कुटुंबाचा अर्थसंकल्प
कुटुंबाचा अर्थसंकल्प कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजेच आपल्या सर्व खर्चांचे योग्य नियोजन होय. नोकरी किंवा व्यवसायातील उत्पन्नाचे प्रभावीपणे नियोजन. कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्त्वाच्या घटकांमध्ये विभागू शकतो – १) दैनंदिन गरजांसाठीचा खर्च २) अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठीचा खर्च ३) दैनंदिन खर्चासाठी बचत ४) दीर्घकालीन योजनांसाठी गुंतवणूक. आपले अल्पकालीन किंवा दीर्घकालीन ध्येय असे असावे की ते आपल्या आर्थिक क्षमतेच्या आवाक्यात असतील व त्याचा आपल्या नियोजनावर कधीच ताण पडणार नाही. (नवीन वाहन, नवीन घर किंवा मोठे घर, मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न तसेच निवृत्तिनियोजन वगैरे आदी झाले अल्पकालीन किंवा दीर्घकालीन खर्च.) स्वप्नपूर्तीसाठी गुंतवणूक करताना आपण भविष्यात होणाऱ्या खर्चाचा बारकाईने अभ्यास करून नियोजन करावयास हवे. उदाहरणार्थ…