जोखीम कमी फायदा कमी
प्रथमच गुंतवणूक करणारे अनेक गुंतवणूकदार त्यांचा पैसा बँक मुदतठेवींतून काढून इक्विटींमध्ये गुंतवतात. बाजारात करेक्शन आल्यास संपूर्ण इक्विटी पोर्टफोलिओच्या तुलनेत तुमच्या पोर्टफोलिओत डेट व इक्विटी यांचे मिश्रण असेल तर कमी प्रमाणात चढउतार अनुभवास येतात. संपूर्ण इक्विटी फंडांपेक्षा अशा फंडांचा अनुभव चांगला असतो. डायनॅमिक इक्विटी फंड हे बाजाराची हालचाल पाहून इक्विटी व डेटमधील अॅसेट अॅलोकेशन बदलत राहतात. भांडवल बाजार पडलेला असतो तेव्हा डायनॅमिक इक्विटी फंड इक्विटीमधील गुंतवणूक वाढवतात, बाजार वर चढलेला असतो तेव्हा ही गुंतवणूक ते घटवतात. फंड हाउसची मत्तावाटपाची जी पद्धत असेल त्यानुसार त्यांच्या पोर्टफोलिओमधला इक्विटीचा भाग बदलता राहतो. अशी स्वतःची पद्धत विकसित करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक डायनॅमिक इक्विटी फंडाला असते. काही…