मिरॅ असेट हेल्थकेअर फंड

मिरॅ असेट हेल्थकेअर फंड  गुंतवणुकीस खुला झाला आहे. या फंडाच्या ‘एनएफओ’मध्ये २६ जून २०१८ पर्यंत गुंतवणूक करता येईल. दहा दिवसानंतर हा फंड नियमित गुंतवणुकीसाठी खुला असेल. हा फंड औषध निर्माण, रोग निदानपूर्व चाचण्या, रुग्णालये, आरोग्य विमा, वैद्यकीय उपकरणे निर्माते आणि पुरवठादार (आयातदार) यांच्याशी संबंधित व्यवसायातून गुंतवणूक करेल. या उद्योगांपैकी औषधनिर्मिती उद्योगाची वार्षिक १ लाख कोटींची उलाढाल आहे. रुग्णालये २.५ लाख कोटी, निदानपूर्व चाचण्या ४३ हजार कोटी, आरोग्यविमा उद्योगाच्या विमा हप्ता २२ हजार कोटी आणि वैद्यकीय उपकरणे आयात आणि निर्माती ही ५३ हजार कोटींची बाजारपेठ आहे. आरोग्य निगा क्षेत्र हा नियंत्रित उद्योग असल्याने, नव्याने पदार्पण करण्यास अत्यंत कठीण उद्योग क्षेत्र मानले…

फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन म्हणजे काय?

फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन म्हणजे काय? एफएमपी हे ठरावीक मुदतीचे डेट फंड असतात. हा कालावधी एक महिना, ९० दिवस ते पाच वर्षांपर्यंत असू शकतो. या फंडात तीन वर्षांचा कालावधी निवडल्यास गुंतवणूकदाराला दीर्घकालीन भांडवली करातून (लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स) सवलत मिळत असल्याने अनेक जण हाच कालावधी निवडतात. निर्धारित मुदतीत स्थिर परतावा देणे हे या एफएमपीचे उद्दिष्ट असते. यामुळे बाजारातील चढ-उतारांचा या गुंतवणुकीवर परिणाम होत नाही. व्याजदरांत होणाऱ्या बदलांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी तसेच, डेट गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळत असल्याने पारंपरिक मुदत ठेवींपेक्षा फिक्सड मॅच्युरिटी प्लॅन्समध्ये (एफएमपी) गुंतवणूक करण्यावर गुंतवणूकदारांचा भर दिसत आहे. एफएमपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक सुरक्षितही असल्याने यातील गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे.…

लिक्विड म्युच्युअल फंड

घर, जमीन यासारख्या विक्री व्यवहारातून, निवृत्तीनंतर किंवा बॅंकेतील ठेवीची किंवा पीपीएफची मुदत संपल्यावर किंवा शेअर्स वा म्युच्युअल फंड विक्रीतून मोठी रक्कम आपल्या खात्यात जमा होणार असेल व अशी रक्कम आपल्याला एकरकमी गुंतवायची नसेल, तर काय करता येईल? जर ही रक्कम बचत खात्यात राहिली, तर सध्या केवळ 3.5 टक्केच व्याज मिळू शकते. गुंतवणुकीबाबत निर्णय होण्यास कधीकधी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. साहजिकच 3.5 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त परतावा (रिटर्न) मिळविण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असतो. यावर लिक्विड म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय आहे. काय आहे हा लिक्विड म्युच्युअल फंड, हे आज आपण पाहू.   म्युच्युअल फंडाच्या लिक्विड स्कीममधील गुंतवणूक विविध प्रकारच्या अल्प…

डेट फंडाविषयी अधिक काही —

वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने आज रेपो दरामध्ये ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचा फटका म्युच्युअल फंडातील डेट फंडांना होणार आहे. अशा स्थितीत डेट फंडातून बाहेर पडायचे की त्यातील गुंतवणूक सुरू ठेवायची? हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. एक गुंतवणूकदार म्हणून कोणत्याही साधनात गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील जोखीम, उद्देश आणि वेळ याचा संबंध याचा विचार करायला हवा. गुंतवणुकीसाठी कोणत्याही साधनाची निवड या तीन बाबींवरच अवलंबून असते. आर्थिक कारणांचे भाकीत करणे व ते नियंत्रित करणे आपल्या हाती नाही. मात्र, या तीन बाबींच्या आधारे गुंतवणुकीसाठीचे चांगले धोरण नक्कीच ठरवता येते. डेट फंड हे बॉण्ड/ रोख्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. बाँड किमती…

रिलायन्स पॉवर अॅण्ड इन्फ्रा फंड

रिलायन्स पॉवर अ‍ॅण्ड इन्फ्रा फंड मुख्यत्वे विद्युत (निर्मिती, पारेषण आणि वितरण) आणि पायाभूत सुविधा क्षेत्राशी संबंधित कंपन्यांतून गुंतवणूक करणारा फंड आहे. रिलायन्स डायव्हर्सीफाइड पॉवर सेक्टर फंडाला २८ एप्रिल २०१८ पासून रिलायन्स पॉवर अ‍ॅण्ड इन्फ्रा फंड ही नवीन ओळख मिळाली. फंडाच्या गुंतवणुकीत लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, केईसी, जीई पॉवर, पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन, जिंदाल स्टेनलेस स्टील (हिस्सार), केएसबी पंप, अपार इंडस्ट्रीज, टोरेन्ट पॉवर आणि एनटीपीसी या आघाडीच्या गुंतवणुका आहेत. फंड सक्रिय व्यवस्थापन असलेला फंड असून मागील महिन्यांत फंडाने आयसीआयसीआय बँक आणि टेक्समॅको या गुंतवणुका विकून टाकून भारत इलेक्ट्रॉनिक्स, इंडिया सिमेंट, भारती एअरटेल, जेके सिमेंट या कंपन्यात नव्याने गुंतवणूक केली. फंडाच्या गुंतवणुकीत मिड कॅप…

अति घाई ****नेई

आजकाल विविध माध्यमातून म्युच्युअल फंडाबाबत आणि त्यातील "सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' (एसआयपी) या संकल्पनेविषयी जनजागृती केली जात आहे. पण बऱ्याचदा काही गुंतवणूकदार कमी कालावधीसाठी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात आणि शेअर बाजाराप्रमाणे अल्पावधीत अधिक परताव्याची अपेक्षा धरतात. त्यामुळे कमी कालावधीत मात्र कमी परतावा मिळाल्यानंतर 'एसआयपी' बंद करण्याचा निर्णय घेतात.    'एसआयपी' बंद करण्याआधी किंवा म्युच्युअल फंडातुन बाहेर पडण्याआधी गुंतवणूकदारांनी पुढील गोष्टींचा विचार करायला हवा    1) जेव्हा तुमचा म्युच्युअल फंड 'अंडरपरफॉर्म' करतोय  सर्व प्रथम म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवताना दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवायला हवे. त्यामुळे जेव्हा तुमचा म्युच्युअल फंड एखाद्या तिमाहीत 'अंडरपरफॉर्म' करत असेल अशावेळी 'एसआयपी' बंद करण्याची किंवा  म्युच्युअल फंडातुन बाहेर पडण्याची घाई करून…

समज- गैरसमज

म्युच्युअल फंडाविषयी अनेकांचे काही समज- गैरसमज आहेत. त्यावर एक नजर टाकूया. १) म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार नव्हे - म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजाराशी निगडित योजना नव्हेत. त्यांच्या ‘लिक्विड’, ‘डेट’ योजनासुद्धा असतात, ज्यांचा शेअर बाजाराशी संबंध नसतो. २) डी-मॅट खाते - म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी ‘डी-मॅट’ खाते आवश्‍यक नसते; परंतु तसा पर्याय उपलब्ध असतो. गुंतवणूकदार त्यांची म्युच्युअल फंड युनिट्‌स ‘डी-मॅट’ खात्यामध्ये ठेवू शकतात. डी-मॅट नसले तरी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. ३) केवायसी अर्थात नो युवर क्‍लायंट - ‘केवायसी’ची प्रक्रिया एकदाच करावी लागते. ती सर्व म्युच्युअल फंडांना लागू पडते आणि त्यासाठी कोणतीही फी द्यावी लागत नाही. ४) म्युच्युअल फंड योजना बंद पडत…

नियमितपणा महत्वाचा

आपल्या आयुष्यात नियमितपणाचे फायदे किती असतात हे आपण जाणतो. व्यायाम, आहार इत्यादी अनेक बाबींमध्ये नियमित आणि शिस्तीने वागल्यास होणारे लाभ खूप असतात. आणि हा नियमितपणा जर दीर्घ काळ सांभाळता आला तर? अर्थात अनेकपट कमाई! गुंतवणुकीतही हेच तत्त्व लागू पडते. पावसाळा, थंडी, उन्हाळा अशा सर्व मोसमात व्यायाम करणाऱ्याच्या पदरात उत्तम प्रकृतीचे फळ पडते; तसेच नियमित आणि शिस्तीने गुंतवणूक करणाऱ्यांनाही आर्थिक लाभाचे फळ मिळते, असे दिसून येते. आणि अर्थातच फक्त थोड्या दिवसांसाठी हे न करता अनेक वर्षे ही गुंतवणूक केल्यास होणारा लाभ लक्षणीय असतो. भारतीय गुंतवणूकदार हा खूप लाभ थोड्या काळात मिळण्याची अपेक्षा करतो. त्यामुळे जास्त मुदतीसाठी (बॅंक मुदत ठेवी सोडून) भांडवल…

श्रीमंत व्हायचंय?

श्रीमंत व्हावं, असं कोणाला वाटत नाही? पण, या जगात कोणीही अपघाताने श्रीमंत होत नाही. संपत्ती निर्माण करण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टी करण्याचा निश्‍चय करावा लागतो. यासाठी सर्वांत आधी आपल्या मानसिकतेत करावा लागणारा बदल महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने श्रीमंत होण्यासाठी जे काही नियम आणि सवयी पाळण्याची गरज असते, त्यावर एक नजर टाकूया.     "मला हे इतक्‍यात शक्‍य नाही. पुढील वर्षी पगारवाढ झाल्यावरच मी गुंतवणूक करीन," हे वाक्‍य आपण अनेकांच्या तोंडून ऐकलेलं आहे. कोणत्याही गोष्टीत दिरंगाईची सवय वाईटच. मात्र, गुंतवणुकीबाबत दिरंगाई केल्यास आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात, त्यामुळे गुंतवणुकीला सुरवात करण्यास उशीर करू नये. तुम्ही जेवढा उशीर कराल, तेवढी परिस्थिती…

स्वागतार्ह बदल

आतापर्यंत म्युच्युअल फंड कंपन्या एका विभागामध्ये (लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आदी) कितीही योजना आणू शकत होत्या, त्यामुळे योजनांचे पेव फुटून दोन हजारांच्या वर योजना तयार झाल्या होत्या. त्याचप्रमाणे, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप याविषयी प्रत्येक म्युच्युअल फंड त्यांच्या स्वतंत्र व्याख्या ठरवीत होते आणि त्याप्रमाणे शेअर खरेदी करीत होते. यामुळे, गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण होत होता आणि त्यांना विविध कंपन्यांच्या योजनांची योग्य तुलना करता येत नव्हती. योजनांची संख्या बरीच असल्याने कोणत्या म्युच्युअल फंडाची कोणती योजना निवडावी, यामध्येसुद्धा क्‍लिष्टता होती.     विविध विभागांमध्ये एकसमानता, सुबोधता, सुसूत्रता आणि प्रमाणबद्धता आणून गुंतवणूकदारांना योजनांची योग्य तुलना करता यावी आणि त्यांची…

End of content

No more pages to load