गृहविमा

आपल्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी आपण अविरत कष्ट करतो. ते सुरक्षित राखण्यासाठी संरक्षक दरवाजा, कॅमेरे व उत्तम दर्जाचे कुलूप अशी सुरक्षा साधने वापरतो. सर्वसाधारणपणे आपल्या आयुष्यातला प्रदीर्घ काळ घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यातच घालवतो. मात्र, गृहविम्यासारखे अतिशय महत्त्वाचे सुरक्षा साधन आपण विसरतो. भारतात एकूणच विमा उतरवण्याचे प्रमाण अतिशय अत्यल्प म्हणजेच एक टक्क्याहूनही कमी आहे. त्यामुळे गृहविमा उतरवण्याचे प्रमाण त्याहूनही कमी आहे. घराचा मालक अथवा त्याचा वापर करत असणारी कोणतीही व्यक्ती गृहविमा उतरवू शकते. भाड्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीदेखील गृहविमा घेऊ शकतात. घराची मालकी एखाद्या संस्थेकडे असल्यास अशी संस्थादेखील विमा उतरवू शकते. गृहविम्यामध्ये आग व त्या संबंधित घटना, दरोडा, चोरी, दहशतवादी हल्ला आदी…

आर्थिक नियोजन — उद्योगांसाठी

आर्थिक आराखडा आणि त्याच्या पायऱ्या १ व्यवसाय आणि वैयक्तिक आर्थिक ध्येयं वेगळी ठेवायला हवीत. जेवढा व्यवसाय वाढवणं गरजेचं आहे, तेवढंच गरजेचं आहे तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवणं. जर कुटुंबासाठी हवे तेव्हा आणि लागतील तेवढे पैसे नाही पुरवता आले तर त्या व्यवसायातून नक्की काय साध्य होणार, हे नेहमीच लक्षात असू द्यावे. २ प्रत्येक वेळी गरज लागली की आपण घरचे पैसे उचलतो आणि उद्योगामध्ये घालतो; परंतु असे करताना कुठे तरी आपली वैयक्तिक आर्थिक परिस्थिती कमकुवत होतेय का- याबाबत जागरूक राहाणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणायला जरी सोपं वाटलं तरी पाळायला हे फार कठीण आहे. कारण उद्योगामध्ये बुडालेल्यांना दुसरं काही दिसत नसतं. शिवाय एक…

आर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन??

आर्थिक संकटात आणिबाणीच्या परिस्थितीत घरातील सोन्याचा उपयोग होऊ शकतो. बाजारात अनेक संस्था तसेच बँका आहेत ज्या गोल्ड लोनची सुविधा देतात. सरकारी आणि खासगी बँका देखील अशा प्रकारचे कर्ज देतात. यात ज्वेलरी, सोन्याची नाणी आदी गोष्टी बँकेकडे तारण ठेवून तुम्ही पैसे घेऊ शकता. नंतर व्याजासह पैसे परत केल्यानंतर तुम्ही सोन परत घेऊ शकता. जर तुम्ही एक वर्षाच्या आत पैसे परत करणार असाल तर गोल्ड लोन हा सर्वात चांगला पर्याय आहे. सर्वसाधारणपणे गोल्ड लोनचा कालावधी २ वर्षाचा असतो. हा कालावधी तुम्ही वाढवू देखील शकता. पण जर तुम्ही कर्ज म्हणून घेतलेले पैसे तीन ते पाच वर्ष कालावधीपर्यंत परत करण्याचा विचार करत असाल तर…

गोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी

गोल्ड बॉंड - आधुनिक सोने खरेदी भारतीय लोकांना कोणत्याही शुभप्रसंगी सोने खरेदी करण्याची पारंपारिक सवय आहे. पण प्रत्यक्ष खरेदी केलेल्या सोन्यामधील गुंतवणूक सोने विकून गरजेच्या वेळी सोडवून घेणे थोडेसे गुंतागुंतीचे असते किवा अशा अत्यंत गरजेच्या वेळी “सोनेतारण कर्ज घेणे “ आवश्यक ठरते. नेमकी हीच गरज ओळखून भारत सरकारने “Sovereign Gold bonds” ही योजना सर्वसामान्यांसाठी सुरु केली आहे. यामध्ये कोणतीही व्यक्ती १ ग्रॅम पासून ४ किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो व हे सोने प्रत्यक्ष हातात न देता ते आपल्या demat खात्यात जमा होते. आणि ५ वर्षानंतर केव्हाही आपण त्यावेळी जो बाजारभाव असेल त्याप्रमाणे त्याची विक्री करू शकतो आणि कोणतीही वजावट न…

आरोग्य पॉलिसी निवडताय?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विम्याची गरज का? दीर्घकालीन लॉकडाउनचा पर्याय व्यावहारिकदृष्ट्या योग्य नसल्याने दैनंदिन उपजीविकेसाठी आपल्या सर्वांनाच घराबहेर घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र, संसर्गजन्य आजार असलेल्या कोरोना महामारीवर अजून कोणत्याही प्रकारची लस किंवा औषध विकसित झालेले नाही. परिणामी कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी मास्क, हातांची स्वछता, शाररिक अंतर राखणे हेच यावरील प्रमुख उपाय आहेत. मात्र, एकंदरीत कोरोनाचे स्वरूप पाहता संसर्गाचे प्रमाण वाढत आहे अशावेळी संपूर्ण कुटुंबाच्या संरक्षणासाठी आरोग्य विमा असणे महत्त्वाचे झाले आहे.   विद्यमान पॉलिसीमध्ये कोविड १९ आजाराचा समावेश आहे का? कोविड १९ हा श्वसनाशी संबंधित आजार असल्याने आणि विमा नियामक संस्था आयआरडीएने सर्व आरोग्य विमा पॉलिसींमध्ये कोविड १९ चा समावेश…

रोकडसुलभता

रोकडसुलभता म्हणजे आपल्या गुंतवणूक जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपल्या गुंतवणूक विकून गुंतवणुकीचे रोकड (चलनात) रूपांतर करण्यास किती किंमत मोजावी लागेल आणि त्यासाठी किती वेळ लागेल यावर त्या मालमत्तांची रोकडसुलभता ठरते. अशा रूपांतरणाची प्रक्रिया मालमत्तेपेक्षा भिन्न असते. उदाहरण म्हणून माझी तीन वर्षांची मुदत ठेव मला १२ व्या महिन्यांत रोकडसुलभ करायची असेल तर मला मिळणाऱ्या व्याजापेक्षा कमी व्याज १२ महिन्यांसाठी मिळेल. ही झाली माझी मालमत्ता रोकडसुलभ करण्यास द्यावी लागणारी किंमत. आणि बँकेत रक्कम माझ्या खात्यात जमा होण्यास अर्धा तास लागेल. पण हीच रक्कम भविष्यनिर्वाह निधीतून काढायची असेल तर प्रक्रिया वेळखाऊ , कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महिन्यानंतर पैसे खात्यात जमा होतील. पण या…

पोर्टफोलिओमध्ये विविधता हवी–

एखाद्या विशिष्ट क्षेत्रात वृद्धी होताना दिसत असली किंवा मार्केटमध्ये मोठी वाढ होत असली तरीही काही क्षेत्रांमधील ट्रेंड घसरता असतो. सध्या स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. मागील सलग दोन महिन्यात त्यांचे मूल्य जवळपास एक चतुर्थांशांनी कमी झाले आहे. तर दुसरीकडे फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये याच स्थितीत मोठी वाढ झाली आहे. एफएमसीजी सेक्टरसाठीही ही गोष्ट लागू आहे. त्यामुळे एक  गुंतवणूकदार या नात्याने मार्केट कोसळत असतानाही कमीत कमी नुकसान झेलण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओत विविधता हवीच. पोर्टफोलिओ बांधणी हे काही रॉकेट सायन्स नाही. यासाठी योग्य घटक कोणते आहेत, त्याबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. विविध उद्योग, व्हर्टिकल्स आणि रेग्युलेटरी फ्रेमवर्क, कंपनीचे व्यवस्थापन (प्रमुख भागधारकांसह),…

‘यूटीआय व्हॅल्यू अपॉर्च्युनिटीज फंड’

‘यूटीआय व्हॅल्यू अपॉर्च्युनिटीज फंड’ बाजारात साधारणपणे संपूर्ण व्याप्ती असलेल्या गुंतवणुकीच्या संधी शोधणारा फंड आहे. आपल्या अंगभूत मूल्यापेक्षा कमी किंमत असणाऱ्या शेअर्सचा शोध घेऊन, ते शेअर कोणत्याही ‘मार्केट कॅप’मध्ये असले तरी, त्यांच्यात गुंतवणूक करण्याची संधी हा फंड घेत असतो. हे खरे तर ‘मल्टी कॅप’ फंडाचे लक्षण आहे. आपल्या समभागधारकांसाठी कंपनीने विशिष्ट काळात उभारलेल्या रोखीची वर्तमान किंमत म्हणजे त्या शेअरचे अंगभूत मूल्य होय. कमी मूल्यमापन झालेल्या दोन प्रकारच्या कंपन्या बाजारात साधारणपणे आढळून येतात. एखाद्या कंपनीची स्पर्धात्मक शाश्वती बाजाराला कमी वाटली आणि / किंवा त्या कंपनीची प्रगती होण्यास फार काळ लागणार असल्यास संबंधित कंपनीच्या शेअरचे मूल्य कमी गणण्यात येते. अशा कंपन्या बाजाराच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या प्रवाहानुसार चाललेल्या…

उत्तम शेअर घेऊन ठेवा !

कोरोना विषाणूचा जागतिक विळखा वाढत असतानाही जागतिक शेअर बाजार वाढत आहेत. युरोपीयन, अमेरिकन व आशियाई बाजार वाढत आहेत. अमेरिकन ’नॅसडॅक’ हा निर्देशांक त्याच्या सर्वोच्च पातळीपासून केवळ ५.५ टक्के दूर आहे. मात्र, आपला राष्ट्रीय निर्देशांक अर्थात ‘निफ्टी’ त्याच्या सर्वोच्च पातळीपासून २५.५८ टक्के दूर आहे. जागतिक बाजार वाढताहेत, याचा अर्थ जागतिक पातळीवरील कोरोना संकट संपले असे नाही. जगाचा विचार करता या रोगाच्या बाधीतांची संख्या ४० लाखांजवळ असून तो अजूनही ६०-६५ अंशाच्या रेषेत वाढत आहे. तसेच मृतांचा (२६९०६८) आकडाही त्याच रेषेत वाढत आहे. असे असले तरी प्रतिदिन बाधित होणार्‍यांची संख्या ५ एप्रिल (८६,४८४) नंतर आज (९४,१५८) पर्यंत आडव्या रेषेत आहेत. प्रतिदिन मृत होणार्‍यांची संख्याही…

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’

सुकन्या समृद्धी योजना ही सरकारची स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे. मुलींसाठी ही योजना सर्वात लोकप्रिय असून सरकारने 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' या अंतर्गत ही योजना सुरू केली होती. या योजनेनुसार पालक आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळू शकते. सध्याच्या नियमानुसार जर मुलगी लहान असताना यात गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास तर १५ वर्ष गुंतवणूक करता येते. सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या ८.४ टक्के इतका व्याज दर दिला जात आहे. या योजनेत गुंतवणूक करताना जो व्याज दर असतो तोच पूर्ण कालावधी संपेपर्यंत मिळतो. त्यामुळे तुम्ही जर आता (एप्रिल ते जून २०२०)…

End of content

No more pages to load