वाचवा !!
महिंद्र म्युच्युअल फंड कर बचत योजना घ्या व कर वाचवा करदाते या वर्षीच्या कर नियोजनासाठी टॅक्स सेव्हिंग फंडांचा नक्कीच विचार करतील या अपेक्षेने ईएलएसएस फंड गटातील ही नवी योजना पहा महिंद्र म्युच्युअल फंडाची पहिली योजना असलेल्या महिंद्र लिक्विड फंडाला आत्ताच एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील ४२ म्युच्युअल फंडात पहिल्या वर्षांत मालमत्तेत २,५०० कोटींचा टप्पा गाठणारा महिंद्र म्युच्युअल फंड हा एकमेव म्युच्युअल फंड आहे. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक बँकिंग, वाहन निर्माते, वाहन उद्योगासाठी पूरक उत्पादनांचे निर्माते, तेल व वायूक्षेत्र, ग्राहकोपयोगी वस्तू या उद्योगक्षेत्रात आणि रोकडसुलभ रोखे गुंतवणुका आहेत. मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक व इन्फोसिस या पाच कंपन्यांत फंडाने…