मॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अॅक्ट, १८७४
मॅरिड वुमन प्रॉपर्टी अॅक्ट, १८७४ अंतर्गत विवाहित पुरुष आपल्या पत्नीचे, मुलांचे भविष्य विम्याच्या गुंतवणुकीद्वारे सुरक्षित करू शकतो. आपल्या मृत्यूपश्चार्त किंवा हयातीत देणेकरी, नातेवाईक, बँर्का किंवा कोणत्याही सबबीवर पत्नी आणि मुलांच्या हक्काच्या मालमत्तेवरील (विमा दाव्यांवर) कायदेशीर हक्क अबाधित ठेवण्याकरता एमडब्ल्यूपी कायद्याच्या कलम ६ अन्वये विमा पॉलिसी घेतली जाऊ शकते. – टर्म पॉलिसीद्वारे गृहकर्जे, व्यक्तिगत कर्जे, मुलांचे शिक्षण यांचा भविष्यवेध घेऊन जीवन विमा उतरवला तरीही केवळ पत्नी तसेच मुलांनाच योग्य वेळी संपूर्ण विमा राशी उपभोगता येणे काही वेळा अशक्य होऊ शकते. कुटुंबप्रमुखाच्या अकाली मृत्यूनंतर कर्जदार, देणेकरी मृत्यूदाव्याचे अधिकार मागू शकतात. भारतीय कुटुंब व्यवस्थेतील एकत्र कुटुंब पद्धतीत इतर नातेवाईकही मालमत्तेवर अधिकार मागू शकतात.…