बाजारातील योग्य स्थिती कोणती?

गुंतवणुकीसाठी बाजारातील योग्य स्थिती दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास परतावा चांगला मिळतो. दीर्घकालीन कालावधीचा विचार केल्यास बाजारातील परिस्थितीचा विचार करण्याची गरज नाही. कारण कुठल्याही योजनेचे फंड व्यवस्थापक हे अनुभवी असतात. पैशांचं योग्य नियोजन करण्यासाठी संपूर्ण टीम कार्यरत असते. त्यामुळे ते योग्य निर्णय घेण्यास समर्थ असतात. विशेषतः एसआयपी मध्ये तर बाजारातील स्थितीचा जास्त विचार करण्याची काहीच गरज नाही. कारण आपण दरमहा किंवा ठराविक टप्प्याने गुंतवणूक करत असल्याने घसरलेल्या बाजारात जास्त युनिट्स मिळून फायदाच होतो. मात्र, जर तुम्ही एकरकमी गुंतवणूक करणार असाल तर बाजारामध्ये मिळणाऱ्या 'करेक्शन' चा फायदा घेऊन गुंतवणूक केलेली योग्य. जुनी की नवी योजना बऱ्याच गुंतवणूकदरांचा कल हा नवीन…

‘कल करे सो आज कर, आज करे सो अब….!’

आतापासूनच करा करबचतीचे नियोजन! प्राप्तिकर बचतीचे नियोजन हा आर्थिक नियोजनातील एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याप्रमाणे आर्थिक नियोजनामध्ये लवकर सुरवात करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तोच नियम करबचतीच्या नियोजनासही लागू होतो. एप्रिलपासूनच करबचतीचे नियोजन केले, तर करदात्यांच्या फायद्याचे ठरते. कारण करबचतीचे नियोजन ही आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे फेब्रुवारी-मार्च महिन्यात करण्याची गोष्ट आहे, असा सर्वसाधारण समज आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात प्राप्तिकर वाचविण्यासाठी धावपळ करून केलेली गुंतवणूक अथवा प्राप्तिकर कापला गेल्यामुळे हातात आलेला तुटपुंजा पगार, हा नेहमीचा अनुभव आहे. त्यावर मात करायची असेल तर खालील ‘अर्थ’पूर्ण संकल्प करता येतील. १) आपण वर्षभरात किती गुंतवणूक करू शकतो, याचा अंदाज करसल्लागार अथवा गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने घ्यावा.…

इतकी पसंती का मिळते?

म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून खरेदी करण्याला इतकी पसंती का मिळते? गुंतवणूकदारांना वेळ नसल्यामुळे त्यांना थेट कंपन्यांचे भाग खरेदी केल्यास त्याचा मागोवा घेणे अवघड जाते. त्यांच्या बदलणाऱ्या किंमती, या कंपन्यांना होणारा नफा-तोटा तसेच या कंपन्यांचे भाग विकण्याचा अचूक वेळी घ्यावा लागणारा निर्णय हे सारे पाहणे त्यांच्यासाठी कटकटीचे असते. या तुलनेत म्युच्युअल फंड हे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांकडून राखले जातात. हे फंड व्यवस्थापक नियमित तत्त्वावर या कंपन्यांविषयी संशोधन करतात, त्यांच्या कामगिरीचा मागोवा घेतात, त्यांचे मूल्यांकन करतात. विविध उद्योग क्षेत्रे आणि कंपन्या यांचे मूल्यांकन फंड व्यवस्थापकांकडून नियमितपणे केले जाते. यामुळे एखाद्या फंड व्यवस्थापकाने अमुक कंपनीच्या भागांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यास तो संशोधनाच्या आधारे घेतलेला असतो.…

‘लॉक-इन’ काळ संपल्यावर काय करावे?

तीन वर्षांंचा लॉक—इन पिरीयड संपल्यानंतर ईएलएसएसमधून बाहेर पडणे पुरेसे नाही. शेवटी ईएलएसएस फंड्स भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करतात आणि याला न्याय देण्याच्या दृष्टीने गुंतवणुकदारांची दीर्घ कालावधीकरिता गुंतवणूक करण्यासाठी तयारी राहिली पाहिजे. हेही लक्षात असू द्यावे की, एकदा लॉक इन कालावधी संपला, ईएलएसएस फंड हे इतर ओपन एंडेड फंडाप्रमाणेच असतात. गुंतवणुकदारांना कधीही पसंतीप्रमाणे रिडीम करणे शक्य असते. त्यासाठीच लॉक—इन कालावधीच्या शेवटी रिडीम करण्याला विशेष शहाणपणाचे नाही.तीन वर्षांंचा लॉक—इन पिरीयड संपल्यानंतर ईएलएसएसमधून बाहेर पडणे पुरेसे नाही. शेवटी ईएलएसएस फंड्स भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करतात आणि याला न्याय देण्याच्या दृष्टीने गुंतवणुकदारांची दीर्घ कालावधीकरिता गुंतवणूक करण्यासाठी तयारी राहिली पाहिजे. दीर्घ मुदतीची समभागातील गुंतवणूक ही वृद्धी चक्र…

एबीएसएल प्युअर व्हॅल्यू फंड

एबीएसएल प्युअर व्हॅल्यू फंड हा ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ संकल्पनेनुसार मल्टी कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक करताना विशिष्ट उद्योग क्षेत्राबद्दल विशेष आत्मीयता बाळगून गुंतवणूक करणारा किंवा काही कारणांनी एखादे उद्योग क्षेत्र न टाळणारा फंड आहे. निधी व्यवस्थापक आर्थिक आवर्तनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या उद्योग क्षेत्रातील निवडक कंपन्यांचे मूल्यांकन विचारात घेऊन गुंतवणुकीसाठी समभागांची निवड करतात.  या फंडाची मालमत्ता फेब्रुवारी २०१८ च्या ‘फंड फॅक्ट शीट’नुसार ३,२६३ कोटी आहे. ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’चा अवलंब करणाऱ्या फंड गटात पाच वर्षांच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीवर आणि तीन वर्षे कालावधीत नियोजनबद्ध गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा एबीएसएल प्युअर व्हॅल्यू फंडाने दिला आहे. फंडाच्या पहिल्या दिवसापासून ५,००० रुपये नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या ६ लाखांचे २१ मार्च २०१८…

एक गुंतवणुकीचा पर्याय

साधारणपणे गुंतवणूक म्हटल्यावर एकतर बँकांमधील मुदतबंद ठेव किंवा थेट शेअर बाजारातील गंतवणूक असे दोन टोकाचे विचार पाहायला मिळतात. मुदतबंद ठेवी सुरक्षित समजल्या जातात. तसेच त्यापासून ठराविक दराने व्याजही मिळते. म्हणजे मूळ गुंतवणूक तशीच राहते व परतावासुध्दा मिळतो. याउलट शेअर्समधील गुंतवणूक जर फारसा विचार न करता केली तर ती धोकदायक ठरू शकते. शेअर्समध्ये होणारे चढउतार इतके मोठे असतात की मूळ गुंतवणूकसुध्दा काही वेळेला परत मिळत नाही तर काहीवेळा काही वर्षांतच दामदुप्पटसुध्दा होऊ शकते. या दोन्ही गुंतवणुकांमध्ये असलेले तोटे कमी करून दोन्हीचे फायदे थोड्याफार प्रमाणात एकत्र करण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून उपलब्ध आहे. बँकांमधील ठेवींवर मिळणारे मर्यादित व्याज, महागाई,…

गृहकर्जाचे संबंधी हे माहिती आहे का?

गृहवित्त संस्था व बँकांकडून मिळणारी अनेक प्रकारची गृहकर्जे उपलब्ध आहेत. सरकारच्या पुढाकारामुळे गेल्या दोन वर्षात ग्रामीण आणिनिमशहरी भारताच्या गरजा भागविण्यासाठी अनेक किफायतशीर गृहवित्तसंस्थांचा उदय झाला आहे. गृहकर्जामुळे घरखरेदी हफ्त्या-हफ्त्यात करणेच केवळ शक्य होते असे नाही, तर उत्पन्न कर कायद्याच्या सेक्शन 24 आणि 80सी अन्वये उत्पन्न करात व्यक्तीगत बचत करण्यासही याचा उपयोग होतो. ग्राहकांच्या विविध गरजांनुसार, गृहकर्जांचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत” गृहखरेदीसाठीचे कर्ज या प्रकारचे कर्ज बहुदा सर्वसाधारण प्रकारचे असते. हे सर्व प्रकारच्या कर्जदारांकडे उपलब्ध असणारे गृहकर्ज आहे. ग्राहक आपल्या रेडी टू मूव्ह किंवा बांधकामपूर्व मालमत्तेसाठी या प्रकारचे कर्ज घेऊ शकतात गृह बांधकामासाठी कर्ज ज्यांना आधीच बांधून घेतलेली सदनिका किंवा बंगला विकत न घेता आपल्या प्राधान्यानुसार व वैशिष्ट्यानुसार स्वतःचे घर बांधण्याची इच्छाअसते ते या कर्जाची निवड करू शकतात.…

लाभांश पर्याय कशासाठी ?

लाभांशाची अपेक्षा केव्हा करावी? म्युच्युअल फंड दैनंदिन, मासिक, तिमाही किंवा वार्षिक तत्त्वावर लाभांश देऊ शकतात. लाभांश देण्याचा कालावधी योजनेनुसार बदलता असतो. कोणत्याही योजनेत लाभांश मिळण्याची खात्री देता येत नाही. मात्र बहुतांश योजना त्यांनी दिलेले लाभांश देण्याचे वचन पाळतात. तरीही, लाभांशाची रक्कम एकसमान नसते. लाभांश पर्यायांतर्गत एनएव्ही फारशी वाढत नाही आणि विशिष्ट पातळीपर्यंत एनएव्ही गेल्यास म्युच्युअल फंड लाभांश देतो. अशी कल्पना करा की, तुम्ही १४ रुपये एनएव्ही असलेल्या फंडात गुंतवणूक करून लाभांसाचा पर्याय निवडला आहे. या योजनेची कामगिरी चांगली झाली आणि एनएव्ही वाढून १६ रुपये झाली. फंडाकडून दोन रुपये लाभांश दिला जाऊ शकतो. यामुळे तुम्हाला दोन रुपये मिळतात, पण एनएव्ही पुन्हा…

गुंतवणुकीस कुठून सुरुवात करावी?

नवख्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंड गुंतवणुकीस कुठून सुरुवात करावी? तुमच्या बचतीचा विनियोग करण्यासाठी तुम्ही गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांचा विचार करीत आहात ही आनंदाची गोष्ट आहे. म्युच्युअल फंडाचा पट खूपच विस्तृत असून एका दिवसापासून ते सेवानिवृत्तीनंतरच्या खर्चाची तजवीज करण्यासाठी २०-२५ वर्षे गुंतवणूक करता येईल अशी साधने उपलब्ध आहेत. प्रत्येक गुंतवणूक साधनांची जोखीम वेगवेगळी असून गुंतवणूकदाराने सर्वप्रथम आपली जोखीम सोसण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी निश्चित करून त्या नुसार गुंतवणूक साधनाची निवड करायची आहे. त्यासाठी तुमची जोखीम चाचणी केली जाणे आवश्यक असते. गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी काही औपचारिकता पूर्ण करणे गरजेचे असते. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदार आणि सह-गुंतवणूकदाराला ‘केवायसी’ अटींची पूर्तता करावी लागते. गुंतवणूकदार आणि सह-गुंतवणूकदारचे पॅन…

घसरते उत्पन्न सावरण्यासाठी

काही फंड हे बाजार चढा असताना उत्तम प्रकारे कामगिरी बजावतात. मात्र काही फंड हे बाजार पडलेला असताना गुंतवणूकदाराचे उत्पन्न चांगल्या प्रकारे सांभाळतात. या दोन्ही प्रकारच्या फंडांपैकी पर्याय निवडायला सांगितल्यास साधारणतः गुंतवणूकदार अधिक उत्पन्न देणारा फंडच निवडतात. परंतु तुम्ही तज्ज्ञांना विचारलेत तर त्यांच्या मते, असे फंड निवडतानाच बाजार पडतानाही गुंतवणुकीचे संरक्षण करू शकतील असेही काही फंड निवडावेत. केवळ आक्रमक फंडांवर भर देण्यापेक्षा चुमचा तोटा कमी करणारे फंडही निवडणे महत्त्वाचे आहे. असे फंड बाजार गर्तेत जात असतानाही संयम सोडत नाहीत आणि बाजारात घट्ट उभे राहतात. अशा स्थितीत हे फंड काही काळ अन्य फंडांच्या तुलनेत चांगली कामगिरी करणारही नाहीत कदाचित, पण ते सपशेल…

End of content

No more pages to load