ओटीएम (वन टाइम मॅन्डेट) म्हणजे काय?

म्युच्युअल फंडांमध्ये 'एनएसीएच' किंवा ओटीएम (वन टाइम मॅन्डेट) म्हणजे काय? म्युच्युअल फंडाच्या योजनेसाठी एकगठ्ठा रक्कम भरण्यासाठी किंवा 'एसआयपी'च्या साह्याने रक्कम भरण्यासाठी 'एनएसीएच' ही एकदाच नोंदणी करण्याचा गुंतवणूकदाराचा अधिकार (मॅन्डेट) आहे. 'एनएसीएच' अंतर्गत नोंदणी करून गुंतवणुकीसाठी तुम्ही कोणत्या बँकेतून पैसे योजनेमध्ये ठराविक काळानंतर परस्पर देणार हे तुम्हाला सांगायचे आहे. ही बँक तुम्ही आधी तुमच्या फोलिओमध्ये नोंदवलेलीच असणार आहे. या सुविधेअंतर्गत १ लाख रुपयांपर्यंत रक्कम बँक खात्यातून योजनेकडे वळवण्याच्या सूचना तुम्ही देऊ शकता. हा अधिकार 'एनएसीएच' अंतर्गत तुम्ही ठराविक काळासाठी देऊ शकता किंवा तुम्ही रद्द करेपर्यंत देऊ शकता. एका म्युच्युअल फंडाच्या फोलिओसाठी एक अधिकार देणे अभिप्रेत आहे. वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांतून तुमच्या 'एसआयपी'…

महत्वाचा सल्ला

  “धनलाभ” हे संकेतस्थळ सरू झाल्यापासून संपादकीयमधून म्युच्युअल फंडासंदर्भात  खरेदी संदर्भातील अनेक पध्दतीची माहिती प्रसिद्ध केली आहे. वाचक या माहितीचा लाभ घेऊन स्वतःचा फायदा कोणत्या फंडामधून होऊ शकतो हेही अजमावताना दिसत आहे . आज कोणत्या फंडाद्वारे नव्याने गुंतवणूक सुरु करावी यासाठी काही चांगले फंड सुचविण्याचा मानस आहे. शेअरबाजारने आज सर्वोच्च पातळी गाठलेली असताना या सर्व फंडामध्ये SIP किंवा STP करणे हे सुज्ञपणाचे लक्षण होऊ शकेल हे मात्र नक्की !! फंडाचे नाव IDFC Sterling Equity Fund (Growth)  या फंडाची गुंतवणूक लीडर्स व चॅलेंजर्स समभागामध्ये आहे. LIC Mutual Fund Midcap Fund या फंडाची मालमत्ता सध्या २०० ते ३०० कोटी रुपयांची असली तरी…

‘रेग्युलर’ आणि ‘डायरेक्ट’

  म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे ‘रेग्युलर’ आणि ‘डायरेक्ट’ असे दोन पर्याय आहेत. या दोन पर्यायांमध्ये फरक काय आणि यापैकी कुठला पर्याय गुंतवणुकीसाठी योग्य?   ‘सेबी’ने २०१० मध्ये फंड  मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना आपल्या योजना ‘डायरेक्ट’ आणि ‘रेग्युलर’ पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. ‘डायरेक्ट’ म्हणजे मध्यस्थांशिवाय खरेदी करता येऊ शकणाऱ्या योजना आणि रेग्युलर म्हणजे मध्यस्थांमार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या योजना आहेत. म्युच्युअल फंड योजनेच्या गुंतवणुकीचा हेतू, पोर्टफोलिओ वगैरे बाबी दोन्ही प्रकारात सारख्याच असतात. डायरेक्ट प्लानमध्ये वितरकाला दिले जाणारे कमिशन, ट्रेल फी, व्यवहाराचा खर्च आदींचा समावेश नसतो. गुंतवणूकदार मध्यस्थाशिवाय म्युच्युअल फंड घराण्याकडून थेट खरेदी करू शकतो. प्रत्येक योजनेचा मालमत्ता व्यवस्थापनाचा विशिष्ट खर्च असतो. हा…

फार्मा सेक्टर

जर का तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला दिसून येईल कि फार्मा सेक्टर मधील जवळपास सर्वच शेअर्सच्या किंमती या त्यांच्या उच्चतम पातळीच्या तुलतेन जवळपास ४०% झालेल्या आहेत.  हीच ती वेळ आहे या सेक्टरमधील शेअर्स असणाऱ्या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची. जर का तुमची ३ ते ४ वर्षे वाट पाहण्याची तयारी असेल तर तुम्ही SBI Pharma Fund, Reliance Pharma Fund or UTI Pharma & Healthcare Fund यापैकी कोणत्याही योजनेत किंवा तिन्ही योजनेत एकरकमी गुंतवणूक करू शकता. माझ्या मते पुढील ३ ते ४ वर्षात तुम्ही गुंतवलेल्या पैशाचे मूल्य दुप्पट किंवा अगदी तिप्पट सुद्धा होऊ शकेल. मात्र अल्प काळात गुंतवणुकीचे मूल्य कमी सुद्धा होऊ…

कोणता balanced फंड घ्यावा ??

कोणताही फंड निवडताना खालील महत्वाच्या बाबी पहाव्यात . त्याची एकूण मालमत्ता किती आहे ? फंड व्यवस्थापनाचा खर्च किती आहे ? त्यामध्ये equity चे समभाग कोणते व  कसल्या शाखांचे आहेत ? तसेच त्यांचे rating कशा प्रकारचे आहे ? सध्या बँकांचे व्याजदर कमी झाल्याने बँकेत फिक्स ठेवी ठेवणारे लोक balanced फंड खरेदी  करताना दिसत आहेत. पण बॅलन्स्ड फंडांच्या गुंतवणुकीत मिड कॅप असतील तर माझी गुंतवणूक सुरक्षित आहे का, हा विचार महत्वाचा आहे .केवळ परतावा मोठा आहे म्हणून एखादा फंड निवडावा व त्यातील समभाग जर midcap असतील तर बाजार घसरत असताना या फंडाचा परतावा हा निश्चित कमी होणारा असणार आहे हे लक्षात घेवून…

SIP खंडित झाल्यास —

SIP खंडित झाल्यास तुमच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसेल तर एसआयपीसाठी बँकेला म्युच्युअल फंडाकडून करण्यात आलेली विनंती बँकेकडून नाकारली जाईल आणि त्या महिन्यातील तुमची एसआयपी पूर्ण होणार नाही. एसआयपी रद्द झाली किंवा पैसे भरले गेले नाहीत म्हणून संबंधित फंड हाउसकडून कोणताही दंड आकारला जात नाही. मात्र, तुमच्या बँकेकडून ईसीएस (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम) चुकल्याबद्दल तुम्हाला दंड आकारला जाईल. हा दंड प्रत्येक बँकेनुसार बदलता असतो. तुमची एसआयपी सुरूच राहील आणि पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा बँकेकडे म्युच्युअल फंडाकडून विनंती केली जाईल. एकामागून एक असा तीन एसआयपी चुकल्यासच फंडाकडून बँकेला एसआयपीसाठी विनंती करणे बंद होईल आणि त्यानंतर तुमची एसआयपी बंद होईल. काही फंड घराण्यांनी…

नामांकन – Nomination -सुविधा

nomination म्हणजेच नामांकन केले असल्यास गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर संबंधित नामांकित व्यक्तीकडे गुंतवणुकीचे हस्तांतरण करणे सोपे जाते. नामांकन केले नसेल तर मात्र गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर या गुंतवणुकीवर दावा करणाऱ्या त्याच्या कायदेशीर वारसाला  असा दावा करताना अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्ये वैध वारस प्रमाणपत्र व अन्य वारसांकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन ते सादर करावे लागते. फंडधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या पैशांची  काळजी घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करणे म्हणजे नामांकनाची प्रक्रिया होय. म्युच्युअल फंडासाठी गुंतवणूकदार एखाद्या व्यक्तीचे नामांकन करू शकतो किंवा म्युच्युअल फंडांचे युनिट्स डिमॅट स्वरूपात असल्यास अशा डिमॅट खात्यासाठी तो नामांकन करू शकतो. नामांकन करण्यासाठी योग्य व्यक्ती ही गुंतवणूकदाराच्या कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा विश्वासू व्यक्ती असू…

सुलभता अनुभवावी

म्युच्युअल फंड उद्योग आपली संपूर्ण प्रणाली अधिक कार्यक्षम व विनासायास बनविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या भूमिकेबद्दल अधिकाधिक सजग बनला आहे.अचूक व अत्यंत सोप्या पद्धतिचे व्यवहार हा मूलमंत्र सर्वच म्युच्युअल फंडानी ग्राहकांना जवळजवळ विनामोबदला देवू केला आहे. आणि यावर BSE STAR MF या platform वरून तर सर्वच व्यवहार हे पेपरलेस झाले आहेत !! व्यवहार सुलभता : जलद, कार्यक्षम आणि कागदरहित व्यवहार सक्षम करण्यासाठी, म्युच्युअल फंड उद्योगाने  फोलिओ निर्मिती अत्यंत सुलभ केली आहे . वैध कागदपत्रे असलेल्या ऑनलाइन बँकिंग सुविधेचा उपयोग करणारा एखादा गुंतवणूकदार अगदी काही मिनिटांमध्ये म्युच्युअल फंडात व्यवहार करू शकतो. हे व्यवहार संकेतस्थळ किंवा मोबाइलचा वापर करून केले जाऊ  शकतात.  गुंतवणूकदारांना त्यांच्या स्मार्टफोनचा…

SIP च का ??

निर्देशांक उच्च पातळीवर असतांना गुंतवणूकदार नवीन गुंतवणूक करण्यास घाबरतात. अशा  गुंतवणूकदारांना बाजार नजीकच्या काळात घसरेल आणि घसरलेल्या बाजारात मी नवीन गुंतवणूक करेन असे सारखे वाटते.मात्र प्रत्यक्षात हा गुंतवणूकदार एका  तेजीला मुकतो. बाजारात गुंतवणुकीचा कोणीच मौका साधू शकलेले नाही. बाजारात गुंतवणुकीची वेळ साधण्याचे उत्तम धोरण म्हणजे एसआयपी किंवा नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या मार्गाने गुंतवणूक करणे. बाजारातील चढ उतारांना सामोरे जाण्यासाठी एसआयपी सारखे दुसरे प्रभावी साधन नाही. एसआयपी केवळ गुंतवणुकीची संधी साधण्यासाठी नसून गुंतवणूक करण्याचा एस शिस्तबद्ध मार्ग आहे. गुंतवणुकीचा निर्णय न घेणे किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचे टाळणे या सारखी चूक असू शकत नाही. गुंतवणुकीचा निर्णय रहित करणे म्हणजे चक्रवाढ व्याज या संकल्पानेकडे…

स्टार एम एफ पहा !!

BSE या सर्वात जुन्या exchange ने म्युच्युअल फंड खरेदीसाठी STAR MF ही सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सुरु केली असून त्याद्वारे म्युच्युअल फंडाची युनिट्स डिमॅट स्वरूपातठेवता येऊ शकतात !! त्याचे फायदे पहा !! १. एकाच डिमॅट खात्यात शेअर्स व म्युच्युअल फंड युनिट्सचे विवरण बघण्याची सोय. २. आपले नामनिर्देशन, बँक खात्यातील बदल, पत्ता/जागा बदलण्याचा दाखला आपण फक्त एका ठिकाणी म्हणजे डिपीला पत्र देऊन बदलू शकतो. सध्या असे करायचे तर आपणास जेवढय़ा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक आहे, त्या सर्व फंड घराणे/ एएमसींना वेगवेगळे पत्र द्यावे लागते. ३. नवीन युनिट्स घेण्यासाठी आपण आपल्या ब्रोकरला फोन करून ती खरेदी करू शकता आणि जसे शेअर्स जमा होतात, त्याचप्रमाणे…

End of content

No more pages to load