कर वाचवा !!
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये पगारदार करदाता नेहमीच जास्त कर भरताना दिसतो, कारण सुरवातीपासून गुंतवणुकीचे नियोजन न केल्याने शेवटच्या क्षणी कर भरण्याशिवाय पर्याय उरलेला नसतो. तरीदेखील ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी रक्कम उपलब्ध आहे, त्यांना या शेवटच्या टप्प्यांतदेखील कर वाचवता येऊ शकतो. त्यासाठी प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८०-सी आणि अन्य काही कलमांचा उपयोग होऊ शकतो. करबचतीसाठी घाईघाईने निर्णय घेऊ नका. कलम ८०-सीअंतर्गत रु. दीड लाखाची मर्यादा असते, हे अनेकांना माहिती असेलच. या मर्यादेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. कारण या कलमाच्या अंतर्गत तुम्ही जी रक्कम गुंतवाल, ती तुमच्या करपात्र उत्पन्नातून एकदम कमी होते. तुम्हाला तुमच्या काही खर्चावरसुद्धा वजावट मिळू शकते; जसे मुलाच्या शिक्षणाची ट्युशन फी,…