घडामोडी – धनलाभ

एन एफ ओ — technology संबंधी पहाच —
सन 2000 च्या आसपास मी माझे पहिले डिमॅट अकाउंट सुरू केले आणि त्यावेळी मला अकाऊंट ओपन करताना.साधारण 69 ठिकाणी सह्या कराव्या लागल्या होत्या.

त्यानंतर शेअरखानचे डिमॅट अकाउंट ओपन केले त्यावेळी साधारणपणे अशाच 38 ते 40 ठिकाणी सह्या कराव्या लागल्या! आता मी जेव्हा शेअरखान ब्रांच ऑफिस सुरू केले त्यावेळी सुद्धा प्रत्यक्ष फॉर्म भरून खाते ओपन करणे हे कटकटीचे काम असायचे.

कोविड काळापासून अकाउंट ओपनिंग प्रोसेस खूप सोपी झाली आणि आता ऑनलाइन अकाउंट्स ओपन करणे एका चुटकीचे काम झाले.ही तंत्रज्ञानातील प्रगती पाहता आपण यानंतरही अनेक मोठे टप्पे गाठणार आहोत हे निश्चित आहे.

सध्या टेक्नॉलॉजी च्या सहकार्याने आपण ओला उबेरने कोठेही क्षणार्धात पोचू शकतो.सुट्या पैशांची चिंता जीपेसारख्या ॲपमुळे जवळ नाहीशी झाली आहे . बँकेचे सर्व व्यवहार आपण टेबलवरच करतो. रेल्वे बुकिंग , रेल्वेची खानपान सेवा कॅन्सलेशन,फ्लाइट बुकिंग यासारख्या गोष्टी आपण मोबाईलवर करतो. ईकॉमर्समुळे जगभरात प्राप्त होणारी कोणतीही गोष्ट कशीही शोधून आपण आपल्या घरी मागवू शकतो.हे पाहता टेक्नोलॉजीही आपल्या घरापर्यंतच नाही तर अगदी किचनपर्यंतसुद्धा पोहोचली आहे.

अशा स्थितीत गुंतवणुकीतसुद्धा विविधता आणण्याच्या दृष्टीने नव्याने दोन एनएफओ बाजारामध्ये गेल्या आठवड्यापासून उपलब्ध झाले आहेत! पहिला फंड आहे एडेलवाईस टेक्नोलॉजी फंड आणि दुसरा आहे कोटकचा टेक्नोलॉजी फंड!!

या दोन्ही फंडातील गुंतवणूक आपल्याला भविष्यामध्ये चांगला परतावा देऊ शकेल असे निश्चित आहे!!

हे दोन्ही फंड जरी थीम बेस फंड असले असले तरी यातील गुंतवणूक ही अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजी संबंधित कंपन्यामध्ये असणार आहे.आणि यामध्ये अनेक प्रकारची विविधताही असणार आहे.

ई कॉमर्स, कंझ्युमर ,बॅंकिंग , एंटरटेनमेंट , ऑटोमोबाइल , शॉपिंग मॉल्स , इलेक्ट्रिक व्हिकल्स इंटरनेट व ओटीटी प्लॅटफॉर्म , रेडियो , टेलिव्हिजन सिनेमा मेकॅनायझेशन इन फॅक्ट्रीज , रोबोटिक्स आणि एआय स्वरूपाच्या कंपन्यामध्ये या फंडामधील गुंतवणूक असणार आहे आणि त्यामुळे आपण कल्पना करू त्यापेक्षासुद्धा जास्त परतावा या कंपन्यातील गुंतवणुकीमुळे आपल्याला मिळू शकणार आहे ,

फक्त त्यासाठी किती कालावधी लागेल हे मात्र आपल्याला सांगता येणार नाही म्हणून लाँगटर्म होरायझन असलेल्या सर्वांनी गुंतवणूक करून आपल्या पोर्टफोलियोमध्ये विविधता आणि त्याबरोबरच चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत असे आमचे मत आहे. ज्यांना आत्ता लॅम्प्सम गुंतविणे धोकादायक वाटते त्यांनी यामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्णे हिताचे आहे.

यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास आपण केव्हाही आमच्याशी संपर्क साधू शकताआणि यातील खरेदी महिनाअखेरीपर्यंत सुरू असल्याने आपण आपल्या सल्लागाराशी चर्चा करूनसुद्धा यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे जास्त हितावह होणार आहे.

धन्यवाद !!

प्रदीप जोशी

एसएमई मंचावरील सर्वात मोठा ‘आयपीओ’
उल्लू डिजिटल या समाजमाध्यम कंपनीने, प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) निधी उभारण्यासाठी मुंबई शेअर बाजाराच्या सूक्ष्म, लघु व मध्यम अर्थात ‘बीएसई एसएमई’ मंचाकडे मसुदा प्रस्ताव दाखल केला आहे. मसुदा प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसार, या माध्यमातून कंपनी सुमारे ६२.६ लाख समभागांची विक्री करणार असून, त्यायोगे १३५ ते १५० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा तिचा मानस आहे.

या ‘आयपीओ’ला मंजुरी मिळाल्यास, ही आतापर्यंतची कोणाही एसएमई कंपनीकडून या माध्यमातून होणारी सर्वात मोठी भांडवल उभारणी ठरेल. याआधी स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंटने ‘आयपीओ’च्या माध्यमातून एसएमई मंचावर १०५ कोटी रुपयांची आजवरची सर्वाधिक निधी उभारणी केली आहे. त्यापाठोपाठ आशका हॉस्पिटल्स १०१.६ कोटी रुपये, बावेजा स्टुडिओ ९७ कोटी रुपये, खजांची ज्वेलर्स ९७ कोटी रुपये आणि वाईज ट्रॅव्हल इंडिया ९४.७ कोटी रुपये या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उभारला आहे.

उल्लू डिजिटल प्रा. लिमिटेडकडून ओटीटी मंच ‘उल्लू ॲप’ कार्यरत असून, कंपनी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि सामग्रीचे वितरण, प्रदर्शन, जाहिरात, विपणन आणि वितरण यामध्ये गुंतलेली आहे, ज्यात वेबमालिका, लघुपट आणि इतर काही कार्यक्रमांचादेखील समावेश आहे.

विभू अग्रवाल आणि त्यांची पत्नी मेघा अग्रवाल यांच्या मालकीची ही कंपनी असून झी एंटरटेनमेंट आणि शेमारू एंटरटेनमेंट यांसारख्या भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांसोबत तिची स्पर्धा आहे. कंपनी नवीन सामग्रीच्या निर्मितीसाठी ३० कोटी रुपये, आंतरराष्ट्रीय शोच्या खरेदीसाठी २० कोटी रुपये आणि तंत्रज्ञानातील गुंतवणुकीसाठी १५ कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे. तसेच कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपयांची रक्कम वापरली जाईल आणि उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल.

डिझास्टर रिकव्हरी सेशन म्हणजे नेमकं काय?
२ मार्च म्हणजे नव्या महिन्याचा पहिला शनिवार असूनही शेअर बाजार सुरू राहणार असून बाजारात स्पेशल ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाणार आहे. सर्वसाधारणपणे शनिवार आणि रविवारच्या दिवशी राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व मुंबई शेअर बाजार (BSE) मध्ये कामकाज बंद असते मात्र, यंदा तसं होणार नाही.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) द्वारे २ मार्च (शनिवार), २०२४ रोजी एक विशेष लाइव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाईल ज्यामध्ये, इंट्राडे डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटवर स्विच केले जाईल. कोणतीही अनपेक्षित घटना घडल्यास एक्सचेंजेस मजबूत करण्यासाठी विशेष सत्र आयोजित केले जात आहे, ज्यामुळे त्यांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. बुधवारी देशातील दोन्ही प्रमुख स्टॉक एक्सचेंजने परिपत्रक जारी करून २ मार्च रोजी होणाऱ्या या सत्रात इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये ट्रेडिंग होणार असल्याची माहिती दिली.

एक चूक पडेल महागात!
वाढत्या बँकिंगच्या काळात आज प्रत्येक व्यक्तीचे किमान एक तरी बँक खाते असते. तसे काही लोक विशेषतः नोकरदार लोक एकापेक्षा जास्त बँक खाती वापरतात आणि ते देखील एकाधिक बँकांमध्ये असते. परंतु लक्षात घ्या की तुमचे कोणत्याही बँकेत बचत खाते (सेव्हिंग अकाउंट) असले तरी चालू ठेवणे महत्त्वाचे असते आणि तुम्ही या खात्यांमधून पैशांची देवाण-घेवाण करत राहिल्यासच तुमचे बँक खाते चालू राहील. जर एखादा बँक ग्राहक बचत खाते किंवा चालू खाते एका वर्षासाठी वापरत नसल्यास अकाउंट निष्क्रिय होते. तर दोन वर्षे खाते निष्क्रिय असल्यास डॉरमॅन्ट किंवा इनऑपरेटिव्ह खात्यात टाकले जाते. असे झाल्यास ग्राहक त्याचे खाते वापरू शकत नाहीत.

अशा परिस्थितीत तुमचे बचत किंवा चालू खाते डॉरमॅन्ट किंवा इनऑपरेटिव्ह होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर काही महत्त्वाचे व्यवहार सुरू ठेवणे अनिवार्य आहे. तुमच्या बँक खात्यातून व्यवहार सुरू राहिल्यास खाते बंद होण्याची शक्यता राहणार नाही. या व्यवहारांमध्ये जावक बिले, धनादेशाचे (चेक) व्यवहार, रोख ठेवी आणि रोख पैसे काढणे अशा व्यवहारांचा समावेश आहे.

खाते निष्क्रिय झाल्यास काय

तुमच्या एका चुकीमुळे खाते निष्क्रिय झाल्यास ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ निष्क्रिय बँक खात्यातून चेकबुक जारी करता येत नाही तर खात्यातून पैसे काढताना किंवा ठेवींवरही काही निर्बंध घातले जाऊ शकतात. तसेच यासह काही विशिष्ट सेवाच घेऊ शकत नाही.

SIP द्वारे गुंतवणुकीचा उच्चांक
इक्विटी म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे. जानेवारी महिन्यात या फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी एकूण २१ हजार ७८० कोटी रुपये गुंतवले आहेत. ही रक्कम गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक मासिक गुंतवणूक ठरली आहे. यंदा जानेवारी महिन्यात नियोजनबद्ध गुंतवणुकीचा (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी) उच्चांक गाठला गेला आहे. ही माहिती म्युच्युअल फंडाची मध्यवर्ती संघटना असलेल्या अॅम्फीने गुरुवारी दिली.

डिसेंबर २०२३मध्ये एसआयपीच्या माध्यमातून १७ हजार ६१० कोटी रुपये गुंतवले गेले होते. जानेवारी महिन्यात १८ हजार ८३८ कोटी रुपये एसआयपीद्वारे गुंतवले गेले. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये डिसेंबर २०२३मध्ये १६ हजार ९९७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. जानेवारीत त्यात २८ टक्के वाढ झाली आणि २१ हजार ७८० कोटी रुपयांची गुंतवणूक या फंडांमध्ये झाली.

इक्विटी फंडांतील स्मॉल कॅप फंडांनी सलग चौथ्या महिन्यात तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित केली आहे. अन्य फंडांच्या तुलनेत लार्ज कॅप फंडांमध्ये १,२८७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक अन्य फंडातील गुंतवणउकीच्या तुलनेत कमी दिसत असली तरी या गटातील फंडांत मागील १९ महिन्यांतील ही सर्वाधिक गुंतवणूक ठरली आहे. लार्ज कॅप फंडांतून डिसेंबर २०२३मध्ये २८१ कोटी रुपये काढून घेतले गेले होते.

संपूर्ण म्युच्युअल फंड क्षेत्राचा विचार करता, डिसेंबर २०२३मध्ये या क्षेत्रातील विविध फंडांत मिळून ४०,६८५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. जानेवारीत ही गुंतवणूक वाढून १.२३ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. डेट फंडांमध्ये जानेवारीत ७६,४८३ कोटी, हायब्रिड फंडांत २०,६३७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

नव्याने येणारे आय पी ओ पहा
Entero Healthcare Solutions Limited

या कंपनीचा  IPO 09 फेब्रुवारी 2024 ते 13 फेब्रुवारी   2024 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size  11 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 1258 आहे .

Jana Small  Finance bank Ltd

या कंपनीचा  IPO 07 फेब्रुवारी 2024 ते 09 फेब्रुवारी   2024 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size  36 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 414/ आहे.

Rashi Peripherals Ltd

या कंपनीचा  IPO 07 फेब्रुवारी 2024 ते 09 फेब्रुवारी   2024 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size  48 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 311/-आहे .

आय पी ओंची खरेदी आपण online UPI Id वापरुन जिपे किंवा फोनपेद्वारे करू शकता तसेच शेअरखान ऑफिस सावंतवाडीला भेट देऊन अधिक माहिती घेऊन करू शकता.

त्यासाठी मात्र आपले DEMAT खाते असणे आवश्यक आहे.

प्रदीप जोशी – ९४२२४२१०३

टर्म इन्श्युरन्स — वाचा काय घ्यावी काळजी
टर्म प्लॅन घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आजच्या लेखात आम्ही टर्म प्लॅनच्या फायद्यांबद्दल नाही तर ज्या कारणांमुळे क्लेम मिळण्यात अडचण येऊ शकते त्याबद्दल सांगणार आहोत. टर्म इन्शुरन्सबद्दल सर्वप्रथम लक्षात घ्या की प्रत्येक प्रकारच्या डेथ कव्हरेजसाठी संरक्षण प्रदान करत नाही.

१. टर्म प्लॅन घेणाऱ्या व्यक्तीला डेथ कव्हरचाही लाभ मिळतो, परंतु पॉलिसीधारकाचा नशेच्या प्रभावाखाली वाहन चालवताना मृत्यू झाला तर टर्म इंश्युरन्सचा लाभ मिळणार नाही.

२. पॉलिसीधारकाला ड्रग्ज आणि अल्कोहोलचे व्यसन लागले व त्यामुळे मृत्यू झाला, तर विमा कंपनी टर्म प्लॅनच्या दाव्याची रक्कम देण्यास नकार देऊ शकते.

३. पॉलिसीधारक साहसी खेळांचा शौकीन असल्यास आणि कोणत्याही धोकादायक खेळादरम्यान मृत्यू झाल्यास टर्म योजनेवरील दावा नाकारला जाईल. त्याच वेळी कार-बाईक रेसिंग, स्काय डायव्हिंग, स्कूबा डायव्हिंग, पॅरा ग्लायडिंग आणि बंजी जंपिंगसारख्या धोकादायक क्रियाकलापांमध्ये मृत्यू झाल्यास टर्म इंश्युरन्सचे पैसे अडकू शकतात.

४. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा खून झाला आणि पोलिस तपासादरम्यान नॉमिनीवर आरोप असेल, तर नॉमिनीला क्लीन चिट मिळेपर्यंत कंपनी टर्म प्लॅनचा दावा थांबवला जाईल.

५. टर्म प्लॅन घेताना पॉलिसीधारकाने कोणत्याही गंभीर आजाराची माहिती लपवली आणि त्याच आजारामुळे मृत्यू झाल्यास विमा कंपनी दावा नाकारू शकते. याशिवाय, टर्म प्लॅनमध्ये एचआयव्ही/एड्समुळे मृत्यू झाल्यास संरक्षण देण्याची तरतूद नाही.

६. टर्म प्लॅन अंतर्गत भूकंप, वादळ, भूस्खलन इत्यादीसारख्या कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपन्या नॉमिनीला दाव्याची रक्कम देत नाहीत.

७. विमा नियामक IRDAI च्या नियमांनुसार, पॉलिसीधारक कोणत्याही गुन्हेगारी कृतीत सामील असेल आणि नंतर अशा गुन्हेगारी कृती दरम्यान हत्या झाली तरी देखील दाव्याची रक्कम नाकारली जाईल.

८. महिला पॉलिसीधारकाचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत दाव्याची रक्कम अडकू शकते.

घ्यावयाची काळजी

टर्म इंश्युरन्स योजना खरेदी करताना त्यातील अटी काळजीपूर्वक वाचा. मृत्यूची कारणे पॉलिसीमध्ये समाविष्ट केली जातील हे तपासा कारण सर्व प्रकारचे मृत्यू टर्म इंश्युरन्समध्ये समाविष्ट नसतात. म्हणून टर्म प्लॅन अंतर्गत समाविष्ट कारणांमुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तरच क्लेमचे पैसे मिळतील.

नव्याने उपलब्ध होणारे एन एफ ओ पहा
NFO संबधी माहिती

म्युच्युअल फंड हाऊसतर्फे जेव्हा एखादी नवी योजना बाजारात आणली जाते त्याला न्यू फंड ऑफर (NFO) असे म्हणतात.

आपण जेव्हा असा NFO खरेदी करतो तेव्हा त्याची युनिट्स आपल्यास रु.१० प्रति युनिट या दरानेच प्राप्त होतात.

सध्या भारतीय अर्थव्यवस्था यापूर्वी कधी नव्हती तेवढी सक्षम आहे आणि अशावेळी आपण एखाद्या नव्या mutual fund स्कीममध्ये पैसे गुंतविल्यास त्याचा परतावा अत्यंत चांगला मिळू शकतो अशी स्थिती आहे. सध्या बाजारात चार नवे NFO उपलब्ध होत असून त्या संबधी थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे

1)    Bajaj finserv large and Mid cap fund (बजाज पिंन्सर्व्ह लार्ज अँड मिड कॅप फंड ) –  नावाप्रमाणे हा लार्ज कॅप सेगमेंटमध्ये गुंतवणूक करणारा NFO असून ६ ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये खरेदी करता येईल. हा ओपन एंडेड प्रकारचा असल्याने यातील गुंतवणूक आपण केव्हाही काढू शकणार आहोत.

1)    SBI Emerging Opportunities Fund  हा उर्जा सेक्टरशी संबधित गुंतवणूक करणारा NFO असून ६ ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये  खरेदी करता येईल. हा ओपन एंडेड प्रकारचा असल्याने यातील गुंतवणूक आपण केव्हाही काढू शकणार आहोत.

2)    HSBC Multi Asset Allocation Fund   हा नावाप्रमाणे वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये गुंतवणूक करणारा NFO असून  ८ ते २२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी खरेदी करता येईल. हा ओपन एंडेड प्रकारचा असल्याने यातील गुंतवणूक आपण केव्हाही काढू शकू .

3)     Kotak Technology fund हा NFO १२ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी खरेदी करता येईल.

4)     Edelweiss Technology fund हा NFO १४ ते २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये  खरेदी करता येईल.

या सर्व NFO मध्ये गुंतवणूक केल्यास ४ ते ५ वर्षाच्या कालावधीत आपल्याला भरीव परतावा मिळू शकेल  असे वाटते.

यासंबधी अधिक माहिती हवी असल्यास खालील नंबर वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

प्रदीप जोशी -9422429103.

प्रधानमंत्री सूर्योदय
सरकारी सेवेत कार्यरत नसलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ मिळेल. तसेच लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे म्हणजे गरीब वर्ग, मध्यमवर्गीय आणि गरजू या योजनेसाठी पात्र ठरतील. अर्जदाराकडे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वीज बिल, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो किंवा रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी https://solarrooftop.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर होम पेजवर Apply पर्याय निवडा. वापरकर्त्याने राज्य आणि जिल्ह्यानुसार सर्व माहिती द्यावी प्रविष्ट करावी आणि वीजबिल क्रमांक दिल्यानंतर वीज खर्चाची माहिती व मूलभूत माहिती, सोलर पॅनलचा तपशील प्रविष्ट करावा.

मोबाइलच्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात कपात
मोबाइल फोनच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी अंतरिम अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला घेतला. हे आयात शुल्क आता १५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्यात आले आहे. या निर्णयाचा फायदा ॲपल आणि शाओमी कंपन्यांना भारतात मोबाइल हँडसेटची निर्मिती करण्यासाठी होईल आणि त्यांच्याकडून ग्राहकांना किमतीत ३ ते ५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणे अपेक्षित आहे.

मोबाइलची बॅटरी, पाठीमागील आवरण, इतर तांत्रिक प्लास्टिक आणि धातूचे सुटे भाग, जीएसएम अँटेना आणि इतर सुट्या भागांवरील आयात शुल्कात केंद्राकडून कपात करण्यात आली आहे. या सुट्या भागांवरील आयात शुल्क १० टक्क्यांवर आणण्यात आल्याचे परिपत्रक केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी काढले. या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कही आता शून्यावर आणण्यात आल्याचेही परित्रकात म्हटले आहे.