लहानपण

मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या तुलनेत चांगल्या छोट्या कंपन्यांचे शेअर लवकर उसळी मारतात. शिवाय फारसा नावलौकिक आणि मोठ्या कामगिरीची पार्श्ववभूमी नसल्याने यापैकी अनेक लघुउद्योग अगदी कमी प्रीमियम रक्कम आकारून प्राथमिक बाजारात त्यांचे "आयपीओ' आणत असतात. त्यामुळे त्यांचे पीई गुणोत्तर देखील खूप आकर्षक असते. असे शेअर कमी किमतीत उपलब्ध असताना खरेदी केल्यास भविष्यात त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. अर्थात शेअर बाजारातील हजारो शेअरमधून नेमके असे चांगले "स्मॉल कॅप' कंपन्यांचे शेअर शोधून काढण्यासाठी अचूक अभ्यास गरजेचा असतो, जो सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शक्‍य होत नाही. त्याऐवजी स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात नियमितपणे गुंतवणूक करून वेगवेगळ्या क्षेत्रांतील चांगल्या छोट्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग सोपा आहे . थोडी…

काळाचा महिमा

काळाचा महिमा तुम्ही गाडी चालवता आहात अशी कल्पना करा व तुमच्या गाडीचा वेग १० किमी/तास असा आहे आणि तुमचा मित्रसुद्धा तुमच्याच बरोबर दुसऱ्या गाडीने ११ किमी/तास वेगाने निघाला आहे. 6 मिनिटा नंतर तुम्ही आणि तुमचा मित्र यामध्ये फक्त १०० मीटरचे अंतर असेल व या अंतरात तुम्ही तुमच्या मित्राला लगेचच गाठू शकाल किंवा एकमेकांशी भेट घेवून बोलूही शकाल. पण १ तासानंतर तुम्ही आणि तुमचा मित्र यामध्ये गाडीच्या वेगाइतका फरक पडून तुम्ही मित्रापेक्षा १ किमी मागे असू शकाल, व वाटल्यास तुम्ही मित्राला 2 ते 3 मिनिटात भेटूही शकता, पण याच वेगाने तुमची व तुमच्या मित्राची गाडी सुरु राहिल्यास १० तासानंतर तुम्ही दोघे…

महाभारत

अंधानुकरण करू नये अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्राचा पुत्र. मात्र तो एकटाच चक्रव्युहात प्रवेश करतो (युद्धभूमीवर तयार करण्यात आलेला मनुष्य—निर्मित भूलभुलैय्या) त्याला चक्रव्यूह भेदण्याचे तंत्र मात्र अर्धवट अवगत असते. या मागील पार्श्वभूमी अशी की, अभिमन्यू पोटात असताना अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूह भेदण्याचे तंत्र सांगतो. मात्र त्याचे बोलणे अर्ध्यावर आले असताना सुभद्रेला झोप लागते. त्यामुळे अभिमन्यूला चक्रव्यूह भेदण्याचे तंत्र अर्धवट अवगत होते. त्यामुळेच तो  तग धरू शकत नाही आणि त्याचा मृत्यू ओढवतो. गुंतवणूक परिघातही गुंतवणूकदारांनी बाजार अस्थिर असताना गांगरून अविचाराने पाऊल उचलू नये. एखाद्या गोष्टीचे अर्धवट ज्ञान चुकीच्या गुंतवणूक निर्णयाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे कठीण होऊ  शकते. एखाद्या योजनेत…

व्याज दर घसरत असताना—

अल्पबचत योजनांचे व्याज दर घसरत असताना म्युच्युअल फंडांमध्येही बचत खात्यासारखी वैशिष्टय़े असणारी तरल आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध केले आहेत. किंबहुना या पर्यायांनी गुंतवणूकदाराला बचत खाते आणि मुदत ठेवीच्या तुलनेत जादा परतावा दिला आहे. फंड घराण्यांकडून उपलब्ध सेव्हिंग्ज फंड योजनांनी ही किमया निश्चित साधली आहे. व्याजाचे दर झपाटय़ाने खाली येत आहेत. अशा स्थितीत स्थिर उत्पन्न प्राप्तीसाठी म्युच्युअल फंड हा नवा पर्याय गुंतवणूकदारांनी आजमावून पाहायला हवा, असे गुंतवणूक सल्लागारांचेही मत आहे. सेव्हिंग्ज फंडांचे तज्ज्ञ निधी व्यवस्थापक संशोधनावर भर देत फंडांनी गोळा केलेला निधी कॉर्पोरेट बाँडमध्ये आणि अन्य सुरक्षित रोखे पर्यायांमध्ये गुंतवितात. कंपन्यांच्या वित्तीय कामगिरीत सुधारणेच्या शक्यतेने त्या कंपन्यांच्या रोख्यांची पतधारणाही वाढून ही…

महाराष्ट्र आघाडीवर !!

म्युच्युअल फंड गुंतवणुकीत महाराष्ट्र सर्वांत आघाडीवर नोटाबंदीपूर्वी देशात (पॅन इंडिया) म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 14 लाख कोटी रुपये होती. नोटाबंदीनंतर ती 19 लाख कोटी रुपयांवर पोचली. दरवर्षी देशभरात "एसआयपी'च्या (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) माध्यमातून दरमहा 2 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक होत होती, ती आज 4 हजार 500 कोटींहून अधिक झाली आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यात आघाडीवर असलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे. 19 लाख कोटी रुपयांमध्ये एकट्या महाराष्ट्रातून 7 लाख 22 हजार 842 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यामध्ये एकट्या पुण्यातून 77 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. महाराष्ट्रात मुंबईपाठोपाठ सर्वाधिक म्युच्युअल फंडात पुणेकरांची गुंतवणूक होत  आहे. गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून बांधकाम…

पेसेन्स द्वारे सोपी कर्जे !!

मोबाईल आधारित कर्ज सुविधा   वित्तीय क्षेत्रातील नवोद्योगी उपक्रम ‘पे सेन्स’ने व्यक्तिगत कर्जप्राप्तीची प्रक्रिया अधिक सोपी आणि सहजसाध्य बनविली आहे. विशेषत: कोणतेही क्रेडिट कार्ड, कर्जविषयक पूर्वेतिहास नसणाऱ्या नवव्यावसायिक अथवा नव्याने नोकरीला लागलेल्या तरुणांसाठी अल्पतम कागदपत्रांसह पाच हजारांपासून ते एक लाखांपर्यंतचे व्यक्तिगत कर्ज तातडीने उपलब्ध करून देणारा हा पर्याय लोकप्रियही ठरत आहे. नुकतीच व्यावसायिक जीवनाला सुरुवात झाली आहे; पहिल्या नोकरीतून सुरू झालेल्या वेतनलाभासह अनेक स्वप्ने आकार घेत आहेत.  या नवतरुणाईच्या स्वप्न-आकांक्षांच्या पंखांचा पसारा अथांग आहे. कुणाला चालू नोकरीसह आपली निपुणता आणखी वाढविण्यासाठी नवे शिकत जाण्याची इच्छाआहे, तर कुणाला व्यावसायिक भरारीसाठी नव्या सामग्री व खेळत्या भांडवलाची गरज आहे. अशांसाठी ‘पे सेन्स ईएमआय’…

फायदे — म्युच्युअल फंड गुंतवणुकीपासून

सामान्य माणसाने सुद्धा आपली बचत योग्य सल्ल्याद्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणे अधिक फायद्याचे आहे त्याची कारणे आज विशद करण्यात येत आहेत. १.व्यावसायिक व्यवस्थापन : म्युच्युअल फंडांकरता जे पैसे जमा केले जातात त्याचे व्यवस्थापन मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडून  केले जाते.  एएमसीकडे मोठे कौशल्य आणि अनुभव असतो. त्यामुळे ते अर्थव्यवस्था, कंपन्या आणि बाजारपेठेचा नियमितपणे अभ्यास करत असतात. परिणामी ते गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेऊ  शकतात. हे करणे छोटय़ा किरकोळ गुंतवणूकदाराला करणे शक्य नसते. फंड व्यवस्थापकाकडे वेळ असतो आणि त्याचबरोबर माहिती गोळा करण्यासाठी, संकलन, संशोधन करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ असते तसेच ते विविध कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी बोलूही शकतात. २.गुंतवणुकीचे पर्याय आणि लवचीकता : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी…

Diversified Equity Fund म्हणजे काय?

 Diversified Equity Fund म्हणजे काय? Large Cap म्हणजे मोठ्या स्थिर असलेल्या कंपन्या. Mid Cap म्हणजे येत्या काही वर्षात मोठ्या उलाढालीकडे वाटचाल करीत असलेल्या कंपन्या व Small Cap म्हणजे काही वर्षातच Mid Cap व Large Cap या segment मध्ये जाऊ शकतील अश्या कंपन्या होत. या सर्व कंपन्यांमध्ये जे फंड आपली गुंतवणूक करतात त्या सर्व फंडांना “Diversified Equity Fund” असे म्हणतात. अशा फंडांना Flexi Cap फंड असेही  संबोधले जाते. या फंडातील मुख्य उद्देश गुंतवणूक वृद्धी हा असला तरी Large Cap मधील गुंतवणूक स्थैर्य देते व Mid Cap मधील गुंतवणूक बहुतांशी वृद्धी देते. काही फंड आपली थोडी गुंतवणूक DEBT प्रकारात सुद्धा करतात व…

UTI तर्फे नवी सोय

UTI तर्फे नवी सोय सध्या कोणत्याही म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा गुंतवणूक करणाऱ्याला किंवा दुदैवाने त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारालाच मिळतो. पण UTI च्या या नव्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्याच्या आई-वडिलांना सुद्धा लाभ मिळण्याची सोय या नव्या योजनेत आहे. या योजनेचे नाव आहे, “UTI FAMILY” – (Father And Mother I Love You) आपल्या वृद्ध आई किंवा वडिलांना या योजनेद्वारे दरमहा काही रक्कम देण्याची सोय यामध्ये असून आई किंवा वडील यांना या योजनेत सहभागी होताना कोठेही सह्या करण्यासाठी बाहेर पडण्याची सुद्धा आवश्यकता नाही. गुंतवणूकदार मुलाने आपली गुंतवणूक UTI Wealth Builder Fund किंवा UTI MIS Advantage Plan यामध्ये ठेवून दरमहा SWP (Systematic…

लार्ज कॅप फंड अनुभवावा !!

लार्ज कॅप फंड म्हणजे मोठ्या "बाहुबली " कंपन्यांचा समावेश असलेला फंड होय ! "लार्ज कॅप' कंपन्यांचे भागभांडवल आणि उद्योगविस्तार खूप मोठा असतो. त्यामुळे अशा शेअरमध्ये गुंतवणूक करणे तुलनेने सुरक्षित ठरते. शिवाय वर्षानुवर्षे नफ्यात चाललेल्या या कंपन्या लाभांश, बोनस शेअर, हक्कभाग (राईट शेअर) यासारखे फायदे गुंतवणूकदारांना नियमितपणे देत असतात, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा "लार्ज कॅप' म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना होतो. अशा फंडात दीर्घकाळासाठी नियमितपणे "एसआयपी'च्या मार्गाने गुंतवणूक करत राहणे, हा आर्थिक यश मिळविण्याचा राजमार्ग म्हणता येईल. उदाहरणार्थ, "एचडीएफसी टॉप 200' या "लार्ज कॅप' फंडामध्ये वर्ष 1997 ते 2016 या वीस वर्षांत दरमहा दहा हजार रुपये "एसआयपी' मार्गाने गुंतविलेल्या एकूण 24 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे…

End of content

No more pages to load