नेट बॅंकिंगबाबत खबरदारी

इंटरनेट बॅंकिंग इंटरनेट बॅंकिंग वापरताना बऱ्याचदा आपण ऑनलाइन पेमेंटच्या सुरक्षिततेचा विचार करत नाही. इंटरनेट बॅंकिंगची सुरक्षितता कशी तपासावी किंवा आपला व्यवहार कसा सुरक्षित ठेवावा याची माहिती असणं गरजेचं आहे. पुरेशी काळजी न घेतल्यास ऑनलाइन व्यवहार करताना आर्थिक फटकाही आपल्याला बसू शकतो. इंटरनेट बॅंकिंग वापरताना खालील गोष्टींची काळजी घेतल्यास आपला व्यवहार आपण सुरक्षित ठेवू शकतो : - आपण वापरत असलेला वेब ब्राऊझर सुरक्षित आहे का ते तपासावं. - शक्‍यतो वेब ब्राऊझरचं अपडेटेड व्हर्जन वापरावं- ते अधिक सुरक्षित असतं. - आपला इंटरनेट बॅंकिंगचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहावा. - आपलं स्वतःचं नाव, जन्मतारीख, प्रिय व्यक्तीचं नाव यांनी बनलेला पासवर्ड वापरणं टाळावं. - आपल्या…

मराठी माणूस “मागे” असण्याची कारणे…

मराठी माणूस "मागे" असण्याची २३ कारणे... मराठी माणूस आजच्या स्पर्धेच्या युगात मागे का पडतो ? आर्थिकद्रुष्ट्या का कमकुवत होतोय ? मराठी माणसातचं बेकारी व गरिबी का वाढतच चालली आहे ? त्यावर केलेले 'संशोधन' व "निरीक्षणाअंती २३ कारणे दिसून आली, जी मराठी माणसांनी "स्वतःला" विचारावीत व त्यावर "स्वतःच" उपाय योजना करावी. ह्या बाबी प्रत्येक मराठी माणूस 'सकारात्मकतेने' घेईल हिच अपेक्षा...! (वाद नको.! कारण, 'नाहक वादविवाद' मराठी माणूसचं घालतो..!!) १) कमी प्रवास - प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही. २) अति…

गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड?

तुम्ही तुमच्या गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करण्याचा विचार करीत आहात का?  या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पुढील मुद्द्यांचा विचार करा. १) कर्ज परतफेडीसाठी एकरकमी मोठी रक्कम वापरल्याने त्यानंतर आर्थिक समस्यांचा सामना तर करावा लागणार नाही ना, याचा तुम्ही विचार करायला हवा. कारण आपण साठवलेली रक्कम एकदम कमी झाल्याने दर महिन्याच्या खर्चांबरोबरच अचानक उद्‌भवणाऱ्या एखाद्या खर्चाची तरतूद करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी रक्कम शिल्लक राहिली नाही तर काय होईल? याची खात्री नसल्यास कर्जाची पूर्ण परतफेड एकरकमी करण्याचा अट्टहास न धरता तुम्हाला शक्‍य असेल तेवढ्याच रकमेने कर्जाची परतफेड करणे सूज्ञपणाचे ठरेल. २) गृहकर्जाची परतफेड करण्यापूर्वी तुमच्यावर अधिक व्याजदराचे इतर कोणते कर्ज नाही ना, याची खात्री…

“टीसीएस बायबॅक’ एक फायदेशीर सौदा

चार सप्टेंबर 2017 च्या "सकाळ'मध्ये "इन्फोसिस'च्या शेअरच्या बायबॅकवर एक लेख आला होता. त्यातील सल्ल्याचा गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या आत साधारणपणे 30 टक्के फायदा झाला आहे. हे आठवण्याचे कारण म्हणजे "टीसीएस' कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअरची पुनर्खरेदी (बायबॅक) जाहीर केली आहे. एकूण खरेदी 16,000 कोटी रुपयांपर्यंतची होणार असून, प्रतिशेअर किंमत 2100 रुपये निश्‍चित केली गेली आहे. रेकॉर्ड तारीख अजून जाहीर व्हायची आहे. 7.62 कोटी शेअरची पुनर्खरेदी होणार असून, सध्याच्या नियमांप्रमाणे त्यातील 15 टक्के म्हणजेच 1.14 कोटी शेअर्स हे छोट्या (रिटेल) भागधारकांसाठी राखीव आहेत. कंपनीच्या मार्च 2018 च्या वार्षिक अहवालानुसार 6.85 कोटी शेअर हे रिटेल विभागामध्ये आहेत. ज्यांच्याकडे रेकॉर्ड तारखेला त्या दिवशीच्या बंद भावाप्रमाणे,…

ईएलएसएसचा लॉक पिरीयड संपल्यावर काय ?.

इक्विटी इन्व्हेस्टींग दीर्घ कालावधीकरिता असते. कारण इक्विटी मार्केट अल्प कालावधीसाठी अतिशय अस्थिर असू शकते– याचा अर्थ शेअरच्या किमतींमध्ये फार चढ-उतार असतो. तरीच दीर्घ कालावधीत फंडामेंटल्स बाजी मारू शकतात आणि दीर्घ कालावधीकरिता असणारे इक्विटी रिटर्न्स उल्लेखनीयदृष्ट्या स्थिर राहतात. उलट असे म्हटले जाते की, बाजार हा अल्प कालावधीतील सौंदर्य स्पर्धेसारखा तर दीर्घ कालावधीसाठी वजनी काट्याप्रमाणे असतो. या विसंगती गुंतवणुकदारांना भेडसावत राहतात आणि मग त्यामुळे ते इतर अनुकूल पर्याय शोधतात.   त्यामुळे गुंतवणूकदारांना अतिशय सावध राहणे आवश्यक ठरते. तसेच अल्प कालावधीत इक्विटी मार्केटमधून निव्वळ पैसा कमविण्याचा हेतू असता कामा नये.   तरीच दीर्घ आणि अल्प कालावधीची योग्य व्याख्या कोणती? याचा संबंध उत्पन्न आणि…

इंडेक्‍स फंड्‌स

इंडेक्‍स फंडांतील गुंतवणूक म्हणजे पैसा कमावण्याचा उत्तम मार्ग, असे गुंतवणूकगुरू वॉरेन बफे सांगतात. आपल्यानंतर आपली सर्व संपत्ती वारसांनी इंडेक्‍स फंडांत गुंतवावी, असेदेखील त्यांनी सांगून ठेवले आहे. अमेरिकी इक्विटी म्युच्युअल फंडांतील एकूण गुंतवणुकीपैकी साधारणतः २५ टक्के हिस्सा इंडेक्‍स फंडांचा आहे आणि ही गुंतवणूक २०२४ पर्यंत ‘ॲक्‍टिव्हली मॅनेज्ड’ इक्विटी फंडांतील गुंतवणुकीलाही मागे टाकेल, असा अंदाज ‘मूडी’ या आंतराष्ट्रीय पतमापन संस्थेने वर्तविला आहे. हे झाले अमेरिकेतील चित्र! भारतात मात्र इंडेक्‍स फंडांतील गुंतवणूक ही एकूण म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेच्या फारच कमी म्हणजे अवघी ३ टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. का आहे ही परस्परविरोधी स्थिती आणि काय आहेत हे इंडेक्‍स फंड्‌स? तेच आपण जाणून घेऊ या. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून…

एचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांत!!!!!!!!!

एचडीएफसी बॅंकेने नवीन प्रकारचे डिजीटल कर्ज देण्याची योजना आणली आहे. ग्राहकांकडे असलेल्या म्युच्युअल फंडाच्या आधारावर हे डिजीटल कर्ज त्वरित दिले जाणार आहे. या योजनेचे नाव डिजीटल लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड (एलएएमएफ) असे असणार आहे.   ग्राहकांकडे असलेल्या म्युच्युअल फंडाच्या युनिस्टना तारण ठेवत अवघ्या तीन मिनिटात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस अर्थात सीएएमएसशी संलग्न असलेल्या म्यु्च्युअल फंडाच्या संदर्भातच  हे कर्ज मिळणार आहे. सीएएमएस मु्ख्यत्वे म्युच्युअल फंड धारकांच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करते.    म्युच्युअल फंडाच्या आधारावर मिळणाऱ्या कर्जासाठी ग्राहकांना सर्वसाधारणपणे पाच ते सहा दिवस लागतात. या डिजीटल कर्ज योजनेमुळे आता फक्त तीन…

समाधानकारक निव्रुत्तिसाठी —-

A 35-year old, having a Rs 70,000 monthly expense, will need Rs 8 crore at retirement 'How much money should I have when I retire?' This is one of the most common questions that financial advisors and planner face when someone new approaches them for help with their future financial Goals. There is no easy answer to this question. The retirement corpus__the amount of money one would require to have a peaceful retired life__varies from person to person, depending on a host of factors, primarily the lifestyle one wants to maintain post retirement and hence the related expenses, said Sanjeev…

online विमा खरेदीचे फायदे

8 smart reasons to buy insurance online! In a 2014 survey named ‘Digital Natives on Protecting Life: Gauging knowledge, attitude and behaviour’, Nielsen interviewed 1000 effluent and high-income respondents from the four major Indian metros. Of these 84% respondents reported to have searched for insurance online and as many as 76% attempted to buy online, while 20% ended up buying. These are early and encouraging signs for the industry that is gearing up for the digital age. When it comes to buying insurance online, here are the top eight reasons that are driving the change: 1.Saves time Since you transact…

गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना शेअऱ बाजारातील चढ उतारांच्या संदर्भात सर्वसामान्य माणसाच्या मनात काही प्रश्न असतात. अशाच काही प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न : गुंतवणुकीसाठी बाजार खाली येण्याची वाट पाहावी का?  उत्तर : शेअर बाजारात प्रवेश करण्यासाठी अचूक वेळ साधणे खूप अवघड असते आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी अशा "टायमिंग'ची गरजदेखील नसते. त्यामुळे बाजार खाली येण्याची वाट न पाहता शक्‍य तितक्‍या लवकर गुंतवणूक सुरू करणे योग्य ठरेल. गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?  उत्तर : सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी कमीतकमी पाच वर्षांचा ठेवावा. त्यापेक्षा अधिक कालावधीचा दृष्टिकोन ठेवल्यास अधिक चांगले! शिवाय, बाजार कितीही आकर्षक दिसत असला तरीही आपली सर्व गुंतवणूक म्युच्यअल…

End of content

No more pages to load