मिरॅ असेट एशिया ग्रेट कंझ्युमर फंड

आपल्या संदर्भ निर्देशांकातील गुंतवणुकीवरील नफ्यापेक्षा एखाद्या फंडाने गुंतवणुकीवर दुप्पट नफा कमविला असेल तर त्या फंडाची कामगिरी अव्वल म्हणायला हवी. बाजारातील घसरणीमुळे हादरलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा वाटावा अशा या जवळपास सात वर्षांत मुदलाच्या सवा तीनपट वृद्धी देणाऱ्या फंडाचा आपल्या गुंतवणुकीत समावेश नसल्याबद्दल खेद वाटता अशी या फंडाची कामगिरी आहे. मार्च २०११ मध्ये पहिल्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ला केलेल्या रु. १ लाखाच्या गुंतवणुकीचे १६ फेब्रुवारीच्या एनएव्हीनुसार रु. ३.२४ लाख झाले आहेत. मागील पाच वर्षे आणि विशेषत: केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर भारतातील उपभोग्य वस्तू आणि खासगी क्षेत्राकडून होणारी भांडवली गुंतवणूक या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये विदेशी अर्थसंस्था गुंतवणूक करताना दिसत आहेत. याचे कारण अन्य उभरत्या अर्थव्यवस्थांप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था…

चाचणी आर्थिक शिस्तीची

आजच्या वाढत्या आकांक्षा आणि अपेक्षांच्या काळात आर्थिक नियोजनास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. गृहखरेदी, शिक्षण, आरोग्य यावरील वाढते खर्च पाहता, अल्प आणि दीर्घ मुदतीच्या खर्चासाठी व्यवस्थित तरतूद न केल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. हे सर्व लक्षात घेता आर्थिक सल्लागारांचे मार्गदर्शन घेणे ही आता गरज बनली आहे; परंतु हे करण्यापूर्वी आपण स्वतःच आपले उत्पन्न, बचत आणि खर्च यांची सांगड घालून आर्थिक नियोजन नीट करीत आहोत ना, याची खात्री एका सोप्या चाचणीमधून करता येईल. ही पूर्वतयारी केल्यास आपण आजच्या घडीला कोठे आहोत आणि आपली उद्दिष्टे सध्या होतील की नाही, याचा अंदाज येऊ शकेल आणि आर्थिक सल्लागारांच्या मदतीने आणखी चांगल्यारीतीने नियोजन करता…

आता घ्या नव्याने ‘स्टान्स’!

सरलेल्या वर्षात भारतीय म्युच्युअल फंड व्यवसायाने बरेच महत्त्वाचे टप्पे पार केले. या वर्षात म्युच्युअल फंड व्यवसायातील एकूण मालमत्तेने तेवीस  लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला. म्युच्युअल फंडांची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी आहे. 2007 या वर्षात साधारणतः तीन लाख कोटी रुपये एवढी एकूण मालमत्ता असलेला हा व्यवसाय अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीत पाचपट वाढला, यातूनच त्याची वाढती लोकप्रियता लक्षात येते. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडिया (ऍम्फी) या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१७ या वर्षात म्युच्युअल फंडातील एकूण खात्यांची संख्या सहा कोटींपेक्षा अधिक झाली आहे. यापैकी जवळजवळ चार कोटी खाती ही इक्विटी फंड आणि संबंधित फंडामध्ये आहेत. याशिवाय सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)…

मिळवा — आर्थिक स्वातंत्र्य ४०-४५ व्या वर्षी

आर्थिक स्वातंत्र्य ४०-४५ व्या वर्षी मिळविण्यासाठी ----- १ )साहजिकच आर्थिक स्वातंत्र्य ४०-४५ व्या वर्षी मिळवण्यासाठी त्या दृष्टीने करावे लागणारे नियोजन लवकरात लवकर सुरू केले पाहिजे. यासाठी योग्य आर्थिक नियोजकाची निवड करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे गुंतवणुकीचे असेच पर्याय निवडले गेले पाहिजेत जे तुमच्या ध्येयांशी संलग्न असतील. त्यात विम्याचा विचार गुंतवणूक म्हणून न पाहता ‘रिस्क कव्हर’ म्हणून करणेही समाविष्ट आहे. २) आर्थिक नियोजकाकडे जाण्यापूर्वी तुमची संपूर्ण मानसिक तयारी असायला हवी. तुम्हाला खरेच मनापासून लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असल्यास, परंतु तुमची मनाची तयारी नसल्यास आर्थिक नियोजकाला तुम्हाला मदत करणे कठीण जाते. या ठिकाणी अलिक आईस यांनी म्हटले आहे- The secret to Financial Security is…

श्रीगणेशा करा!!

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातील अक्षय तृतीयेसारख्या शुभमुहूर्तावर ‘एसआयपी’चा श्रीगणेशा करा!! एसआयपी’ हा शेअर बाजारात प्रवेश करण्याचा अत्यंत सोपा, कमी जोखीम असलेला आणि दीर्घकाळामध्ये चांगले फायदे देणारा पर्याय आहे, हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. मात्र दुर्दैवाने गुंतवणुकीचा हा उत्तम पर्याय आपल्याकडील सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत अजूनही पूर्णपणे पोचलेला नाही. याची कारणे अनेक आहेत. जागा, फ्लॅट, सोने, एफडी आदी पर्यायात गुंतवणूक करताना खूप दूरचा विचार करणारे लोक ‘एसआयपी’च्या बाबतीत मात्र अतिशय कमी कालावधीचा विचार करतात. थोडक्‍यात, ‘एसआयपी’कडे बघण्याचा दृष्टिकोन अनेक वेळा चुकीचा असतो. त्यामुळे या चांगल्या पर्यायाचा उपयोग नीट प्रकारे होत नाही. अर्थात, योग्य म्युच्युअल फंड योजनेची निवड करणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे…

अर्थ नियोजन !!

मासिक वेतन ५० हजार रुपये असल्यास दहा हजार रुपये घरखर्च वा स्वतःच्या खर्चासाठी वेगळे ठेवून उरलेल्या रकमेची गुंतवणूक व्हायला हवी. याची सुरुवात बँकेमधील रिकरिंगने करावी. हा बचतीचा पारंपरिक पर्याय आहे. यामध्ये आपण विशिष्ट रक्कम निश्चित करून रिकरिंगचा कालावधी ठरवून घ्यायला हवा. यातून आपल्याला एकगठ्ठा गंगाजळी उपलब्ध होईल. त्याचा विनियोग पुन्हा गुंतवणुकीच्या रूपाने करणे आवश्यक आहे. यासाठी भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) याचा विचार करता येईल. समजा महिन्याला पंधरा हजार रुपयांचे रिकरिंग काढले असल्यास यातील एक लाख रुपयांची रक्कम ही तरलतेसाठी (लिक्विडिटी) ठेव म्हणून ठेवता येईल व उरलेली रक्कम पीपीएफमध्ये गुंतविता येईल. पीपीएफ हा करमुक्त गुंतवणुकीचा पर्याय आहे. तसेच, याचा उपयोग स्वतःच्या…

डायरेक्‍ट प्लॅन की रेग्युलर प्लॅन??

म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार दोन पद्धतींनी गुंतवणूक करू शकतात - एक म्हणजे डायरेक्‍ट प्लॅन आणि दुसरे म्हणजे रेग्युलर प्लॅन. १) डायरेक्‍ट प्लॅन - या प्रकारची गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला स्वतःच अभ्यास करून प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा अन्य संकेतस्थळांचा आधार घेऊन, माहिती घेऊन गुंतवणूक करावी लागते. म्युच्युअल फंडाच्या डायरेक्‍ट प्लॅनमध्ये फंडाचा ‘एक्‍स्पेन्स रेशो’ कमी असतो. त्याचे निव्वळ मालमत्ता मूल्यही (एनएव्ही) वेगळे असते. पण अशी गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला कोणाचाही सल्ला मिळत नाही. स्वतःच अभ्यास करून योजना निवडावी लागते. पुढे, ठराविक कालावधीने त्याचा आढावा घेणे, योजनेतून बाहेर कधी पडायचे, दुसऱ्या योजनेत ‘स्वीच’ कधी करायचे, आदी सर्व गोष्टी संबंधित गुंतवणूकदारालाच ठरवाव्या लागतात. २) रेग्युलर…

तुम्हीही करोडती बना !!

एखाद्या सर्वसामान्य मिळवत्या मुलाला सध्या  रू. ६००० /- एवढीच मासिक प्राप्ती आहे पण योग्य फंड निवडून त्यात SIPकरून हा मुलगा सुद्धा करोडपती होऊ शकतो . फक्त सातत्य व पेशंस हवा !! कसा ते पहा !! बॅंक, पोस्ट किंवा कंपनी ठेवींवरील (एफडी) एक आकडी व्याजदर, सोन्याच्या भावातील स्थिरता, रिअल इस्टेटमधील मंदीमुळे तेथील गुंतवणुकीचे लुप्त झालेले आकर्षण अशा परिस्थितीत चलनवाढ किंवा महागाईच्या दरावर मात करणारा परतावा कोठे मिळू शकेल, हा प्रश्‍न अनेकांना सतावत आहे. चलनवाढीचा दर ६-७ टक्के गृहीत धरला आणि त्यापेक्षा जास्त परतावा मिळाला, तरच तो ‘खऱ्या अर्थाने परतावा’ असतो; पण वर्षानुवर्षे लोकप्रिय असलेल्या निव्वळ ‘एफडीं’वर विसंबून असा ‘खऱ्या अर्थाने परतावा’…

घर घेताना कोणती काळजी घ्यावी ?

घर घेताना खालील काळजी घ्या करार पूर्णपणे वाचून त्यातील बिल्डर व तुमच्या जबाबदाऱ्या नीट समजून घ्या. प्रोजेक्ट वेळेवर झाले नाही तर काय होईल हा अंदाज पहिला बांधा. आपल्या गृहकर्जावर आपले नियंत्रण ठेवा. प्रोजेक्टची प्रगती जर नसेल तर बँकेला नोटीस देऊन कर्ज वाटप बंद करा. प्रोजेक्टचे टायटल सर्च कर्ज देणाऱ्या संस्थेने केले आहे याची खात्री करून घ्या. – योजनांची नीट चौकशी करा. प्रलोभनांना बळी पडू नका. बांधकाम चालू असलेल्या प्रोजेक्टच्या प्रगतीवर नीट लक्ष ठेवा. बांधकाम पूर्ण झालेले आणि ओसी मिळालेले प्रोजेक्ट महाग असले तरी जोखीम कमी असते, परंतु बांधकाम सुरू असलेल्या प्रोजेक्टमध्ये घेतलेले घर महाग पडू शकते. घर घ्यायच्या आधी आपले…

‘मिरॅ असेट इंडिया इक्विटी फंड’

मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी फंडाला  दोन दिवसापूर्वी -मंगळवारी -दहा वर्षे पूर्ण झाली . ४ एप्रिल २००८ रोजी पहिली एनएव्ही जाहीर झालेल्या या फंडात नियोजनबद्ध ‘एसआयपी’ गुंतवणूक केलेल्यांना या फंडाने भरभरून परतावा देत संपत्तीची निर्मिती केली आहे. या फंडात मागील दहा वर्षे दरमहा ५ हजारांची नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराच्या ६ लाखांचे २८ मार्च २०१८च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १५.३१ लाख रुपये झाले असून परताव्याचा दर १७.९२ टक्के आहे. पहिल्या एनएव्हीला केलेल्या १ लाखाच्या गुंतवणुकीचे २८ मार्च २०१८च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ४.४३ लाख रुपये झाले आहेत. दहापैकी ७ वर्षे या फंडाला ‘व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन’ने ‘फोर स्टार’ तर ‘मॉर्निगस्टार इंडिया’ने ‘फाइव्ह स्टार’ रेटिंग दिले…

End of content

No more pages to load