फंडांचे प्रकार तरी किती ?
आतापर्यंत संपादकीय या सदरामधून वेगवेगळ्या म्युच्युअल फंडासंदर्भात माहिती दिली आहे , पण अनेक वेळा किती प्रकारचे फंड आहेत अशी सुद्धा विचारणा होते . त्यादृष्टीने बहुतेक सर्व प्रकारच्या फंडांची माहिती यासोबत थोडक्यात देत आहे . मुदतबंद (क्लोज-एंडेड) योजना या योजना सर्वसाधारणपणे ३ वर्षे मुदत कालावधीच्या असतात. काही योजनांचा कालावधी ३ वर्षांपेक्षा अधिक मुदतीचाही असू शकतो. मुदतपूर्तीपूर्वी गुंतवणूक काढता येत नाही. बहुतांशी योजना या मुदतपूर्तीनंतर ओपन-एंडेड योजनेत परावर्तित होतात. खुली मुदतमुक्त (ओपन-एंडेड) योजना मुदत पूर्तता कालावधी नाही. गुंतवणुकीसाठी एका युनिटचे मूल्य (एनएव्ही) या आधारे केव्हाही खरेदी व विक्री करता येणे शक्य. इंटरव्हल योजना ओपन-एंडेड व क्लोज-एंडेड योजनांचे मिश्रण. ठरावीक कालावधीसाठी या…