आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund
म्युच्युअल फंड उद्योगातील मल्टी असेट फंडाची श्रेणी बघितली तर यात आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund लोकप्रिय फंड ठरत आहे. या फंडाचे व्यवस्थापन एस. नरेन करत असून फंडाची कामगिरी या श्रेणीत सरस ठरली आहे. सर्वसाधारणपणे मल्टी अॅसेट फंड हे १० ते ८० टक्के समभागसंलग्न गुंतवणूक करतात. रोख्यांमध्ये १० ते ३५ टक्के आणि गोल्ड ईटीएफमध्ये १० ते ३५ टक्के गुंतवणूक करतात. तर REITs आणि InvITS मध्ये शून्य ते १० टक्के गुंतवणूक प्रमाण असते. या श्रेणीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी असेट फंडाने दमदार कामगिरी केली आहे. एक वर्षाचा विचार करता या फंडाने ६१.६ टक्के परतावा दिला तर या श्रेणीचा सरासरी ४२.४४ टक्के परतावा होता.…