अपघात व सुरक्षा

दोन वर्षांपूर्वी आमच्या शेजारच्या एका कुटुंबामध्ये दोन कर्तीसवर्ती मुले कामाच्या ठिकाणी जात असताना मोटर अपघाताने निधन पावली. या कुटुंबात नव्यानेच नोकरीला लागलेले हे दोन सख्खे भाऊ नोकरीच्या ठिकाणी दररोज जात असत. म्हणजेच जाण्यायेण्याचा रस्ता त्यांच्या कायमचा परिचयाचा होता. पण अपघात कधी सांगून होत नाही.कामाच्या जागेवर पोहोचण्यापुर्वी मोटरसायकला ट्रकचा धक्का बसला व काही कळायच्या आत होत्याचे नव्हते झाले. यांच्या घरात निव्वृत्तीला आलेले आईवडील व यापैकी एका भावाचे लग्न झाल्यामुळे त्याची लहान मुलगी व पत्नी पूर्णपणे अवलंबून असलेली माणसे आहेत. या अपघातामुळे या कुटुंबावर खूपच वाईट प्रसंग ओढवला गेला. असा प्रसंग कोणत्याही कुटुंबावर येऊ नये अशी सर्वांची इच्छा असते. पण अपघात हा…

नॉन spending डे !!

कालच माझे एक जुने सहकारी व मित्र भेटले . गेले सहा महिने ते आपल्या परदेशात्याल्या मुलीकडे गेले असल्याने तश्या बऱ्याच गप्पा झाल्या . तिकडे नवीन काय ? हे विचारल्यावर  ते म्हणाले  NSD . म्हणजेच तिकडे हल्ली “ नॉन spending डे “ प्रत्येक कुटुंबात साजरा होतो . हा दिवस दर आठवड्यातून एकदा किंवा दर महिन्यातून एकदा प्रत्येक कुटुंब साजरा करते . विस्तृतपणे विचारल्यावर त्याने सांगितले कि या दिवशी हा दिवस साजरा करणारे कुटुंब काहीही खरेदी करीत नाही .  हे ऐकून मलाही चांगले वाटले . आपल्याकडे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातसुद्धा नको तेवढ्या वस्तू खरेदी केल्या जातात हे मीही इकडे पाहतोच आहे . किचनच्या…

जबाबदारी पेलताना —–

कोणता term plan ( मुदत विमा ) घ्यावा यासाठी अनेकदा विचारणा होते पण बरेच विक्रेते यामध्ये भरलेल्या रकमेपासून काहीही मिळत नाही असे सांगून term plan घेण्यापासून परावृत्त करतात.पण term plan चा हप्ता हा अत्यंत कमी / नगण्यच असतो व मिळणारे कवच सुयोग्य असते , यासाठी व आपल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या सांभाळण्यासाठी मुदत विमा घेणे अत्यंत योग्य आहे !! भारतातील आघाडीची खासगी आयुर्विमा कंपनी एचडीएफसी लाइफने, भारतात उपलब्ध झालेली सर्वात व्यापक संरक्षण प्रदान करणारी आणि परवडण्याजोगी मुदत विम्याची (टर्म प्लान) योजना एचडीएफसी लाइफ क्लिक २ प्रोटेक्ट ३डी प्लस, नावाने प्रस्तुत केली असून, जी आजीवन पर्याय, उत्पन्न पुन:स्थापना आणि भरलेल्या हप्त्यांची परतफेड असे…

SIP करू की lump sum करू ?

म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी हा गुंतवणूक पर्याय छोट्या आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी अतिशय परिणामकारक ठरतो आणि या गुंतवणूक प्रकारचे फायदे अनेक आहेत हे सर्वश्रुत आहे. गुंतवणुकीतील सातत्य आणि नियमितता पाळण्यासाठी हा पर्याय अतिशय उपयोगी ठरतो; शिवाय शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे वाढणारी जोखीमदेखील या पर्यायाने कमी होते. शेअर बाजाराच्या प्रत्येक टप्प्यावर आपली गुंतवणूक होत असल्याने या गुंतवणुकीतील जोखीम तुलनेने कमी राहते आणि फायदादेखील उत्तम मिळू शकतो. याच कारणासाठी छोट्या गुंतवणूकदारांनी "एसआयपी'द्वारे गुंतवणूक करावी, असा सल्ला गुंतवणूक सल्लागार देताना दिसतात. याउलट, म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणूक जोखीमयुक्त ठरू शकते, असा सल्ला दिला जातो. बाजार वरच्या पातळीवर असताना एकरकमी गुंतवणूक केली आणि त्यानंतर…

कोणता फंड निवडू ?

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना नव्या गुंतवणूकदारांना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे गुंतवणुकीसाठी कोणत्या प्रकारचा फंड निवडू? ग्रोथ पर्याय बरा की dividend बरा ? ह्या सर्वांनी कोणत्याही चांगला परतावा दिलेला लार्ज कॅप फंड निवडावा असे मी सुचवतो. नावाप्रमाणेच हे फंड "लार्ज कॅप' अर्थात मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराला स्टेट बॅंक, लार्सन अँड टुब्रो, मारुती सुझुकी, इन्फोसिस, आयटीसी या आणि यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर त्याच्यासाठी "लार्ज कॅप' फंड अतिशय योग्य ठरतात. शिवाय असे फंड एकाच प्रकारच्या शेअरमध्ये गुंतवणूक न करता वेगवेगळ्या क्षेत्रांतील मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे त्यांना डायव्हर्सिफाइड फंडदेखील म्हणता येईल. "लार्ज कॅप' कंपन्यांचे…

उच्च शिक्षणासाठी सर्व काही

गेल्याच आठवड्यात मी रोटरी district च्या एका चांगल्या कार्यक्रमाला मडगाव येथे गेलो होतो. कार्यक्रम मोजक्या निमंत्रित लोकांसाठीच असल्याने कार्यक्रमस्थळ आटोपशीर पण चांगले असणार ह्याची खात्री होती.मडगाव शहराच्या मुख्य भागापासून पाच किमी अंतरावर व्ही.एम.साळगावकर institute of hospitality management ह्या नव्याने स्थापन झालेल्या collage मध्ये हा दीड दिवसाचा कार्यक्रम स्थानिक रोटरी club ने आयोजिला होता. ह्या संस्थेचे सर्व वरिष्ठ वर्गाचे विद्यार्थी आमच्या कार्यक्रमाचे संयोजन व व्यवस्थापन करण्यासाठी सन्माननीय मिर्झा सर ( संस्थेचे M. D.) यांच्या सूचनेनुसार मनःपूर्वक सहभागी होते. कुठेही आपल्याला “उगाचच काम करावे लागत आहे “ ही भावना कोणाही विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर पुसटपणेसुद्धा जाणवतही नव्हती. आमच्या सर्वांच्या गाड्या पार्किंग पर्यंत नेणे ,…

धोका वळणांचा !

कोकणातल्या बहुतांशी रस्त्यावरून फिरताना वेडीवाकडी वळणे , सावकाश जा हा फलक कायमच दिसतो. तसेच शेअर  बाजारात चढ-उतार ही नित्याची बाब आहे; पण आपण गुंतवणूकदार त्यास कसे सामोरे जातो, त्याच्यावर आपला फायदा व तोटा ठरत असतो. त्या अनुषंगाने आपण आपल्या गुंतवणुकीवर बारीक लक्ष ठेवणे हे महत्वाचे असते. गुंतवणूक मध्यम काळासाठी असो वा दीर्घकाळासाठी, तिच्यावर लक्ष ठेवावेच लागते;. अमुक कंपनी ही "ब्लू चिप' आहे, त्यामुळे त्यात नुकसान होणार नाही, ही मानसिकता गुंतवणूकदारांनी बदलली पाहिजे. बाजारातील तेजीला भुलून न जाता जागरूक राहून आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेत राहणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने 1) प्रवर्तकांनी कंपनीतील आपली हिस्सेदारी मोठ्या प्रमाणावर कमी करणे अथवा करत राहणे, 2)…

बँकिंग फंड घ्याच !!

  बँकांचे शेअर्स चांगला परतावा देतात हा माझा अनुभव. पण ह्याला बँक of इंडिया व महाबंक यांनी मात्र समभाग धारकांना धोका दिला आहे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या  आवडत्या शेअर्सची यादी काढली, तर त्या यादीत अनेक बॅंकांचे शेअर अग्रभागी येतील. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बॅंका महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योग- व्यवसायांच्या भरभराटीसाठी आवश्‍यक असलेले स्थिर भांडवल, खेळते भांडवल आणि सामान्य लोकांच्या सर्व कर्जांच्या गरजा भागविणाऱ्या बॅंकांचे महत्त्व भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत खूप आहे. यामुळेच उत्तम बॅंकांचे शेअर आपल्याकडे असावेत, असे प्रत्येकाला वाटणे साहजिक आहे. वेगाने व्यवसाय वाढणाऱ्या बॅंकेचा शेअर किती फायदा मिळवून देऊ शकतो, याचे उदाहरण पाहायचे असल्यास येस बॅंकेच्या…

पीपीफ बद्दल अधिक काही —

रक्षितता, करमुक्त व्याज व प्राप्तिकर कलम 80 सीअंतर्गत मिळणारी वजावट या तीन कारणांमुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय झाला आहे. असे असले तरी यातील गुंतवणूक दीर्घकालीन असून, (किमान 15 वर्षे) या मुदतीत खाते बंद करता येत नाही; मात्र गरज पडल्यास सुरवातीच्या 3 ते 6 वर्षांत आधीच्या दोन वर्षांच्या शिल्लक रकमेच्या 25 टक्केइतकी रक्कम कर्ज म्हणून घेता येते व सातव्या वर्षापासून आधीच्या वर्षीच्या शिल्लक रकमेच्या 50 टक्के किंवा त्याआधीच्या चौथ्या वर्षीच्या शिल्लक रकमेच्या 50 टक्के या दोहोंतील जी कमी रक्कम असेल, तेवढी रक्कम काढता येते. यामुळे गुंतवणुकीची तरलता (लिक्विडीटी) मोठ्या प्रमाणावर कमी होत होती. ही उणीव दूर…

गतिमानता !!

भारतीय अर्थव्यवस्था सध्या गतिमानतेच्या एका वेगळ्याच टप्प्यातून प्रवास करत आहे .व हा वेग जर असाच राहिला तर २०२२मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकते ,म्हणजेच जर्मनी व ग्रेट ब्रिटन यांना भारत मागे टाकू शकतो !! मुंबई पुणे या express way वर दर शनिवार / रविवार आणि सुट्टीच्या दिवशी traffic jam असतोच . कोणत्याही जिल्हास्तरीय किवा तालुक्याच्या शहरात वाहन कोठे उभे करावे हे पाहण्यासाठी किमान अर्धा तास शोधाशोध करावी लागते .हेच काय पण  साध्या गल्लीबोळातसुद्धा वाहतूक खोळंबा होतोच . शाळा सुटण्याची वेळ कशी टाळायची हा प्रश्न पडला नसेल असा वाहनचालक नसावाच . याचाच अर्थ हे सर्व रस्ते पाच वर्षात…

End of content

No more pages to load