कर्जदारांना दिलासा ?

देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये दिवसेंदिवस वाढ करण्यात येत आहे. परिणामी अर्थव्यवस्था मंदीच्या चक्रात अडकली आहे. सर्व उद्योग व्यवसाय ठप्प असल्याने उत्पन्न घटले आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.   लॉकडाउनमध्ये उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांसाठी कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती देण्याचे बँकांना निर्देश दिले होते. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात बँकांनी कर्जाचा हप्ता स्थगित केला होता. मात्र अजूनही लॉकडाउनमध्ये वाढ होत असल्याने बँक ग्राहकांच्या कर्जाचे हप्ते स्थगितीचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. आणखी तीन महिने ईएमआय स्थगित होण्याची शक्यता 'एसबीआय'ने अहवालात व्यक्त केली आहे.

‘यूटीआय व्हॅल्यू अपॉर्च्युनिटीज फंड’

‘यूटीआय व्हॅल्यू अपॉर्च्युनिटीज फंड’ बाजारात साधारणपणे संपूर्ण व्याप्ती असलेल्या गुंतवणुकीच्या संधी शोधणारा फंड आहे. आपल्या अंगभूत मूल्यापेक्षा कमी किंमत असणाऱ्या शेअर्सचा शोध घेऊन, ते शेअर कोणत्याही ‘मार्केट कॅप’मध्ये असले तरी, त्यांच्यात गुंतवणूक करण्याची संधी हा फंड घेत असतो. हे खरे तर ‘मल्टी कॅप’ फंडाचे लक्षण आहे. आपल्या समभागधारकांसाठी कंपनीने विशिष्ट काळात उभारलेल्या रोखीची वर्तमान किंमत म्हणजे त्या शेअरचे अंगभूत मूल्य होय. कमी मूल्यमापन झालेल्या दोन प्रकारच्या कंपन्या बाजारात साधारणपणे आढळून येतात. एखाद्या कंपनीची स्पर्धात्मक शाश्वती बाजाराला कमी वाटली आणि / किंवा त्या कंपनीची प्रगती होण्यास फार काळ लागणार असल्यास संबंधित कंपनीच्या शेअरचे मूल्य कमी गणण्यात येते. अशा कंपन्या बाजाराच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या प्रवाहानुसार चाललेल्या…

कॅनरा बँकेची सुवर्ण कर्ज योजना सुरू

कॅनरा बँकेने सध्याच्या आव्हानात्मक स्थिती आणि अनिश्चिततेवर मात करण्यासाठी व्यावसायिकांसाठी विशेष सुवर्णकर्ज योजना सुरू केली आहे. ग्राहकांना कमी व्याजदरात जलदरीत्या आणि सोप्या पध्दतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा बँकेने सुरू केली आहे. या कर्जामुळे ग्राहकांची खेळत्या भांडवलाची गरज भागवली जाऊन त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढवण्याकरता आवश्यक रक्कम मिळणार आहे. बँकेने ३० जूनपर्यंत विशेष सुवर्णकर्ज मोहीम सुरू केली असून याकरता ७.८५ टक्के वार्षिक व्याजदर आकारण्यात येणार आहे.

टीडीएसआणि टीसीएसमध्ये कपात

उगम करात (टीडीएस) आणि टीसीएसमध्ये कपात करण्यात आली असून ही कपात गुरुवारपासून लागू करण्यात आली आहे. ही करकपात ३१ मार्च २०२१पर्यंत लागू असणार आहे. एकूण २३ करपात्र गोष्टींवरील टीडीएस कमी करण्यात आला आहे. टीडीएस व टीसीएसमध्ये कपात केल्यामुळे करदात्यांच्या हातात सुमारे ५० हजार कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. तेंदूच्या पानांची विक्री, भंगाराची विक्री, लाकूडविक्री, जंगलातील उत्पादनांची विक्री तसेच दगडी कोळसा, लिग्नाइट किंला लोह यांची विक्री यांवर लागू होण्याऱ्या टीसीएसमध्येही कपात करण्यात आली आहे. मात्र पॅन व आधार क्रमांक सादर करू न शकलेल्या करदात्यांसाठी टीडीएस व टीसीएसमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. टीडीएस व टीसीएल कमी करण्यामागे केंद्र सरकरचा उद्देश करदात्यांच्या…

फ्रँकलिन टेम्पल्टन करणार निधी परत

फ्रँकलिन टेम्पल्टन इंडियाने आपल्या तीन लाख गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत देण्यासाठी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. या गुंतवणूकदारांची रक्कम बंद झालेल्या सहा डेट फंडांमध्ये अडकली होती. गेल्या आठवड्यात सेबीने कंपनीला दिलेल्या इशाऱ्यानंतर ही पावले उचलण्यात आली आहेत.

आर्थिक पॅकेजमधील प्रमुख घोषणा 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील प्रमुख घोषणा     प्राप्तिकर   - प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ   - टॅक्स ऑडिट करण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविली भविष्य निर्वाह निधी   - प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजतंर्गत पीएफ फंडात कंपनीकडून देण्यात येणारे 12 टक्के आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येणारे 12 टक्क्याचा भार सरकार उचलणार   -मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरकार पीएफ भरणार आहे. त्यात आणखी तीन महिन्यांनी वाढ. आता  जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पीएफचा भार सरकार उचलणार   -उद्योगांना 2500 कोटी रुपयांचा फायदा होणार   - 3.67 लाख कंपन्यांना थेट फायदा मिळणार   - कंपन्यांमधील 72.22…

उत्तम शेअर घेऊन ठेवा !

कोरोना विषाणूचा जागतिक विळखा वाढत असतानाही जागतिक शेअर बाजार वाढत आहेत. युरोपीयन, अमेरिकन व आशियाई बाजार वाढत आहेत. अमेरिकन ’नॅसडॅक’ हा निर्देशांक त्याच्या सर्वोच्च पातळीपासून केवळ ५.५ टक्के दूर आहे. मात्र, आपला राष्ट्रीय निर्देशांक अर्थात ‘निफ्टी’ त्याच्या सर्वोच्च पातळीपासून २५.५८ टक्के दूर आहे. जागतिक बाजार वाढताहेत, याचा अर्थ जागतिक पातळीवरील कोरोना संकट संपले असे नाही. जगाचा विचार करता या रोगाच्या बाधीतांची संख्या ४० लाखांजवळ असून तो अजूनही ६०-६५ अंशाच्या रेषेत वाढत आहे. तसेच मृतांचा (२६९०६८) आकडाही त्याच रेषेत वाढत आहे. असे असले तरी प्रतिदिन बाधित होणार्‍यांची संख्या ५ एप्रिल (८६,४८४) नंतर आज (९४,१५८) पर्यंत आडव्या रेषेत आहेत. प्रतिदिन मृत होणार्‍यांची संख्याही…

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’

सुकन्या समृद्धी योजना ही सरकारची स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे. मुलींसाठी ही योजना सर्वात लोकप्रिय असून सरकारने 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' या अंतर्गत ही योजना सुरू केली होती. या योजनेनुसार पालक आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळू शकते. सध्याच्या नियमानुसार जर मुलगी लहान असताना यात गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास तर १५ वर्ष गुंतवणूक करता येते. सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या ८.४ टक्के इतका व्याज दर दिला जात आहे. या योजनेत गुंतवणूक करताना जो व्याज दर असतो तोच पूर्ण कालावधी संपेपर्यंत मिळतो. त्यामुळे तुम्ही जर आता (एप्रिल ते जून २०२०)…

या गोष्टी देतील तुम्हाला सावरण्याचे बळ!

या दीर्घकालीन लॉकडाउनमुळे उद्योग व्यवसाय संकटात सापडले आहेत. नोकर कपात तसेच वेतन कपातीची टांगती तलवार सध्या कर्मचाऱ्यांवर आहे. सक्तीची रजा, पगाराविना रजेमुळे भविष्यात आर्थिक संकट वाढेल. अशा परिस्थितीत मानसिक तणाव वाढला आहे. करोनामुळे आर्थिक स्थिती आणखी बिकट होणार आहे. याचा किती परिणाम होईल, याचे अंदाज बांधले जात आहेत. प्रत्येकासाठी ही परिस्थिती वेगवेगळी आहे. येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी काही पथ्य पाळणे आवश्यक आहे. स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियांना या महासंकटातून वाचवण्यासाठी सज्ज व्हायला हवं. पुढील काही गोष्टी अंगिकारल्या तर करोनापासून होणार टाळता येईल. निराश होऊ नका, स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. अवास्तव खर्चाला नियंत्रणात ठेवा खर्चाचा फेरआढावा घ्या आपत्कालीन निधी नसल्यास…

आयसीआयसीआय लोम्बार्ड

सर्वसाधारण विमा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात थेट प्रिमीयमचे ढोबळ उत्पन्न 133 अब्ज 13 कोटी रुपये एवढे नोंदविले आहे. तर करोत्तर नफा 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 13.8 टक्क्यांनी वाढून 10 अब्ज 49 कोटींवरुन 11 अब्ज 94 कोटी रुपयांवर झेपावला आहे.   करोनाचे संकट तसेच अर्थव्यवस्थेपुढे असलेल्या अनेक आव्हानांमुळे  थेट प्रिमीयमच्या ढोबळ उत्पन्नात गेल्या वर्षाच्या तुलनेत 8.1 टक्के घट झाली आहे. 2019 मध्ये हेच उत्पन्न 144 अब्ज 88 कोटी रुपये एवढे होते. परंतु पीकविमा क्षेत्र वगळल्यास याच उत्पन्नात 2019 च्या तुलनेत तब्बल 10.5 टक्के वाढ झाली आहे. हे उत्पन्न 120 अब्ज…

End of content

No more pages to load