सिबिल स्कोअर खूप महत्त्वाचा —
कर्ज घेताना आपण अनेकदा ऐकतो, की सिबिल स्कोअर खूप महत्त्वाचा आहे. जास्त स्कोअर असायला पाहिजे. पण हे बरेचदा माहीत नसते, की सिबिल स्कोअर म्हणजे काय? तो कसा मोजला जातो? चांगला स्कोअर किती? तो कशामुळे वाढतो आणि कशामुळे तो कमी होतो? चला तर मग जाणून घेऊया... 1. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) म्हणजे सिबिल. या एजन्सीला रिझर्व्ह बॅंकेनेने "क्रेडिट रेटिंग' द्यायला अधिकृत केले आहे. प्रत्येकाच्या 'क्रेडिट हिस्टरी'वर सिबिल स्कोअर ठरतो. हा स्कोअर 3 अंकी असतो आणि तो 300 ते 900 दरम्यान मोजला जातो. सिबिल स्कोअर चांगला की वाईट माहिती 300 - 549 अत्यंत वाईट - कुठलीही बॅंक तुम्हाला कर्ज किंवा…