डिजिटल व्यवहार
नव्याने गुंतवणूक करू लागलेल्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या गुंतवणूकदारांना सध्याच्या युगातील डिजिटल खाते सुरक्षित नाही अशी भावना निर्माण होणे साहजिक आहे. आयुष्यभर कागदावरचे व्यवहार केल्याने कागदविरहित व्यवहारांवर विसंबून राहणे थोडे कठीण होते हे मान्य करूनदेखील तुम्ही नवीन बदलांशी जुळवून घेणे तुमच्या हिताचे कसे ते पाहू. डिजिटल खाते हे अहोरात्र पाहता येते. फिजिकल खाते असेल तर तुमच्या गुंतवणूक मूल्यांकनासाठी म्युच्युअल फंडांच्या कार्यालयीन वेळेत तेथील कर्मचाऱ्यावर विसंबून राहावे लागते. हा कर्मचारी तुम्हाला तुमचे ‘होल्डिंग स्टेटमेंट’ ई मेलने तुम्हाला पाठवतो म्हणजे हे स्टेटमेंट इलेक्ट्रोनिक फॉर्ममध्ये म्हणजेच डिजिटल पद्धतीने येते. डिजिटल पद्धतीत फक्त स्टेटमेंट म्हणजे गुंतवणुकीचे मूल्यांकन आणि परताव्याचा दर समजतो. फिजिकल खात्यात स्टेटमेंट मिळत…