अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंड

अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंड हा ‘ईएलएसएस फंड’ गटात सर्वाधिक मालमत्ता आणि गुंतवणूकदारांना चांगला ‘एसआयपी’ परतावा दिलेला फंड आहे. २० सप्टेंबर २०१८च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार एका वर्षांच्या एसआयपी परताव्याच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर, पाच वर्षांच्या एसआयपी परताव्याच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला हा फंड आहे. या फंडातील गुंतवणूक वैयक्तिक करदात्यांसाठी आयकराच्या ‘कलम ८० सी’खाली मिळणाऱ्या कर वजावटीस पात्र असून फंडाच्या सुरुवातीपासून मागील १०५ महिने दरमहा ५००० रुपयांची नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या ५.२५ लाख गुंतवणुकीवर वार्षिक १९.३२ टक्के नफा मिळाला आहे. २० सप्टेंबर २०१८च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार या गुंतवणुकीचे बाजारमूल्य १२.५७ लाख रुपये होते. ३१ ऑगस्ट रोजी फंडाची मालमत्ता १८,७५२ कोटी रुपये होती.…

गुंतवणूक कशी करावी?

गुंतवणूक ही निश्चितच एक दीर्घकालीन कृती असते. यामधील टप्पे आपल्याला उद्दिष्टांकडे घेऊन जातात. शक्यतो एक विशिष्ट उद्दिष्ट मनात ठेवून त्याप्रकारे गुंतवणूक करण्यास सुरुवात व्हायला हवी. त्याखेरीज गुंतवणुकीचा क्षमता आणि जोखीम पेलण्याची ताकद यांच्यानुसारही तुम्ही गुंतवणूक निर्णय घेऊ शकता. हे घटक निश्चितझाले कि योग्य पर्यायांची निवड करावी. दूरदृष्टी ठेवून मालमत्ता विभाजन करणे ही आर्थिक सक्षमीकरणाची पहिली पायरी असते. मालमत्तेचे योग्यप्रकारे विभाजन न केल्यास इक्विटीसारख्या अगदी उत्तम पर्यायदेखील अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरतात. आपल्या संपत्तीस्रोतांचे विविध प्रकारांमध्ये अशाप्रकारे वाटप करायचे की, ज्यामध्ये जोखीम आणि लाभ यांचा उत्तम समतोल साधला जाईल आणि परिणामी अपेक्षित परतावा मिळेल. मालमत्तेचे इक्विटी, डेट आणि रोकड (कॅश) हे…

खालील समभागावर लक्ष असुद्या !!

खालील समभागावर लक्ष असुद्या !! 1. रिलायन्स इंडस्ट्रीज : आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म सीएलएसएने रिलायन्सचा शेअर विकत घेण्याकडे कल दाखवला आहे.    2. भारत फोर्ज : क्रेडीट सुझे या प्रसिद्ध वित्तसंस्थेने भारत फोर्ज निर्यातीतून चांगला महसूल मिळवेल असे सांगत भारत फोर्जवर लक्ष दिले आहे.   3. ग्रासिम इंडस्ट्रीज : डाईश बॅंकेला ग्रासिम इंडस्ट्रीजकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कंपनी चांगला नफा मिळवेल असे मत डाईश बॅंकेने व्यक्त केले आहे.   4. टाटा मोटर्स : नोमुरा या ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्सवर विश्वास दाखवला आहे. जग्वारची चीनमध्ये वाढत असलेली मागणी पाहता, पुढील वर्षी होणारी कंपनीची वाटचाल दमदार असेल असे मत नोंदवण्यात आले आहे.   5.…

एफएमपी म्हणजे काय?

म्युच्युअल फंडांच्या संदर्भात निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स- एफएमपी)  नक्की असतात काय हे आपल्याला माहीत नसतं. अल्पबचत योजनांचे घटते व्याजदर, शेअर बाजारामधली अनिश्‍चितता, चलनवाढ या सर्वांमुळं आज बॅंकेपेक्षा जास्त व्याजदर आणि मुद्दलाची तुलनात्मक सुरक्षितता यासाठी नक्कीच आकर्षक ठरणाऱ्या या एफएमपी आहेत. या योजना नक्की काय असतात,  हे आपण थोडक्‍यात पाहू या.   म्युच्युअल फंडांच्या रोखे म्हणजे डेट विभागामध्ये येणाऱ्या या योजना. या योजनांची मुदत तीस, साठ, नव्वद, एकशे वीस दिवसांपासून ते पाच वर्षांपर्यंत असते. या योजनांमध्ये प्रवेशभार आणि बहिर्गमनभार नसतो. या योजनांमधला एकही पैसा शेअर बाजारामध्ये गुंतवला जात नाही. योजनांमधल्या पैशांची गुंतवणूक ही बॅंका आणि कंपन्यांचे विविध पेपर्स- उदाहरणार्थ,…

अल्फा आणि बीटा

बीटा म्हणजे काय?  "बीटा' हा म्युच्युअल फंडातील लाभ-जोखीम यांचे गुणोत्तर मांडतो. उदाहरणार्थ एखाद्या फंडाचा बीटा 1.50 असेल, तर त्याचा अर्थ होतो, की निर्देशांक (सेन्सेक्‍स, निफ्टी) एक टक्‍क्‍याने वर-खाली झाला, तर संबंधित फंडात 1.50 टक्‍क्‍यांची हालचाल होते. म्हणजेच निर्देशांक 10 टक्‍क्‍यांनी वाढला, तर हा फंड 15 टक्‍क्‍यांनी वाढला पाहिजे. तसेच, निर्देशांक 10 टक्के कोसळला, तर हा फंड जास्तीतजास्त 15 टक्के कोसळला पाहिजे. याचाच दुसरा अर्थ असा होतो, की अधिक "बीटा' असलेला फंड तेजीच्या काळात निर्देशांकाच्या तुलनेत खूप जास्त परतावा देऊ शकतो. परंतु, मंदीच्या काळात तो निर्देशांकाच्या तुलनेत वेगाने कोसळतो. इंडेक्‍स फंडांचा "बीटा' मात्र कायम 1 असणे अपेक्षित असते, कारण त्यातील चढ-उतार…

फंडात ‘रिस्क’ कोणती ?

‘म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते,’ हा ‘डिस्क्‍लेमर’ वाचला की बहुतेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून चार हात लांब राहणे पसंत करतात.  या ‘डिस्क्‍लेमर’चा खरा अर्थ समजावून घेण्याची वेळ आली आहे. जोखमीचा उल्लेख कशासाठी? ‘सेबी’च्या कार्यकाळाअगोदर म्युच्युअल फंडांना या ‘डिस्क्‍लेमर’चा उल्लेख करणे अनिवार्य नव्हते. त्यामुळे काही मध्यस्थ चुकीची माहिती देऊन योजनांची विक्री करायचे, ज्याला ‘मिस सेलिंग’ असे म्हणतात. काही म्युच्युअल फंड (मार्केटिंग) मेंबर्ससुद्धा त्यांची टार्गेट्‌स पूर्ण होण्यासाठी चुकीच्या पद्धतीने योजना विकायचे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान व्हायचे. हे लक्षात घेऊन ‘सेबी’ने म्युच्युअल फंडांना त्यांच्या प्रत्येक योजनेमध्ये आणि प्रत्येक माध्यमांमध्ये जोखमीचा ठळकपणे उल्लेख करावा लागेल; त्याचप्रमाणे परतावा आणि मुद्दलाची खात्री देता येणार नाही,…

जगातील सर्वाधिक महागडे शेअर…

1. बर्कशायर हॅथवे - 3,03,100 डॉलर्स (2,06,10,800 रुपये) प्रति शेअर 2. लिन्ट अॅंड स्पृंगलाय ए जी - 72,037 डॉलर्स (4898569 रुपये) प्रति शेअर 3. नेक्स्ट पीएससी - 6,553 डॉलर्स (445604 रुपये) प्रति शेअर 4. सीबोर्ड कॉर्पोरेशन - 4,019 डॉलर्स (273292 रुपये) प्रति शेअर 5. एनव्हीआर इन्कॉर्पोरेशन - 2,900 डॉलर्स (197200 रुपये) प्रति शेअर 6. बुकींग होल्डींग्स इन्कॉर्पोरेशन - 2,033 डॉलर्स (138244 रुपये) प्रति शेअर 7. अॅमेझॉन इन्कॉर्पोरेशन - 1,500 डॉलर्स (102000 रुपये) प्रति शेअर 8. मार्केल कॉर्पोरेशन - 1,116 डॉलर्स (75888 रुपये) प्रति शेअर 9. मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेड (एमआरएफ) - 1,109 डॉलर्स (75412 रुपये) प्रति शेअर 10. अल्फाबेट इन्कॉर्पोरेशन…

कर्ज किती घ्यावे?

तुम्हीसुद्धा तुमच्या कर्जाचा नीट विचार करा आणि ईएमआयच्या विळख्यातून बाहेर पडा.   आय पाहून खर्च. स्टेट्स सांभाळताना खिसे खाली नको. कर्ज घेताना आपण नक्की का कर्ज घेतोय – खर्च वाढवण्यासाठी (वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज) की गरज भागवण्यासाठी (गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज)? या कर्जाची आपल्याला खरंच गरज आहे का? ईएमआयच्या व्यतिरिक्त अजून कोणते खर्च करावे लागणार? या प्रश्नांचं निश्चित उत्तर मिळवा. चैनीसाठी कर्ज घेऊ नका. मिळकतीच्या ४० टक्क्य़ांपर्यंत ईएमआय ठीक आहे. त्यापेक्षा जास्त असेल तर जरा परत एकदा तपासा. नवीन नोकरी लागल्यावर शक्यतो कर्ज घेणं टाळा. जास्तीत जास्त पैसे वाचवून गुंतवणूक करा. घरासाठी कर्ज घ्यायच्या आधी किमान ७-८ वर्ष शेअर्स किंवा…

महत्त्वाचे काय?

  ’  समभाग विकत घेताना आणि विकताना ‘चेकलिस्ट’ वापरा. ती नेहमी छोटी आणि वाजवी ठेवा ’  गुंतवणुकीपूर्वी आवश्यक ती खबरदारी घ्या. सुरक्षित मार्जिन ठेवा, कधीही अघळपघळ गुंतवणूक करू नका. ’  ‘विकत घ्या आणि सांभाळा’ या धोरणाचा अवलंब करा आणि ठरावीक कालावधीने त्याचा पडताळा करा. जितके कमी तुम्ही बाजारातील चढ-उतार पाहाल आणि तुमचा पोर्टफोलिओ तपासून पाहाल तितके कमी तुम्ही शेअर बाजारातील नैसर्गिक चढ-उतारांमध्ये भावनिकरीत्या निर्णय घ्याल. ’  दीर्घकालीन गुंतवणुकीचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. जर तुम्ही एखादा समभाग १० वर्षांसाठी ठेवणार असाल तर एखाद दिवसाचा परतावा गेला तरी फरक पडत नाही. जेव्हा तुम्हाला पॅनिक वातावरण जाणवते तेव्हा आणखी एखादा दिवस वाट पाहा.…

संयमाची कसोटी !

म्युच्युअल फंडात संयम ठेवून, दीर्घकाळ, शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास फायदा होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे अल्प काळातील परताव्याकडे पाहून लगेच निष्कर्ष काढू नये. म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांची कामगिरी दरवर्षीच चमकदार राहील, अशी अपेक्षा ठेवणे रास्त नाही. 3 ते 5 वर्षांच्या कालावधीनंतर त्यातील जोखीम कमी होत जाते...    अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नवे गुंतवणूकदारही या प्रकारात गुंतवणूक करताना दिसत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण गेल्या वर्षभरापासून ज्यांनी गुंतवणुकीला सुरवात केली आहे, त्यांना सध्या फायदा झालेला दिसत नाही. परंतु इतक्‍या कमी कालावधीत गुंतवणुकीचा आढावा घेऊन कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. म्युच्युअल फंडात संयम ठेवून,…

End of content

No more pages to load