म्युच्युअल फंडच का ?

  गेल्या तीन वर्षांत सरकारने अनेक सुधारणांवर अंमल सुरू केला आहे. ‘जॅम’ (जनधन, आधार, मोबाईल यांचे संक्षिप्त रूप) त्रिसूत्री, थेट अनुदान हस्तांतरण, वित्तीय शिस्त,  आणि थेट परकीय गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्रांचे दरवाजे खुले करणे ही त्यापैकी काही उल्लेखनीय पावले होत. पुढे जाऊन वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीची अंमलबजावणी आणि २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे ही धोरणे महत्त्वाचा कायापालट घडवून आणतील. इतर काही कठीण सुधारणांचा मार्गही खुला होण्याची प्रतीक्षा आहे,  बँकिंग क्षेत्राला एनपीए समस्येतून निर्णायक मोकळीक आणि काळा पैशाच्या समांतर व्यवस्थेचा पायबंदही सरकारकडून होईल अशी आशाआहे !! भारतीय रुपयाचे प्रति डॉलर विनिमय मूल्य ६० ते ६९ या आखूड टप्प्यात  आहे. या अत्यंत…

घसरते व्याजदर व मी

रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात केलेल्या पाव टक्का कपातीने घर अथवा वाहनासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना दिलासा मिळण्याबाबत स्पष्टता नसली तरी बँकांमध्ये मुदत ठेवी करणाऱ्यांना मात्र कठीण काळ अपरिहार्य दिसून येतो. सेवानिवृत्तीचा लाभ बँकांमध्ये ठेवरूपात ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि अन्य गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसणार आहे. बँकिंग अग्रणी भारतीय स्टेट बँकेने रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वीच सोमवारी आपल्या बचत खात्यावरील व्याज दरात कपात केली. खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असणाऱ्या खातेदारांना यापुढे चार टक्क्यांऐवजी ३.५ टक्के व्याज दर देण्याचा निर्णय बँकेने घेतला. गेल्या सहा वर्षांतील बँकेने बचत खातेदारांना देऊ केलेला हा सर्वात कमी व्याजाचा दर असून, तिच्या ९० टक्के खातेदारांना…

तपासून पहा

म्युच्युअल फंड खरेदी करताना खालील बाबी तपासणे अत्यावश्यक आहे !! *  फंड किती मोठा आहे हे तपासावं. अगदी छोटे फंड टाळावेत. फंडाचा खर्च किती टक्के आहे हे बघून घ्यावं. रेग्युलर प्लान हा डायरेक्ट प्लानपेक्षा खर्चीक असतो. परंतु जर आपल्याला नेटवरचे व्यवहार कळत नसतील तर म्युचुअल फंड डिस्ट्रिब्युटरकडून रेग्युलर प्लानमध्ये गुंतवणूक करावी. गुंतवणूक करण्यापूर्वी एक्झिट लोड समजून घ्यावा. लिक्विड फंडातून पैसे काढताना एक्झिट लोड लागत नाही. *  फंडाचे परतावे हे दीर्घकाळावर तपासावे. फक्त एक वर्षांचे परतावे बघून निर्णय घेऊ नये. फंडाची जोखीम तपासून घ्यावी : प्रत्येक फंडाचा बीटा नेटवर दाखवण्यात येतो. १ पेक्षा जास्त बीटा असणारा फंड जास्त जोखमीचा असतो आणि…

अधिक काही

आयपीओ खरेदी करावयाचे असल्यास अर्ज भरणे आवश्यक आहे. हा अर्ज सामान्यत: शेअर ब्रोकर, लिड मॅनेजर, सिंडिकेट सदस्य आणि कलेक्टींग बँककडून उपलब्ध होऊ शकतो. अर्ज, चेक/डिमांड ड्राफ्ट आयपीओ च्या कलेक्टींग बँकेमध्ये (नाव व पत्ते अर्जावर छापलेले असतात) त्यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. अपूर्ण/अयोग्य अर्ज नाकारले जाऊ  शकतात. आयपीओ खरेदीसाठी डिमॅट अकाऊंट असणे आवश्यक आहे. हे कोणत्याही मान्यताप्राप्त DP कडे असले तरीही चालते.  कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकदारास अर्जासोबत १०० % रक्कम(MARGIN) मार्जिन म्हणून भरावीच लागते. आयपीओची विक्री पूर्वनियोजित कालावधीत केली जाते आणि त्यानंतर ठराविक दिवशी त्याचे allotment केले जाते.  खरेदी करणाऱ्याचे बँक खाते ASBA (Application Supported by Blocked Amount) या स्वरूपाचे असणे बंधनकारक…

सोमवारची कथा

आटपाट नगरात राजाने दवंडी पिटवली . सर्व प्रजेने आपल्या घरचे दुध शंकराच्या देवळात आणावे . शंकराच्या देवळाचा गाभारा दुधाने भरावयाचा आहे . दुधाचे मोठे मोठे रांजण गाभाऱ्यात रिते झाले ,पण गाभारा काही भरेना . राजा चिंताग्रस्त झाला . एवढ्यात एक आजीबाई छोटासा दुधाचा पेला घेवून गाभाऱ्यात गेल्या , राजा मनात म्हणाला ,याने काय होणार ? पण काय आश्चर्य  , गाभारा दुधाने पूर्ण भरला !!! राजाने विचारले तेव्हा आजीबाई म्हणाल्या " गोठ्यातले वासरू , दारातले कोकरू, चुलीजवळच मांजर , घरातले बालगोपाल  या सर्वांच्या मुखी दुध घालून जे उरले ते देवाला दिले. आणि म्हणून तेच देवाला भावले .!! तसेच 21 एप्रिल 1996…

लक्ष्मीव्रत -भाग ४

श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना असतो . या महिन्यात कोणतेही शुभ कर्म सुरु केल्यास त्याचा चांगला लाभ होतो असे म्हणतात .सध्या शेअर बाजार हा उच्चतम पातळीवर असल्याने अनेकजण गुंतवणूक सुरु करू का ? हा प्रश्न विचारतात . फक्त एकरकमी गुंतवणूकीऐवजी दरमहा ठराविक गुंतवणूक (SIP ) करणे अत्यंत हितावह आहे. व नवख्यांनी या पद्धतीने म्युच्युअल फंडामध्ये प्रवेश करावा हा सल्ला !!   "एसआयपी'मध्ये दरमहा किती रक्कम गुंतवावी? अशी रक्कम सांगणे अवघड आहे. कारण "एसआयपी'ची रक्कम प्रत्येक गुंतवणूकदाराच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. आपले दर महिन्याचे खर्च भागवून उरलेल्या रकमेपैकी काही हिस्सा "एसआयपी'मध्ये गुंतवावा. याशिवाय आपले भविष्यातील उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवूनदेखील आपण "एसआयपी'ची…

शुक्रवारची कहाणी !!

श्रावण महिन्यात अनेकजण  व्रत वैकल्ये  करतात .या संकेतस्थळावर शुक्रवारच्या कहाणीच्या रूपाने संपत्ती निर्मिती  सम्बंधात कहाणी सांगण्याचे ठरवले आहे. आजची कहाणी ही SWP संबंधात असलेले गैरसमज दूर करण्याच्या निमित्ताने सांगितली  जात आहे . निवृत्तीपश्चात बहुतांश मंडळी बँकेच्या मुदत ठेवींवर अवलंबून असतात. दरमहा वेतनाद्वारे मिळणारे नियमित उत्पन्न थांबल्यानंतर उदरनिर्वाहासाठी आपल्या या बचतीवरील परतावा हाच या मंडळींचा आधार असतो. या पारंपरिक गुंतवणूक साधनांपेक्षा नियमित परतावा मिळविण्याचा म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील ‘एसडब्ल्यूपी’ अर्थात ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लान’ हा एक चांगला मार्ग आहे. ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लान’ याचा ढोबळ अर्थ – आपल्या बचतीतून नियमितपणे खर्चाला आवश्यक इतकी रक्कम काढून घेणे हाच आहे. सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लान (एसडब्ल्यूपी) ही अशी…

स्टार पहा !!

म्युच्युअल फंड खरेदी करताना सल्लागाराचा सल्ला घेतानाच आपण निवडलेल्या फंडाचे रेटिंग सुद्धा नेटवर पाहू शकतो.पण केवळ उच्च स्टार पाहून फंड खरेदी केल्यास थोडेफार नुकसानही होऊ शकते. वानगीदाखल काही मोजक्या फंडांचे रेटिंग सोबतच्या तक्त्यात दिले आहे ते पहा .Multiple Ratings That Leave You Bamboozled तक्ता पाहिल्यावर एकाच फंडाला वेगवेगळ्या रेटिंग agency नि थोडेफार भिन्न रेटिंग दिले आहे हे लक्षात येते. व ही भिन्नता का ? असाही प्रश्न मनात येतो.रेटिंग देताना कोणते parameter लक्षात घेवून व त्यांना किती weightage दिले आहे त्यावर रेटिंग मध्ये येणारी तफावत अवलंबून असते. तसेच फंड manager गुंतवणूक करताना किती धोका पत्करतो त्यावर सुद्धा रेटिंग मध्ये भिन्नता येवू…

प्रासंगिक !!

शेअर बाजाराचा राष्ट्रीय निर्देशांक-"निफ्टी' बहुचर्चित 10 हजार अंशाला गवसणी घालण्याच्या तयारीत असताना, बाजारात "करेक्‍शन' येण्याची चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे. या भीतीपोटी नफावसूल करून बाजारापासून दूर राहणे पसंत करणे हे योग्यही आहे. परंतु, बाजारात मोठे "करेक्‍शन' लगेच सुरू होण्याची शक्‍यता दिसत नाही. "करेक्‍शन' येण्याची पूर्वसूचना देणारी परिमाणे तसे संकेत दर्शवत नाहीत. परकी व देशी वित्तीय संस्थांचा बाजारातील गुंतवणुकीचा ओघ कायम आहे. एप्रिल ते जून महिन्यात परकी गुंतवणूकदारांनी विक्री केली असतानाही, देशी गुंतवणुकीच्या आधारे "निफ्टी' 5.5 टक्के वाढला. सध्या दोघेही खरेदी करीत आहेत. या खरेदीमागे, पुढील महिन्यात रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करण्याची शक्‍यता, संपूर्ण देशात अपेक्षेप्रमाणे पडत असलेला पाऊस, वस्तू व सेवाकराची…

लक्ष्मीव्रत -भाग 3

  २०१७ या वर्षात म्युच्युअल फंड व्यवसायातील एकूण मालमत्तेने एकोणीस लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला. म्युच्युअल फंडांची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी आहे. २००७ या वर्षात साधारणतः तीन लाख कोटी रुपये एवढी एकूण मालमत्ता असलेला हा व्यवसाय अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीत पाचपट वाढला, यातूनच त्याची वाढती लोकप्रियता लक्षात येते. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडिया (ऍम्फी) या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2016 या वर्षात म्युच्युअल फंडातील एकूण खात्यांची संख्या पाच कोटींपेक्षा अधिक झाली आहे. यापैकी जवळजवळ चार कोटी खाती ही इक्विटी फंड आणि संबंधित फंडामध्ये आहेत. याशिवाय सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पर्यायामध्येदेखील एकूण खात्यांची संख्या याच…

End of content

No more pages to load