“इमर्जन्सी फंड’ किती असावा?
पूर्वीच्या काळी एकदा नोकरीला सुरवात केली, की बहुतेक लोक 30 ते 35 वर्षांनी त्याच संस्थेतून किंवा कंपनीतून निवृत्त होत असत. परंतु, आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. मोठ्या पदावर असलेले व चांगला पगार घेत असलेले वरिष्ठ कर्मचारीसुद्धा अकस्मात नोकरी सुटली म्हणून घरी बसलेले दिसतात. "जेट एअरवेज'च्या कर्मचाऱ्यांचे सध्याचे उदाहरण ताजे आहे. चांगली नोकरी अकस्मात जाणे, हे खूप क्लेशदायक असते. अशा कर्मचाऱ्यांनी कर्जे घेतली असतील तर त्यांची परिस्थिती आणखीनच कठीण होते. नोकरी गेल्यामुळे "मेडिकल इन्शुरन्स' संपुष्टात येतो आणि अशा वेळी जर घरातील कोणाला मोठे आजारपण आले तर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती होते. या पार्श्वभूमीवर इमर्जन्सी फंडाचे महत्त्व अधोरेखित होते. आणीबाणीची परिस्थिती…