एनएफओ म्हणजे काय?

एनएफओसाठी अर्ज भरणे योग्य आहे काय? न्यू फंड ऑफर्स (एनएफओ) या नव्याने गुंतवणूक करण्यासाठीच्या योजना असतात. या योजना अॅसेट मॅनेजमेंट कंपनीकडून घोषित केल्या जातात. शेअर्स किंवा सरकारी रोखे बाजारातून विकत घेण्यासाठी व त्याद्वारे लोकांकडून भांडवल उभारणी करण्यासाठी एनएफओचा उपयोग होतो. आपल्या योजनांचे सर्व प्रकार पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडाकडून एनएफओ बाजारात आणली जाते. यातील मर्यादित कालावधीसाठीच्या एनएफओ ३ ते ३.५ वर्षांसाठी असतात. या काळात गुंतवणूकदार युनिट्स खरेदी करू शकतात. आयपीओ व एनएफओ यांच्यात अनेक फरक आहेत. आयपीओ हे भांडवल उभारणीसाठीच बाजारात आणले जातात. एनएफओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून पैसा उभारला जातो, ज्याची गुंतवणूक पुन्हा सरकारी रोख्यांमध्ये केली जाते. ही गुंतवणूक आधी जाहीर केलेल्या…

श्रीगणेशा !!

बचत खात्याऐवजी म्युच्युअल फंडाचे लिक्विड फंड अधिक परतावा देणारे व सोयीचे आहेत. प्रत्येक फंड घराण्याच्या किमान एका फंडाला इन्स्टंट रिडम्प्शन सुविधा देणे ‘सेबी’ने सक्तीचे केले आहे. त्यामुळे ही गुंतवणूक खूप छानच आहे. इतकी त्यातून पैसा काढून घ्यायचे म्हटले तर अगदी पुढील १५ मिनिटांत बँक खात्यात पैसा जमाही झालेला दिसून येईल. लिक्विड फंड हे आधुनिक युगातील बचत खाते असून एका टिचकीवर गुंतवणूक करणे व लिक्विड फंडातून पैसे काढून घेणे शक्य झाले आहे. ज्या म्युच्युअल फंडाची मोबाईल अ‍ॅप आहेत त्या म्युच्युअल फंडांत मोबाईलचा वापर करून गुंतवणूक करणे शक्य आहे. बँकांच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर उगमस्थानीच कर (टीडीएस) कापला जातो तर बँकेच्या मुदत ठेवींऐवजी…

आर्थिक नियोजन कसे कराल?

योग्यप्रकारे आर्थिक नियोजन कसे कराल? सर्वसामान्य कुटुंबप्रमुखाने आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या वेळीच ओळखून खाली दिल्यानुसार नियोजन केल्यास कोणताही ताणतणाव न येता हसत खेळत  आर्थिक नियोजन योग्य प्रकारे होऊ शकते. आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी  जास्तीतजास्त ३०%च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे.   ३०% रक्कम ही बँक कर्ज, देणी ई. साठी ठेवावी.   ३०% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी बचत केली पाहिजे.   उरलेले फक्त १०% रक्कम ही आपल्या मानोरंजनासाठी वापरली जायला हवी.   कमीतकमी पुढील ६ महिन्यांचा घर- ऑफिस खर्चाची तरतूद अगोदरच असायला हवी, जेणेकरून नोकरी गेली, किंवा व्यवसायात मंदी आली तरी ही त्यावर ६ महिने पुढील सोय होईस्तोवर आपले खर्च चालतील.…

अत्यंत महत्वाचे !!

सेबीने प्रत्येक फंड घराण्याला ‘इंस्टंट रिडम्प्शन’ची सुविधा असणारा फंड गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. प्रत्येक फंड घराण्याचा एक तरी फंड ‘इंस्टंट रिडम्प्शन’ सुविधा असलेला आहे. गुंतवणूक मूल्याच्या ९५ टक्के किंवा ५० हजार रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल तितक्या रकमेची ‘इंस्टंट रिडम्प्शन’ची सुविधा गुंतवणूकदारांना यातून उपलब्ध होऊ  शकेल. फंड घराण्याचा संकेतस्थळावर अथवा फंड घराण्याच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे गुंतवणूकदार रिडम्प्शन रिक्वेस्ट नोंदवू शकेल. ही नोंद म्युच्युअल फंडाच्या प्रणालीमध्ये नोंदली गेल्यानंतर मागील उपलब्ध मालमत्ता मूल्यांनुसार तितक्या किमतीची लिक्विड फंडाची युनिट्स विकून जमा झालेली रक्कम गुंतवणूकदारच्या म्युच्युअल फंडाकडे नोंद झालेल्या बँक खात्यात जमा होते. दिवसाचे २४ तास व आठवडय़ाचे सातही दिवस ही…

म्यूच्युअल फंडावर कर्जही उपलब्ध !!

इक्विटी किंवा हायब्रिड म्युच्युअल फंडांच्या युनिटवर कर्ज घेता येते. यासाठी ही युनिट्स बँकेत किंवा बिगरबँक वित्तसंस्थेत (एनबीएफसी) तारण म्हणून ठेवून हे कर्ज घेता येते. हे कर्ज परत करताना कर्ज देणाऱ्या वित्तसंस्थेने मंजूर केलेले व्याज द्यावे लागते. तुम्ही किती कर्ज घेता व किती काळासाठी घेता, त्यानुसार या म्युच्युअल फंडांवर १० ते ११ टक्के व्याजदर आकारला जातो. कर्ज घेतल्यामुळे तुमच्या म्युच्युअल फंडाचे युनिट्स गहाण असतील, तर ते तुम्हाला विकता येत नाहीत, तसेच त्यांचे स्विचिंगही करता येत नाही. कर्ज काढताना ते इक्विटी म्युच्युअल फंडांवर घ्यावे. ते लिक्विड किंवा डेट फंडावर घेऊ नये. म्युच्युअल डिमॅट स्वरूपात असेल, तुमच्या कर्जाची मागणी स्वीकृत झाली असेल, तर…

सिस्ट‌मिॅटिक ट्रान्स्फर ( STP ) प्लॅन म्हणजे काय?

सिस्ट‌मिॅटिक ट्रान्स्फर ( STP ) प्लॅन म्हणजे काय? एखाद्या गुंतवणूकदाराला एक लाख रुपये एसटीपीद्वारे इक्विटी फंडात गुंतायचे असतील, तर प्रथम त्याला एखादा डेट फंड निवडणे गरजेचे आहे. त्यानंतर किती रक्कम इक्विटी फंडात हस्तांतर करायची व केव्हा करायची ते ठरवायचे असते. उदाहरणार्थ, गुंतवणूकदार दर महिन्याच्या पहिल्या तारखेस १० हजार रुपये पुढील दहा महिन्यांसाठी हस्तांतर करायचे ठरवू शकतो, किंवा दर आठवड्याला २५०० रुपये हस्तांतर करायचे ठरवू शकतो. अशी हस्तांतर सुविधा दैनंदिन, साप्ताहिक, मासिक व त्रैमासिक कालावधीसाठी उपलब्ध असते. एसटीपीमध्ये इक्विटी फंडात हस्तांतर होईपर्यंत पैसे लिक्विड फंडातच जमा राहतात. या पैशावर मिळणारा परतावा हा साधारणतः बँकेच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा अधिक असतो. बऱ्याच…

कोल्ह्याला द्राक्षे आंबट!!

 पैश्याकडेच पैसा जातो !  खूप पैसे मिळवून काय करायचे ? असे म्हणत " कोल्ह्याला द्राक्षे आंबट " या वृत्तीने श्रीमंतीकडे पाहत स्वतःच्या परिस्थितीमुळे निराश विचार करत व उदास जीवन जगणार्यांनी आपल्या विचारात व आचरणात थोडा बदल केला तर मध्यमवर्गीयसुद्धा स्वतःची आर्थिक स्थिती बदलू शकतात आणि आर्थिक स्थैर्य सुद्धा प्राप्त करू शकतात. पण यासाठी कठोर आर्थिक शिस्त अंगी आणणे महत्वाचे आहे . व या शिस्तीची अत्यंत सोपी दहा तंत्रे वाचकांना धनलाभ तर्फे सांगण्यात येत आहेत. दरमहा पगाररुपी FIX उत्पन्न हातात येत असल्याने कोणतीही किमती व मौल्यवान गोष्ट खरेदीसाठी नोकरदार मंडळी EMI चा पर्याय स्वीकारतात व १२% चक्रवाढ व्याजाचा किडा आपल्या उत्पन्नाला…

SIP व गैरसमजुती

बरेच गुंतवणूकदार अजूनही SIP हाच एक म्युच्युअल फंड समजतात . तसेच SIP संदर्भात अनेकांच्या काही भ्रामक कल्पना चर्चेमधून समजून आल्या . त्या सर्वांचे एकत्रीकरण करून खालील मुद्द्याद्वारे त्यांचे स्पष्टीकरण सोबत देत आहे . मात्र यामध्ये मराठीतून सर्व माहिती देण्याऐवजी इंग्लिश मधून ही माहिती देत आहे . मुद्दे व स्पष्टीकरण Systematic Investment Plans (SIPs) work best for the small retail investor. SIP might be the answer for all types of investors since it does not have a bias towards high or low value investments. All that it requires is regular and disciplined savings. It is best to not enter into SIPs…

सिप व करनियोजन

कर नियोजानासाठी SIP हा उत्कृष्ठ पर्याय समाजाला जातो इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) : म्युच्युअल फंडांकडून सुरु असलेल्या  या योजनेमध्ये गुंतवणूक ही किमान ३ वर्षांसाठी असली पाहिजे. कलम ८० सी अंतर्गत जे इतर गुंतवणूक पर्याय आहेत त्यामध्ये ‘ईएलएसएस’चा आवश्यक गुंतवणूक कालावधी सर्वात कमी आहे. मुदत ठेवींमध्ये किमान ५ वर्षे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी) साठी १० वर्षांपर्यंत गुंतवणूक धारण करावी लागते. ईएलएसएसमधील गुंतवणुकीत शेअर बाजारातील गुंतवणुकीसारखी वृद्धी क्षमता आहे. इतर गुंतवणुकीच्या पर्यायात वाढ होत नाही. ईएलएसएसवर मिळणारा लाभांश करमुक्त आहे. तीन वर्षांनंतर ईएलएसएसमधील गुंतवणूक विकली तर त्यावर झालेल्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही. कारण ईएलएसएसच्या विक्रीवर शेअर उलाढाल कर (एसटीटी)…

SIP सही है!!

SIP संबंधात अनेकांनी विचारणा केली असल्याने त्याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी देणेत येत आहे . नियमित कालावधीनंतर (सामान्यतः दर महिन्याला) ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवण्यासाठी राबवण्यात येणारी प्रक्रिया म्हणजे एसआयपी होय. आधी ठरवल्यानुसार, एसआयपी पद्धतीने गुंतवणूकदार युनिट्स विकत घेतात. एसआयपीमुळे गुंतवणूकदारांना भांडवल बाजारात उतरण्याची संधी मिळते, बाजारात उतरण्याची वेळ साधता येते तसेच त्यांच्या गुंतवणुकीला शिस्त लावण्याचीही संधी मिळते. खुल्या म्युच्युअल फंडासाठी केव्हाही एसआयपी सुरू करता येते. एसआयपीसाठी एक अर्ज भरून तो म्युच्युअल फंडाच्या केंद्रावर द्यावा लागतो. एसआयपीचा अर्ज भरल्यापासून एसआयपी सुरू होईपर्यंत १० ते ३० दिवसांचा कालावधी जातो. या काळात बँक तुमची एसआयपी रजिस्टर करते व सुरू करते.  किती काळासाठी…

End of content

No more pages to load