सोन्यात गुंतवणुक ??

सणासुदीच्या दिवसात सोने खरेदी करण्याची भारतीयांची मानसिकता आहे. त्यातच गुढीपाडवा, गुरूपुष्यांमृत योग, अक्षयतृतीया आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये सोनं खरेदीकडे सर्वसामान्य माणसाचा कल असतो. दोन दशकांपूर्वी सर्वसामान्य माणसासाठी गुंतवणूकीचे मर्यादित प्रकार अस्तित्वात होते. त्यातलाच एक आवडता गुंतवणूक प्रकार आहे सोने. काही वर्षांपूर्वीपर्यंत सोन्यातून मिळणारा परतावा चांगला असायचा. संपत्तीची वृद्धी करणारा असायचा.  मुलामुलींच्या लग्नात दागदागिने करण्यासाठी सोन्याची आवश्यकता भासते. त्यातच सोन्याला सामाजिक प्रतिष्ठासुद्धा आहे. यामुळेच सोनेखरेदी हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.    परंतु या दृष्टीकोनांमध्ये आता काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे. संपत्तीची वाढ तेव्हाच होते जेव्हा आपल्याला गुंतवणूकीतून मिळणारा परतावा हा महागाई दरापेक्षा जास्त असतो.  म्हणजेच दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किंमती लक्षात घेता महागाई…

समज आणि गैरसमज …

इक्विटी म्युच्युअल फंडांतील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत अलीकडे विक्रमी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातसुद्धा गुंतवणूकदारांची संख्या आणि पोर्टफोलिओची संख्या यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, शेअर बाजारात अस्थिरता असूनही इक्विटी फंडातील गुंतवणूक वाढली आहे. परंतु म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजाराशी (इक्विटी) निगडित योजना असा गैरसमज अनेकांच्या मनात दिसून येतो. त्यामुळे बरीच मंडळी म्युच्युअल फंडापासून दूर राहतात. परंतु प्रत्यक्षात असे समजण्याचे कारण नाही. यानिमित्ताने म्युच्युअल फंडाविषयीचे गैरसमज दूर करायचा प्रयत्न करूया. 1) म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट खाते आवश्‍यक अथवा अनिवार्य नाही. काही गुंतवणूकदार केवळ या गैरसमजामुळे म्युच्युअल फंडांच्या चांगल्या योजनांपासून दूर राहतात.   2) बहुतांश लोकांना असे वाटते, की…

म्युच्युअल फंडात गुंतवणूकीचे फायदे

शेअर बाजारातील थेट गुंतवणुकीच्या तुलनेत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील फायदे देते.   कमी जोखीम गुंतवणुकीतील विविधता, अनेक गुंतवणूकदारांचा सहभाग, तज्ज्ञ व्यकींनी केलेले आर्थिक व्यवस्थापन यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीमधील जोखीम कमी होते. छोट्या गुंतवणूकदारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते.   विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक एका म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करून सामान्य गुंतवणूकदार अप्रत्यक्षपणे अनेक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे मिळवितो. शिवाय यासाठी त्याला किचटक आमि वेळखाऊ प्रक्रियेलादेखील सामोरे जावे लागत नाही.   भावनिक ताणतणावांपासून सुटका शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक करताना अनेक गुंतवणूकदारांना भावनिक ताणतणावांना सामोरे जावे लागते. मात्र, म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार कोणत्याही शेअर खरेदी-विक्रीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नसल्याने अशा ताणतणावांपासून तो दूर राहू…

‘एसआयपी’ म्हणजे नेमके काय?

आजकाल विविध माध्यमातून म्युच्युअल फंडाबाबत आणि त्यातील "सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' (एसआयपी) या संकल्पनेविषयी जनजागृती केली जात आहे. पण या "एसआयपी'विषयी नवगुंतवणूकदारांना फारशी माहिती नसल्याचे लक्षात येते. अगदी थोडक्‍यात सांगायचे झाले, तर "एसआयपी' (सिप) म्हणजे म्युच्युअल फंडातील "रिकरिंग डिपॉझिट'! आपण जसा कॉफीचा "सिप' घेतो, तेवढे ते सोपे आहे! "एसआयपी'च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास, दीर्घकाळात या थेंबाथेंबांमधून संपत्तीचे तळे सहजपणे भरू शकते.   'एसआयपी' कसे करायचे?  पुढील गोष्टी ठरवून आणि एक अर्ज भरून पहिला चेक द्यायचा, त्यानंतर पुढील हप्त्यांची रक्कम "इसीएस'ने आपल्या बॅंक खात्यातून परस्पर वजा होऊन भरली जाते. 1) म्युच्युअल फंडाची योजना, 2) दरमहा गुंतवणूक करण्याची रक्कम, 3) गुंतवणुकीची…

योग्य वेळ कोणती?

शेअर बाजारातील सततच्या घडामोडींमुळे सामान्य नागरिकांमध्ये नेहमीच संभ्रम असतो. परिणामी तो गुंतवणुकीपासून दूर असल्याचे दिसून येते. मात्र, सर्वात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की बाजारमध्ये येणारे हे चढ-उतार ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. बाजार नेहमीच बदलत असतो. परंतु दीर्घकाळामध्ये बाजार सकारात्मक असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाजारातील परिस्थितीचा बाऊ न करता खाली घसरलेला बाजार म्हणजे नवीन गुंतवणूकदारांना कमी पैशांमध्ये जास्त खरेदी तर जुन्या गुंतवणूकदारास आणखी गुंतवणूक करून आपला पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी दिलेली संधी म्हणून बघितले पाहिजे. गुंतवणूक आज की उद्या गुंतवणूकीच नियोजन करताना तुमचे उत्पन्न, खर्च किंवा इतर जबाबदारी इत्यादींचा विचार करून गुंतवणुकीचा निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे वेळेपेक्षा तुमची…

हाउसिंग सोसायट्यांना गुंतवणूकसंधी

साधारणपणे म्युच्युअल फंडात फक्त वैयक्तिक गुंतवणूकदार आणि कंपन्या यांची गुंतवणूक होताना दिसते. गृहनिर्माण सहकारी संस्था आणि ट्रस्ट यांनाही म्युच्युअल फंडात लाभदायी गुंतवणूक करता येते, याची या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना पुरेशी माहिती दिसून येत नाही. महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त गृहनिर्माण किंवा हाउसिंग सोसायट्या आहेत, ज्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अन्वये आता म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करता येते. या कायद्यातील अन्य तरतुदींनुसार आणि इंडियन ट्रस्ट ॲक्‍ट १९८२ मधील कलम २० मध्ये गेल्या वर्षी झालेल्या दुरुस्तीनुसार, आता म्युच्युअल फंडातील सर्व प्रकारच्या योजनेत हाउसिंग सोसायट्यांना गुंतवणूक करता येते.  ज्या हाउसिंग सोसायट्यांकडे अतिरिक्त निधी असेल, त्यांनी तो केवळ मुदत ठेवींमध्ये न ठेवता त्यातील काही रक्कम म्युच्युअल…

मुलांसाठी काय ?

  शाळेतील एखादी स्पर्धा जिंकल्यास, क्रीडा प्रकारात यश मिळवल्यास किंवा वाढदिवसाला आलेल्या पाहुण्यांकडून आपल्या मुलांना कमीअधिक रोकड भेट म्हणून मिळते. ही रक्कम घरातच पडून राहण्यापेक्षा  पालकांकडून या पैशाच्या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांचा मार्ग स्वीकारावा असा सल्ला धनलाभ तर्फे देण्यात येत आहे !! लहान मूल म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकते का? हे कसे करता येते? म्युच्युअल फंडात १८ वर्षांखालील मुलाच्या नावे गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीला वयाची तसेच रकमेची कोणतीही मर्यादा नाही. लहान मुलाच्या नावे गुंतवणूक केल्यानंतर त्यासाठी त्या मुलाचेच नाव पहिले राहते. त्याच्या फोलिओसाठी संयुक्त धारक चालत नाही. या मुलाच्या फोलिओसाठी पालक म्हणून त्याचे आई-वडील (यापैकी एक) किंवा न्यायालयाने नियुक्त केलेली…

म्युच्युअल फंडच का ?

दीर्घ काळासाठी संपत्तीची निर्मिती करायची झाल्यास इक्विटीला पर्याय नसल्याचे अनेक गुंतवणूकदारांना वाटते. कंपन्यांचे भाग थेट खरेदी केल्यास त्यांच्या बदलणाऱ्या किंमतींकडे लक्ष देणे अवघड वाटू शकते. म्हणून गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून इक्विटीत गुंतवणूक करतात... कंपन्यांचे भाग थेट खरेदी करण्यापेक्षा म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून खरेदी करण्याला इतकी पसंती का मिळते? गुंतवणूकदारांना वेळ नसल्यामुळे त्यांना थेट कंपन्यांचे भाग खरेदी केल्यास त्याचा मागोवा घेणे अवघड जाते. त्यांच्या बदलणाऱ्या किंमती, या कंपन्यांना होणारा नफा-तोटा तसेच या कंपन्यांचे भाग विकण्याचा अचूक वेळी घ्यावा लागणारा निर्णय हे सारे पाहणे त्यांच्यासाठी कटकटीचे असते. या तुलनेत म्युच्युअल फंड हे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांकडून राखले जातात. हे फंड व्यवस्थापक नियमित तत्त्वावर या…

लोभ नसावा, लाभ घ्यावा !

मागील तीन महिन्यांत शेअर बाजाराने चढ-उतार दोन्ही अनुभवले. यानिमित्ताने वाचकांना आम्ही जे प्रत्येक वेळी सांगत आलो, त्याचे महत्त्व लक्षात आले असेल. आम्ही आमच्या लेखात कायम सांगत आलो आहोत, की नफा काढून घेत राहावा; जेणेकरून मंदी आल्यास आपल्याला पुनर्गुंतवणुकीची संधी मिळते. नफा काढून घेतल्यामुळे, शेअरचा भाव खाली आल्यास घाबरून न जाता अथवा ‘पॅनिक’ न होता आपण आपल्याकडील शेअर पुढे सांभाळू शकतो. शेअर बाजारात जोखीम ही असतेच, हेही आम्ही कायम निदर्शनास आणत राहिलो. बाजारातील घसरण या गोष्टीची जाणीव करून देते. वक्रांगी सारखा शेअर, ज्याचे बाजारमूल्य केवळ ३-४ महिन्यांपूर्वी जवळपास ५० हजार कोटींपर्यंत गेले होते, त्याने केवळ तीन महिन्यांत जवळजवळ ७५-८० टक्के घट दर्शविली.…

‘एक्‍झिट लोड’

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जर ठराविक कालावधीच्या अगोदर काढून घेतली तर ‘एक्‍झिट लोड’ लागू होतो. हा कालावधी प्रत्येक योजनेनुसार वेगवेगळा असतो व तो संबंधित योजनेच्या ‘स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्‍युमेंट’मध्ये (सिड) नमूद केलेला असतो. गुंतवणूकदाराने गुंतविलेली रक्कम ही काही काळासाठी तरी त्या योजनेत राहावी, ज्या योगे फंड व्यवस्थापकाला निर्धास्तपणे गुंतवणूक करता यावी, हा या ‘एक्‍झिट लोड’मागचा हेतू असतो. ‘एक्‍झिट लोड’ हा संबंधित योजनेच्या ‘नेट ॲसेट व्हॅल्यू’च्या (एनएव्ही) काही टक्के असतो. उदाहरणार्थ- तुम्ही एका म्युच्युअल फंड योजनेमध्ये सहा महिन्यांपूर्वी रु. १० हजार गुंतविले असतील तर त्या वेळेस तुम्हाला १०० युनिट्‌स प्रत्येकी १०० रुपये भावानुसार मिळाली. आता त्याच युनिट्‌सटी सध्याची एनएव्ही ११० रुपये आहे. ‘एक्‍झिट…

End of content

No more pages to load