गुंतवणूकदार म्हणून आपण —-

गुंतवणूकदार म्हणून आपण आर्थिक विश्वात उतरत असू तर, आर्थिक विश्लेषकांकडून वापरल्या जाणाऱ्या आर्थिक संज्ञांचे ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आर्थिक संकल्पनाही कळणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने EQUITY , DEBT, PROFIT, LOSS,depreciation या शब्दाबरोबरच गुंतवणुकीच्या  अनेक शब्दांच्या भाषा कळणे  अत्यावश्यक आहे !! यासंदर्भातील काही मुद्दे पहा !! कामकाजातून मिळणारे उत्पन्न आर्थिक अहवालातील हा सर्वात महत्त्वाचा घटक. कंपनीच्या विविध कामकाजांमधून मिळणारा एकूण महसूल या घटकामुळे आपल्याला कळतो. उत्पादन करणाऱ्या व व्यापार करणाऱ्या संस्थांनी केलेली विक्री यातून कळते तर, सेवा देणाऱ्या संस्थाच्या बाबतीत सेवा दिल्याबद्दलचा मोबदला यातून कळतो. या घटकावरून कंपनीचा आकार कळतो. कंपनी दोन प्रकारच्या कामकाजामध्ये सक्रिय असेल तर, त्या प्रत्येक…

कट-ऑफ टाइम

कट-ऑफ टाइम म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार युनिट खरेदी करतात, युनिट विकून त्यांचे पैसे घेतात किंवा एका योजनेकडून दुसऱ्या योजनेकडे युनिट फिरवतात (स्विच करतात) त्यावेळी या प्रत्येक युनिटची किंमत म्हणजेच निव्वळ मत्ता मूल्य (एनएव्ही) होय. एखादा व्यवहार करण्यासाठी कोणत्या वेळी विनंती करण्यात येते त्यावर त्या युनिटची एनएव्ही अवलंबून असते. एनएव्ही मिळण्याची वेळ म्हणजेच कट-ऑफ टाइम होय. लिक्विड फंड, डेट फंड व इक्विटी फंड यांच्यासाठी कट-ऑफ टाइम वेगवेगळा असतो. लिक्विड फंडांसाठी अन्य फंडांपेक्षा वेगळा कट-ऑफ टाइम असतो. दुपारी दोन वाजेपर्यंत होणाऱ्या गुंतवणुकांसाठी युनिट्सचे वाटप आधीच्या दिवसाच्या एनएव्हीनुसार केले जाते. यामुळे आधीच्या दिवसाची एनएव्ही मिळणारे केवळ लिक्विड फंडच असतात. दुपारी तीन वाजेपर्यंत पैसे काढून…

बॅलन्स्ड फंड -अधिक माहिती घ्या !!

बॅलन्स्ड फंड हा हायब्रीड फंडाचा एक प्रकार आहे. हे फंड इक्विटी व डेट अशी मिश्र गुंतवणूक करतात. इक्विटी केंद्रीत बॅलन्स्ड फंडांमध्ये इक्विटीचे प्रमाणा ६५ ते ७५ टक्के असते. उर्वरित गुंतवणूक डेट प्रकारात असते. निव्वळ इक्विटी फंडाच्या तुलनेत यांचे जोखमीचे प्रमाण कमी असते. म्युच्युअल फंडांत प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांना बॅलन्स्ड फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला  व्यवस्थापक  देतात. कार्यपद्धती यामधील इक्विटी हा घटक दीर्घकालीन परतावा देतो तर डेट घटक तुमच्या पोर्टफोलिओला स्थैर्य देतो. यामुळे इक्विटी किंवा डेट यापैकी कोणालाही भांडवल बाजार घसरण्याता फटका बसला तरी गुंतवणूकदारांना जोखीम उचलावी लागत नाही. बाजार वरच्या दिशेने वाटचाल करत असताना फंड व्यवस्थापकांना कमाल पातळी स्थिर ठेवण्यासाठी इक्विटी विकावी…

कसा असावा सल्लागार ?

अनेक गुंतवणूकदारांना स्वतःच्या उत्पन्नाविषयी, आर्थिक गरजांविषयी अनेक जणांशी बोलायला आवडत नाही. ही त्यांची वैयक्तिक बाब असल्याने त्यांना संकोच वाटतो. त्यामुळे ही वैयक्तिक बाब सार्वजनिक न करता आर्थिक गरजांविषयी योग्य मार्गदर्शन करणारा सल्लागार त्यांना हवा असतो. अशावेळी पक्षपात न करता सल्ला देणारा वित्त सल्लागार निवडावा. तुमचा पैसा ज्याच्या हाती तुम्ही सोपवणार आहात तो वितरक सहजगत्या उपलब्ध असावा. तुमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे लवकरात लवकर त्या सल्लागाराने किंवा त्यांच्या चमूने द्यायला हवीत. ही उत्तरे देताना तुम्ही ईमेल, फोन कॉल, एसएमएस असे जे संपर्क माध्यम निवडले आहे, त्याला तो सल्लागार सरावलेला असावा. आर्थिक जगात वेळेला सर्वोच्च महत्त्व असते. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे निर्णय त्याने चटकन…

आपतकालीन निधी

न सांगून येणाऱ्या आर्थिक अडचणींचे निरसन करण्यासाठी एखादा आपातकालीन निधी बाजूला काढून ठेवलाच पाहिजे, आगामी सहा महिन्यांमधील अनपेक्षित खर्चांची तजवीज होईल, इतकी रक्कम आपात्कालीन निधीत असणे आवश्यक आहे. अनेकांकडून याची अंमलबजावणी होईलच, असे काही नाही. अशा आर्थिक अडचणीच्या वेळी बचत किंवा शिलकीत काहीही नसले, तरी गांगरून जाण्याची आवश्यकता नाही. गरजेच्या प्रसंगी आर्थिक अडचण निर्माण झाल्यास त्यावर मात करणारी अनेक साधने आज बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मात्र, अशी रक्कम कर्जाऊ घेताना खरीच निकड आहे, का याची चाचपणी करणे आवश्यक आहे. रक्कमही घेताना ती कमीतकमी असावी, याचे भानही राखणे आवश्यक आहे. ही रक्कम कर्जाऊ असल्याने निर्धारित मुदतीत ती परतफेडही करणे आवश्यक आहे. ही…

सरकारी बॅंकांतील ठेवी पूर्णपणे सुरक्षित

गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांमुळे काही बॅंकांच्या ठेवीदारांच्या मनात त्यांच्या ठेवींच्या सुरक्षिततेबद्दल शंका येत आहेत. तसेच "व्हॉट्‌सऍप'सारख्या सोशल मीडियावरील मेसेजमुळे तर खरे काय हे समजेनासे झाले आहे. अनेक नोकरदार, निवृत्त व ज्येष्ठ नागरिक आपल्या आयुष्यभराची पुंजी सर्वांत सुरक्षित म्हणून सरकारी बॅंकांत ठेवतात. त्यामुळे बॅंक ऑफ महाराष्ट्र, देना बॅंक, युको बॅंक, इंडियन ओव्हरसीज बॅंक, आयडीबीआय बॅंक यासारख्या काही सरकारी बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध आणल्याच्या वृत्तामुळे ठेवीदार अस्वस्थ झाले आहेत. तसेच काही बॅंकांच्या विलीनीकरणाचीही जोरदार चर्चा होत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर बॅंक ठेवीदारांच्या मनातीलकाही निवडक प्रशनाची उत्तरे !! थकीत कर्जाचे प्रमाण (एनपीए) वाढल्यामुळे बॅंकांच्या स्थैर्याला कितपत धोका आहे? थकीत…

डेट फंडाचे वेगवेगळे प्रकार पहा

डेट फंडाचे वेगवेगळे प्रकार * लिक्विड फंड : यात अगदी १ दिवसासाठी गुंतवणूक केली जाऊ  शकते. या प्रकारच्या म्युचुअल फंड योजना अगदी बँकेतील बचत खात्यासारखे असतात. यात गुंतवणूक करणे हे काही मोठी रक्कम काही दिवसांसाठी बाजूला आहे अशांना तसेच लहान व्यवसायिकासाठी फायद्याचे ठरू शकते. या प्रकारच्या पोर्टफोलिओमध्ये मनी मार्केट पेपर्स व ट्रेझरी बिल यासारख्या पर्यायांत गुंतवणूक केलेली असते, ज्याची मुदत ही १ दिवस ते ३ महिने इतकी असू शकते. हा म्युच्युअल फंडामधील अतिशय सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. * अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड : १ ते ९ महिन्यांसाठी योग्य. पूर्वी या प्रकारच्या म्युच्युअल फंडाला लिक्विड प्लस म्हटले जात असे. कारण याचा…

कर्ज घ्यायचय ??

‘मला नं, कर्जाबद्दल विचारायचय’ – दिवाळीचा फराळ आणत रमा यशोधराला म्हणाली. ‘खरं तर मी तुम्हाला बँकेतच भेटायला पाहिजे, नाही क?’ – तिनं थोडं अपराधीपणेच विचारलं. ‘पण मी म्हटलं आता स्वामीजींच्या आश्रमात गेली वर्षभर ओळख आहेच आपली, शिवाय त्यानिमित्त तुमचं येणसुद्धा होईल’. ‘नाही गं, काहीच अडचण नाही. अगं बऱ्याचदा बँकेत गर्दी असते. नीट सवडीने बोलताच येत नाही’- यशोधरा मॅडम हसत म्हणाल्या. ‘आणि स्वामीजी म्हणतातच ना... बायकांनो, पैशाचे विषय तुमच्या मैत्रिणींच्या गप्पात आणि किटी पार्ट्यांतपण यायला पाहिजेत.’ यशोधरा मॅडम विकेंडला वर्ग घ्यायच्या; पण त्या एका सरकारी बँकेत मॅनेजर होत्या आणि त्यांचे वर्ग आणि त्यानंतरच्या गप्पा सगळ्या साधकांत लोकप्रिय होत्या. ‘नाही, काय आहे,…

कॅशलेस बिलावर २% चार्ज?

"धनलाभ"च्या सर्व वाचकांना दिपवालीच्या शुभेच्छा !! गेल्याच आठवड्यात मी पत्नीसाठी २६ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी पुण्यातील नामवंत सराफ पेढीतून खरेदी केली. मी बिल क्रेडिट कार्डनं देणार असल्याच सांगताच तेथील अकाउण्टण्टनं मला बिलावर २% जादा रक्कम पडेल असे सांगितले. त्यामुळे मला विनाकारण ५२० रुपयांचा भूर्दंड पडला. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचं सरकारच धोरण असताना क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीवर अशी आकारणी करणं कायदेशीर आहे क? या बाबतीत कोठे तक्रार करता येयील? अभय देशपांडे -पुणे कॅशलेसच्या दिशेने अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरु असताना क्रेडिट कार्डने केलेल्या व्यवहारांवर शुल्क आकारणी करणं योग्य नाही हा तुमचा युक्तिवाद योग्य आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, अशी आकारणी करण्यास…

अधिक मिळवणे शिका !!

ज्यांच्याकडे काही कालावधीसाठी काही रक्कम विनावापर असते त्यांनी लाभ मिळविण्यासाठी अत्यल्प (अल्ट्रा शॉर्ट) मुदतीचे फंड वापरावेत !! अत्यल्प (अल्ट्रा शॉर्ट) मुदतीचे फंड हे डेट फंड असतात. हे फंड कमर्शियल पेपर, ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट व कॉर्पोरेट पेपर यांतून गुंतवणूक करतात. या फंडांचा सरासरी मुदतपूर्ती कालावधी ९१ दिवसांपेक्षा अधिक असतो. साधारणतः १८ महिन्यांच्या कालावधीने मुदतपूर्ती होणाऱ्या रोख्यांमध्ये या फंडाचे पोर्टफोलिओ गुंतवणूक करतात. अत्यल्प मुदतीचे फंड वेगळे कसे? लिक्विड फंड हे एक दिवस ते तीन महिने इतक्या कमी कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी असतात. त्यांच्याकडे डेट साधनांचा पोर्टपोलिओ असतो. या गुंतवणूक साधनांचा मुदतपूर्ती कालावधी ९१ दिवसांपेक्षा अधिक नसतो. यामध्ये रोख्यांवर व्याज…

End of content

No more pages to load