मूर्ती लहान, पण कीर्ती महान!
‘एसआयपी’चे महत्त्व अधिक खोलात जाऊन अधोरेखित करणारे काही मुद्दे खालीलप्रमाणे १) लवकर सुरवात करा - ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’, या वचनानुसार गुंतवणूक चालू करण्यास ‘आता’पेक्षा चांगला मुहूर्त नाही. जितक्या लवकर ‘एसआयपी’ चालू कराल, तितका फायदा जास्त होईल; शिवाय कमी वयात गुंतवणूक करायला लागणारी रक्कमही कमी असेल. उदा. जर एखाद्याचे निवृत्तीपर्यंत रु. पाच कोटी जमा करण्याचे उद्दिष्ट असेल आणि निवृत्तीला अजून ३० वर्षे कालावधी बाकी असेल, तर साधारणपणे १२ टक्के द. सा. द. शे. परतावा मानल्यास दरमहा फक्त ५७२२ गुंतविल्यास हे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. २) महागाई दरापेक्षा अधिक परतावा - गेली दहा वर्षे एखाद्याने इक्विटी फंडामधील ‘एसआयपी’…