म्युच्युअल फंडामधून आता बाहेर पडावे का?

   गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने केलेल्या रेकॉर्डब्रेक कामगिरीचे प्रतिबिंब इक्विटी म्युच्युअल फंडात देखील पडले  बहुसंख्या इक्विटी म्युचल फंडांच्या एन ए व्ही देखील त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श करून आल्याचे चित्र दिसत आहे.  या तेजीच्या पार्श्वभूमीवर आपण आपली इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक विकून कमावलेला नफा पदरात पाडून घेण्याचा विचार करत असाल तर पुढील मुद्द्यांचा विचार करा. 1)  म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरू करताना आपण ठरविलेले उद्दिष्ट साध्य झाले आहे का हे प्रथम पहा. आणि ते उद्दिष्ट साध्य झाले नसेल तर घाई घाईने आपली गुंतवणूक विकून टाकू नये. 2) म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची विक्री करून मिळणाऱ्या रकमेचे काय करणार याचा आधी विचार करून…

करमुक्त बॉन्ड्स

करमुक्त बॉन्ड्समध्ये गुंतवणुकीचे फायदे करमुक्त म्हणजे टॅक्स फ्री बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करण्याचे बरेच फायदे आहेत. जर तुम्ही २० ते ३० टक्के टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल तर तुम्हाला तुमच्या बँक ठेवींमधून ५० हजार रुपये व्याज मिळवण्यावर सुमारे १५ हजार रुपये कर भरावा लागेल. यामुळे तुमच्या हातात फक्त ३५ हजार रुपये येतात. दुसरीकडे, जर तुम्ही हे पैसे बँक ठेवींऐवजी करमुक्त बॉन्डमध्ये गुंतवले, तर त्यातून तुमच्या हातात उरण परतावा येईल, कारण यावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. कोणत्या बॉन्ड्समध्ये मिळतो चांगला परतावा? करमुक्त बाँड्समध्ये सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या बाँड्सबद्दल बोलायचे झाले तर HUDCO N2 मालिकेत तुम्हाला ८.२% व्याज मिळते, जे दरवर्षी मार्चमध्ये हस्तांतरित केले…

खरेदीसाठी काही चांगले समभाग पहा —

सर्वांना नमस्कार, भारतीय शेअर बाजारात आज नव्याने एक उच्चांक स्थापन झाला आहे. अशावेळी अनेकांना कोणते समभाग लॉन्ग टर्म साठी घ्यावेत असा प्रश्न पडतो. बाजार यापेक्षा वर जाईल का?? यापेक्षा खाली आला तर किती खाली येईल? आणि अशावेळी कोणते शेअर्स घ्यावे हे आपल्याला निश्चितपणे समजत नाही यासाठी तज्ञ मंडळींनी विश्लेषण करून पुढील एका वर्षात कोणते shears चांगली पातळी गाठू शकतात ते सांगितले आहे आपल्या माहितीसाठी असे दहा समभाग मी आपल्याला या लेखांमध्ये सांगत आहे.  ॲक्सिस बँक- हा शेअर आता आहे त्यापेक्षा साधारणपणे पुढील वर्षभरात अकराशे रुपये पर्यंत जाऊ शकतो .या बँकेचे आर्थिक परिस्थिती चांगली आहे वसुली आणि  अद्ययावतीकरण चांगले असल्यामुळे यांचा…

आय पी एल आणि म्युच्युअल फंड !!

गेल्या महिन्यात आयपीएलचा हंगाम पूर्ण झाला. आता काही महिन्यात वर्ल्डकप सुरू होईल. आयपीएल मध्ये आपण बलाढ्य चेन्नई टीमच्या विरुद्ध तसेच मुंबई टीमच्या विरुद्ध गुजरात टीमने कसा परफॉर्मन्स केला ते क्षणोक्षणी दाद देत पाहिले. प्रत्यक्षात चांगले खेळाडू असण्यापेक्षा टीम परफॉर्मन्स हाच महत्त्वाचा मुद्दा एकंदरीत सगळ्या खेळांमध्ये दिसतो. एखादा सूर्यकुमार यादव किंवा वॉशिंग्टन सुंदर आणि गुमराह यासारख्या खेळाडू हातात घेऊन आपण जग्गजेते होऊ शकत नाही. पण उत्कृष्ट कॅप्टन योग्य निर्णय आणि योग्य खेळी याचा सुंदर संगम झाल्यास कुठलाही वर्ल्ड कप आपल्या हाताबाहेर जाऊ शकत नाही हेही निश्चित झाले आहे. म्युच्युअल फंड च्या बाबतीत सुद्धा तसेच असते. एखादा इन्फोसिस किंवा टाटा मोटर किंवा…

मेडिक्लेम म्हणजे काय ?

मेडिक्लेम म्हणजे काय ? अ) अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा ब) अपघाता मुळे २४ तासा पेक्षा अधिक कालावधी साठी किंवा क) २४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी अगोदरच इन्शुरन्स कंपनी कडून दावा/ क्लेम मंजूर करून एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात मध्ये भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनी कडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्र इन्शुरन्स कंपनीत दाखल करून परत मिळवता येतो. मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात. १)खोलीभडे २)नर्सिंग चार्जेस ३)डॉक्टर तपासणी चार्जेस ४)डॉक्टर फेरी चार्जेस ५)आय सी यु चार्जेस ६)एन आय सी यु चार्जेस ७)गोळ्या, औषधे , ड्रगस , सलाइन खर्च अर्थात ८)सोनोग्राफी खर्च ९)एम आर आय खर्च…

डिजिटल सोने घ्या !!

जगभरामध्ये गुंतवणुकीचे विविध प्रकार आहेत आणि त्या प्रकारांमध्ये सर्वात प्राचीन, सर्वात विश्वासार्ह आणि तात्काळ रोख उपलब्ध करून देणारा प्रकार म्हणजेच सोन्यामधील गुंतवणूक. या गुंतवणूक प्रकाराविषयी सर्वात आधी जागृत असणारी संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे. अनादी काळापासून आपण धनसंचय कुठल्या प्रकारामध्ये करायचा तर तो केवळ सोन्यामध्ये अशी आपली परंपरा राहिली आहे. या परंपरेमुळेच जगभरामध्ये सर्वाधिक सोनं कुणाकडे असेल तर ते भारतीयांकडे आहे. यामुळेच दरवर्षी भारतामध्ये जवळपास ८०० ते ९०० टन सोन्याची खरेदी केली जाते ज्याची किंमत तीन लाख कोटी रुपये आहे. सोने देशात आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर ते तिजोरी बंद केले जाते. त्याचा व्यापाराच्या दृष्टीने उपयोग होत नाही. एवढी मोठी रक्कम…

निवृत्ती नियोजन का असावे?

निवृत्ती नियोजन का असावे? भारतातील ६०% पेक्षा जास्त लोकांचे रिटायरमेंट प्लानिंग ( निवृत्ती नियोजन ) नसतेच! आपण यापैकी असाल तर लगेचच आमच्याशी संपर्क साधा. कारण.... आज ज्यांचा मासिक खर्च रु. ३५०००/- च्या आसपास आहे त्यांना ३० वर्षानंतर तेवढ्या सुखसोईमध्ये राहायचे असेल तर होणाऱ्या महागाईपायी किमान रु. ९००००/-प्रतिमहा लागू शकतात.औषधोपचारासाठी खर्च जो सध्या साधारण: २००० रु. आहे , असे गृहीत धरले तर १० वर्षाने तो पाचपट होऊ शकतो. यासाठीच आपल्याला आपले निवृत्ती नियोजन आजपासूनच करणे आवश्यक झाले आहे. म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना आपल्यला करबचत व निवृत्ती नियोजन हे दोन्ही फायदे देऊ शकतात. त्यासाठी आपण आमच्या कार्यालयाला भेट देऊन समक्ष चर्चा करा…

वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी

विवाह हा नवदाम्पत्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असतो. आपापल्या कुवतीप्रमाणे खर्च करून हा सोहळा जास्तीत जास्त कसा चांगला करता येईल यासाठी संबंधित प्रयत्नशील असतात. आजकाल ‘डेस्टिनेशन वेडिंग’सुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. बऱ्याचदा प्रत्यक्ष विवाह ठरल्यानंतर पुढील ४-६ महिन्यांत विवाह समारंभ ठरविला जातो व त्यानुसार विवाह स्थळ, मंगल कार्यालय, हॉटेल किंवा एखादे विशिष्ट स्थळ (डेस्टिनेशन) ठरविले जाते. विवाह समारंभात प्रामुख्याने सोने, कपडे, मंगल कार्यालय/ हॉटेल, जेवणावळी, मेहंदी, व्हिडीओ शूटिंग यावर खर्च होणार असतो व याचे पूर्वनियोजन आणि तयारी केली जाते. अर्थात त्यासाठी आवश्यक ते पेमेंट करावे लागते. काही वेळा नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटनेमुळे हा समारंभ पुढे ढकलावा लागतो किंवा रद्द…

*लिक्वीलोन- नवीन गुंतवणूक सुविधा *

*लिक्वीलोन- नवीन गुंतवणूक सुविधा * सध्या बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणे ही बाब सोपी झाली आहे.त्याबरोबरच *P2P लेंडिंग * हा प्लॅटफ़ॉर्मसुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने कर्जाची रक्कम उपलब्ध करून देत आहे. आणि असाच एक सुंदर प्लॅटफ़ॉर्म प्रूडंट कनेक्ट या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर कंपनीने तयार केला आहे. त्यात ५ दिवस ते ६ महिने किंवा वर्षभरासाठी आपण गुंतवणूक केल्यास आपल्याला 8% ते 9.15 % प्रतिवर्ष या दराने परतावा मिळतो. आणि *हा परतावा Assured आहे * यातील सर्व व्यवहार हे online असून परतावा सुद्धा redemation ऑर्डर केल्यावर ४८ तासामध्ये आपल्या बँक खात्यात जमा होतो. आणि या सर्व प्रकियेला “लिक्वीलोन” असे संबोधले जाते. गुंतवणुकीच्या या…

‘लिक्विड फ़ंड’ (लिफ) कसे काम करतात ?

'लिक्विड फ़ंड' (लिफ) कसे काम करतात हे जाणून घेण्याअगोदर लिफ म्हणजे काय, हे समजून घेऊया !! बऱ्याचदा अशी काही परिस्थिती उद्भवते की अचानक काही थोड्या काळासाठी आपल्या बचत खात्यात काही रक्कम येऊन पडते, जिची आपल्याला लगेचच काही गरज नसते, उदा: मनी बॅक पॉलिसीचे पैसे, शेअर्समधील चढ उताराचा फायदा घेण्यासाठी विकलेल्या शेअर्सचे पैसे किंवा ऑफिस ने दिलेला प्रोत्साहन भत्ता वगैरे. हे पैसे जर नुसतेच बचत खात्यात राहिले तर 3 ते 4 टक्के व्याज मिळेल. त्यापेक्षा कुठेतरी थोड्या काळासाठी गुंतवले, तर? कारण, अजून सहा महिन्यांनी तुम्हाला नवी बाईक घ्यायची आहे, तेव्हा ते पैसे लागतील, किंवा अजून कशाकरिता… एक गोष्ट आपल्या लक्षात आली…

End of content

No more pages to load