टाळण्याजोगे काही—-
मी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचे नियोजन करतो, तेव्हा अशी गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, याकडे लक्ष देतो. त्यापैकी पुढील प्रमुख नऊ गोष्टींचा मी येथे उल्लेख करीन. १) म्युच्युअल फंडात लाभांश पर्याय शक्यतो निवडू नये. या पर्यायात आपलेच पैसे आपणास लाभांश रूपाने मिळतात व तेही लाभांश कर वजा करून! २) एकरकमी पैसे गुंतवताना, पाच वर्षांपेक्षा जास्त गुंतवणूक कालावधी नसेल, तर इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू नये. आपली गुंतवणूक केलेली रक्कम घटण्याची शक्यता असते. ३) डेट हायब्रिड फंडात गुंतवणूक करू नये. कारण या पर्यायात इतर डेट फंडांपेक्षा जास्त व्यवस्थापन शुल्क आकारले जाते. याचा परिणाम आपल्या परताव्यावर होऊ शकतो. …