अद्वितीय योजना —
टाटा कॅपिटलने गेल्या महिन्यात अद्वितीय आणि स्पेशल अशी ‘सलाम लोन्स’ ही योजना सुरु केली आहे . कंपनीच्या ‘डू राइट’ या ब्रँड उपक्रमांतर्गत ‘सलाम लोन्स’चे अनावरण झाले असून, ज्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही, अशा पात्र व्यक्तींना आता सहजपणे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ‘सलाम लोन्स’ हा पहिलावहिला असा उपक्रम आहे की कर्जाची मंजूरी घेण्याची ताकद आता प्रत्यक्ष लोकांच्याच हातात असणार आहे. उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आता टाटा कॅपिटलतर्फे सलाम केला जाणार आहे. ‘सलाम लोन्स’ या बोधवाक्यानुसार, या उपक्रमांतर्गत, ज्या लोकांनी खडतर परिस्थितीवर मात करून अनेकांसाठी आदर्श निर्माण केला आहे, तसेच आपले स्वप्न सत्यात उतरवण्याची ज्यांच्यात धमक आहे आणि त्याच…