मुलांना द्या आर्थिक धडे!
तुमच्या मुलाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्याचे अनेक मार्ग आहेत. यातील काही गोष्टींसह तुम्ही सुरुवात करू शकता: ● बचतीचे महत्त्व: मुलांना त्यांच्या पॉकेटमनीतून बचत करण्यास प्रोत्साहन द्या. गरज आणि इच्छा यातील फरक त्यांना स्पष्ट करून सांगा. उदाहरणार्थ, आईला वाढदिवसानिमित्त घेण्याची भेटवस्तू किंवा डिसनीलॅण्डमधील खरेदी यातील फरक सांगा. यामुळे दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य होतील. दिलेल्या कालावधीत विशिष्ट रकमेची बचत केल्याबद्दल तुम्ही तुमच्या मुलाला बक्षीस देऊ शकता. असे उद्दिष्ट निश्चित करून दिल्यामुळे मुले सर्व प्रकारच्या पैशाकडे समान आदराने बघतील. मुलांच्या सर्व खर्चाची नोंद ठेवणारे रंगीत शीट, लहान मुलांसाठी पासबुक या काही मार्गांनी तुम्ही त्यांना केलेल्या खर्चाची नोंद ठेवण्याची सवय लावू शकता. ● …