“शार्प रेशो’
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सर्वसामान्य गुंतवणूकदाराने एखाद्या योजनेने भूतकाळात किती परतावा दिला आहे, या एकाच निकषावर अवलंबून न राहता त्या फंडातील जोखीम आणि त्याने दिलेला परतावा, यांचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी "शार्प रेशो'चा अर्थ समजावून घेतल्यास फंडाची निवड करताना त्याचा उपयोग होऊ शकतो. कमीतकमी जोखीम घेऊन अधिक काम करणाऱ्या व्यक्तीला आपण "शार्प' अर्थात चाणाक्ष म्हणतो. व्यक्तीप्रमाणेच म्युच्युअल फंडसुद्धा किती "शार्प' आहे, हे ठरविता येते. त्यासाठी "शार्प रेशो'ची मदत घेतली जाते. फंडाने घेतलेली जोखीम आणि दिलेला परतावा याचे गुणोत्तर हा रेशो मांडतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सर्वसामान्य गुंतवणूकदाराने एखाद्या योजनेने भूतकाळात किती परतावा दिला आहे, या एकाच निकषावर अवलंबून…