मुलांना शिकवा ‘हे’ 10 अर्थमंत्र…
1. बचतीचे महत्त्व "तुम्हाला पैशाची किंमतच नाही" हा घराघरात वापरला जाणारा वाकप्रचार. अलीकडच्या काळात चैनीवर पैसा खर्च करण्याची वृत्ती वाढत चालली आहे. आयुष्यात हौसमौज पूर्ण करण्यात वावगे काहीच नाही. मात्र त्याआधी आवश्यक असलेली बचत नक्कीच केली पाहिजे. नवराबायको कमावते असण्याच्या काळात बचतीचे महत्त्व पुन्हा एकदा लक्षात घ्यायची वेळ आली आहे. मुलांना त्यांच्या पॉकेटमनीतून बचत करण्याची सवय लावली पाहिजे. यातून त्यांना आपल्या वाट्याला येणाऱ्या पैशाचे नियोजन, खर्च आणि बचतीचा ठोकताळा मांडण्याची सवय जडेल. हिच सवय त्यांना भविष्यात संपत्ती निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरेल. गरज आणि चैन यातील फरक मुलांच्या लक्षात आणून दिला पाहिजे. 2. मेहनतीचे फळ मिळतेच मुलांना दैनंदिन…