगनाला भिडतात. एकदा का किंमत सर्वोच्च स्तराला पोहचली की मग घोतालेबाज व्यक्ती त्याचे शेअर विकून मोकळा होतो व त्या शेअरच्या किमती एकदम पडतात. शेवटी तुमच्यापाशी ज्यांची काहीच किंमत…

सेवा निवृत्ती विशेष

सेवानिवृत्ती नियोजन म्हणजे, काही पैसा बाजूला काढून ठेवणे किंवा अशी संपत्ती आपल्यापाशी असणे ज्यातून आपणास उतारवयात उत्पन्न प्राप्त होईल. हे सर्व निवृत्तीपर्यंत पोहोचण्याच्या आधीच करून ठेवायला हवे. निवृत्ती योजनेशी विविध पैलू निगडीत असतात. त्यामुळे कधीहि लवकर सुरुवात करणे फायद्याचेच ठरते. तुम्ही तुमचे निवृत्ती लक्ष्य सुनिश्चित करा. निवृत्तीपूर्वीच तुम्हाला निवृत्तीसाठी बचत योजना सुरु करणे गरजेचे होईल. खाली दिलेल्या चार पायऱ्यांचा व्यवस्थित अवलंब करा जेणे करून तुमचा अतिशय आदर्श असा निवृत्ती नियोजनाचा मार्ग सूकर होईल. सर्व प्रथम हे निश्चित करा की निवृत्तीनंतरच्या काळात समाधानी जीवन जगण्यास तुम्हाला किती पैसे उत्पन्न लागणार. एक लक्षात ठेवा, यात वाढणारे इस्पितळ खर्च, इतर खर्च व कुटुंबाकरिता…

End of content

No more pages to load