फसू नका हं !

माझ्या ओळखीत एक गृहस्थ निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांची गुंतणूक वेगवेगळ्या फंडाद्वारे उचित सल्ला घेऊन केली व त्यांनी आपल्या पत्नीला Nominee पण केले. दुदैवाने त्यांचे निधन झाल्यावर पत्नीकडून या गुंतवणुकीवर सातत्त्याने लक्ष ठेवणे थोडेफार दुर्लक्षित झाले. दरम्यानच्या काळात पॅन-आधार व बँक खाते जोडल्याने फसवणूक करणाऱ्या टोळीने या महिलेचे आधार कार्ड, cell phone वाल्याकडून मिळवून दुसऱ्या खाजगी बँकेत खाते उघडले. त्यामध्ये तिचा कायमचा पत्ता तोच ठेवला व संपर्कीचा पत्ता नवीन(खोटा) टाकला. तसेच संपर्क क्रमांकही नवीन बदलून टाकला. नंतर मात्र नव्या बँक खात्याचा संदर्भ वापरून म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा संपर्क पत्ता/ दूरध्वनी क्रमांक व बँक खाते क्रमांकही बदलला. ज्यायोगे तिला तिच्या फोलिओमधील बदल लक्षात…

फायदा घ्यावाच — कसा ??

अनेक लोकांचे वाजवीपेक्षा कितीतरी जास्त पैसे त्यांच्या बॅंकेच्या चालू किंवा बचत खात्यात पडून असतात. चालू खात्यावर शून्य, तर बचत खात्यातील रकमेवर  ४ टक्के व्याज मिळते व आणि ते मोजण्याची बॅंकेची पद्धत निराळी आहे. त्यापेक्षा हेच पैसे जर म्युच्युअल फंडांच्या लिक्विड योजनांमध्ये ठेवले तर त्यावर अधिक व्याज किंवा परतावा मिळू शकतो. बॅंका सहसा फक्त सहा दिवसांपर्यंच्या मुदत ठेवी स्वीकारत नाहीत, परंतु लिक्विड योजनांमध्ये तुम्ही पैसे एक दिवसासाठीसुद्धा ठेवू शकता. तसेच ते एक दिवसाच्या "नोटिसी'मध्ये परत काढता येतात. पैसे थेट बॅंकेत जमा होतात. त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) रोज मोजले जाते, अगदी शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशीसुद्धा. त्यामुळे बहुतेक मोठ्या कंपन्या या योजनांमध्ये…

अटल पेन्शन — काय आहे ??

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व वृद्धापकाळातदेखील काम करणाऱ्या व्यक्तींना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या सुरक्षिततेबद्दल भारत सरकार चिंतित असल्याने अशा असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना "राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली'(नॅशनल पेन्शन सिस्टीम- एनपीएस)मध्ये सामील करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. वृद्धापकाळातील उत्पन्नाच्या सुरक्षिततेच्या धोक्‍याचे काहीअंशी निराकरण करण्यासाठी व त्यांच्या स्वेच्छेनेच त्यांच्या निवृत्तिपश्‍चात काळातील निश्‍चित उत्पन्नाची तजवीज करण्यासाठी केंद्र सरकारने 2010-11 या आर्थिक वर्षात "स्वावलंबन' योजना सुरू केली होती. तथापि, या योजनेत साठाव्या वर्षानंतर निवृत्तिवेतनाचे फायदे कसे मिळणार, यात स्पष्टता नसल्याचे निदर्शनास आले होते आणि म्हणून नवीन योजनेची आखणी करण्यात आली व यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी "अटल पेन्शन योजना' घोषित करण्यात आली. ज्या…

इंडेक्स फंड म्हणजे काय ?

मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक- 'सेन्सेक्‍स' आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक- 'निफ्टी' हे दोन निर्देशांक शेअर बाजारातील बहुतेक सर्व गुंतवणूकदारांना माहीत असतात. परंतु म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून या निर्देशांकामध्ये गुंतवणूक करता येते, हे थोड्या गुंतवणूकदारांना माहीत असते. अशा फंडांना 'इंडेक्‍स फंड' म्हणतात. उदाहरणार्थ, 'सेन्सेक्‍स'वर आधारित फंडामध्ये गुंतवणूक केल्यास 'सेन्सेक्‍स'मध्ये समाविष्ट असलेल्या 30 कंपन्यांच्या शेअरमध्ये अप्रत्यक्षपणे गुंतवणूक होऊन 'सेन्सेक्‍स'एवढाच परतावा मिळू शकतो. सेन्सेक्‍स आणि निफ्टी यांमधील अनुक्रमे 30 आणि 50 कंपन्या आपापल्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या असतात आणि ठराविक कालावधीनंतर या कंपन्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन एखादी कंपनी वगळली जाते आणि एखाद्या नव्या कंपनीचा समावेश होतो. त्यामुळे शाळेतील परिभाषेत सांगायचे झाले, तर 'सेन्सेक्‍स' आणि 'निफ्टी'…

लवकर निघा – सुरक्षित पोहोचा—

       लवकर निघा - सुरक्षित पोहोचा ------ गेल्याच आठवड्यात म्युच्युअल फंड संदर्भात एका कार्यशाळेत भाग घेण्याचा योग आला. कार्यशाळेत भाग घेतल्याने आपल्याला माहिती असलेल्या मुद्द्यांपेक्षा काही नवीन मुद्दे लक्षात येतात व काही मुद्द्यांकडे कसे पहावे याचा नवीन दृष्टीकोन मिळतो. या कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री. कार्तिकेयन यांनी SIP लवकरच सुरु केल्याने काय फायदा होऊ शकतो हे चांगल्या पद्धतीने सांगितले. समीर व सतीश हे दोन वर्गमित्र होते. बारावी झाल्यावर समीर अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी  दाखल झाला व सतीशने पदवीचे शिक्षण पूर्ण करून Finance Managment चे शिक्षण पूर्ण केले. नोकरी लागताक्षणी आपल्या उत्पन्नाचा आढावा घेऊन सतीशने वयाच्या २५ व्या वर्षी Retiredment Benfit Pension Plan…

करसवलत व शिक्षण कर्ज

काळानुसार महागाई ही सर्वच क्षेत्रांत वाढलेली आहे. या नियमाला शिक्षण क्षेत्रदेखील अपवाद नाही. अलीकडे शैक्षणिक खर्चांमध्ये प्रचंड वाढ झालेली असल्याने अनेकजण शैक्षणिक कर्ज घेताना दिसतात. अशा या शैक्षणिक कर्जावर प्राप्तिकर सवलतमिळते . कलम 80-ई वैयक्तिक करदाता सोडून इतर करदात्यांसाठी (जसे हिंदू अविभक्त कुटुंब, भागीदारी संस्था, कंपनी आदी) या कलमाखाली सवलत मिळत नाही. शैक्षणिक कर्जावरील भरलेल्या केवळ व्याजाचीच सवलत मिळते. शैक्षणिक कर्ज हे वित्तीय संस्था (बॅंक आदी) किंवा मान्यताप्राप्त संस्थांकडूनच घेणे अनिवार्य असते.  शिवाय, शैक्षणिक कर्ज हे उच्चशिक्षणासाठी घेतले गेलेले पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट अशी, की या कलमात कोठेही उच्च शिक्षण हे भारतातच घेतले गेले पाहिजे, असा उल्लेख नसल्यामुळे भारताबाहेर अर्थात…

काळजी नसावी –पण कशी ??

रिझर्व्ह बॅंकेच्या व्याजदरकपातीच्या धोरणामुळे सर्व बॅंकांनी आणि टपाल (पोस्ट) खात्याने आपल्या योजनांच्या व्याजदरात कपात केली आहे आणि ती यापुढेही चालू राहणार आहे. मात्र, दुसरीकडे महागाई वाढत चालली आहे. अशा वेळेस बॅंकेच्या किंवा पोस्टाच्या योजनांच्या व्याजावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होण्याची शक्‍यता आहे. कारण मिळणारे व्याज कमी-कमी होणार आणि खर्च मात्र वाढत राहणार. अशा वेळेला त्यांच्यापुढे दोनच मार्ग उरणार आहेत. एकतर खर्च कमी करणे किंवा कमी झालेल्या व्याजाची भरपाई करण्यासाठी अजून जास्त गुंतवणूक करणे. खर्च कमी करणे सर्वांनाच जमेल, असे नाही. मात्र, कमी होणाऱ्या व्याजाची भरपाई परत बॅंकेत किंवा पोस्टाच्या योजनांत कमी दराने जास्त गुंतवणूक करण्यापेक्षा जास्त व्याज किंवा…

पारदर्शकता !!

भारतातील पहिला म्युचुअल फंड स्थापन होऊन ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे व आज रोजी म्युचुअल फंडामध्ये साधारणपणे ४२ फंड घराणी कार्यरत आहेत व त्यांच्या दहा हजार पेक्षा जास्त योजनांमधून ६ कोटी लोकांनी रु २० हजार कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरी अथवा निमशहरी भागात म्युचुअल फंडाच्या खरेदी संबंधात अजूनही खूपच शिथिलता दिसते. तसेच या संबंधात जागरूकता निर्माण केलेल्या प्रयत्नांना सुद्धा म्हणावे तेवढे यश मिळाले नाही असा गेले ३ वर्षांचा माझा स्वता:चा अनुभव आहे. बरेच लोक अजूनही RD (आवर्ती ठेव), पिग्मी यामध्ये बचत करताना दिसतात पण ती बचत गुंतवणुकीत रुपांतरीत करण्यासाठी SIP करा असे सांगितल्यास थोडासा चेहऱ्यावर…

मराठी ” विक्रम “

देशातील सर्वांत मोठा भांडवली बाजार असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विक्रम लिमये यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे . शेअर बाजार म्हणजे केवळ सट्टा, आणि झटपट पैसे मिळविण्याचा मार्ग, असा एक गैरसमज आहे. त्यामुळेच ते आपले काम नाही , अशीच धारणा मराठी मनात  आढळते. परिणामतः या एका महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूकदारांपासून ते व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळीकडेच मराठी टक्का कमी प्रमाणात आढळतो. आता हळूहळू हे चित्र पालटत आहे. त्याची गती वाढविण्यासाठी लिमये यांच्यासारख्यांचे उदाहरण प्रेरणादायी ठरू शकेल. विक्रम लिमये यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतील "युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वानिया' आणि "व्हॉर्टन…

एस.आय.पी. बद्दल अधिक काही———-

ज्यांना थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणे जमत नाही, जोखमीचे वाटते, अशा मंडळींना म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो; पण म्युच्युअल फंडातही एकदाच एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी "सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन'च्या (एसआयपी) मार्गाने जात दरमहा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हिताचे ठरते. तरुण वयात थोडी जोखीम पत्करून, मुदत ठेवींऐवजी इक्विटी योजनांमध्ये जास्त रकमेचे "एसआयपी' केले, तर आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळू शकते; पण "एसआयपी' अधिक परिणामकारक आणि फायदेशीर होण्यासाठी काही बाबी जरूर लक्षात ठेवाव्यात. केवळ "एसआयपीं'ची संख्या जास्त ठेवल्याने जोखीम कमी होते, असे नाही. त्यामुळे वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या एकाच प्रकारच्या अनेक योजनांमध्ये "एसआयपी' करण्यापेक्षा लार्ज कॅप, मिड कॅप, सेक्‍टोरल, बॅलन्स्ड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या…

End of content

No more pages to load