संपादकीय – धनलाभ

फिनटेकमधले हे बदल आणि आर्थिक गणित
पर्सनल फायनान्समधील  AI, ML आणि ब्लॉकचेन यांच्यामुळे झालेल्या तांत्रिक क्रांतीने वैयक्तिक वित्त क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात झाली आहे. या नवकल्पना आर्थिक सेवांना अधिक समावेशक, कार्यक्षम आणि वैयक्तिकृत बनवण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे भविष्यात पैशाचे व्यवस्थापित करणे ही बाब आपल्या दैनंदिन जीवनात अखंडपणे केली जाईल.

Decentralized Finance(DeFi)

यामुळे वापरकर्त्यांना मध्यस्थांशिवाय कर्ज घेणे, कर्ज देणे, व्यापार करणे आणि गुंतवणूक करणे शक्य होते. हा ट्रेंड वित्ताचे लोकशाहीकरण करत आहे.

एम्बेडेड फायनान्स आर्थिक सेवांना गैर-आर्थिक ॲप्स आणि वेबसाइट्समध्ये समाकलित करते. हा ट्रेंड विविध उद्योगांमधील रेषा अस्पष्ट करत आहे, ज्यामुळे कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना थेट आर्थिक उत्पादने ऑफर करता येतात. पेमेंट प्रक्रिया आणि कर्ज देण्यापासून ते विमा आणि गुंतवणूक सेवांपर्यंत, एम्बेडेड फायनान्स आर्थिक व्यवहार अधिक सोयीस्कर आणि वापरकर्ता-अनुकूल करत आहे.

पर्सनल फायनान्समधील ऑटोमेशन रोबो-सल्लागार आणि स्वयंचलित गुंतवणूक व्यवस्थापनाच्या पलीकडे जात आहे. नवीनतम घडामोडींमध्ये एआय-चालित साधने समाविष्ट आहेत जी बचत, कर्ज परतफेड आणि बजेटिंग निर्णय स्वयंचलित करतात, कमीतकमी वापरकर्त्याच्या हस्तक्षेपासह आर्थिक आरोग्यास अनुकूल करतात. ही साधने रिअल-टाइम निर्णय घेण्यासाठी वापरकर्त्याच्या डेटाचे विश्लेषण करतात, व्यक्तींना त्यांची आर्थिक उद्दिष्टे अधिक कार्यक्षमतेने साध्य करण्यात मदत करतात.

फिन्टेकच्या जलद उत्क्रांतीमुळे वैयक्तिक वित्त क्षेत्रामध्ये गहन परिवर्तन होत आहे. DeFi पासून ग्रीन फायनान्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंग पर्यंत, हे उदयोन्मुख ट्रेंड आर्थिक सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम आणि वापरकर्त्यांच्या मूल्यांशी संरेखित करण्याचे वचन देतात. पुढील लेखात आपण फिनटेकच्या जागतिक आर्थिक समावेशावरील प्रभावाचा अभ्यास करू, पारंपारिक बँकिंग प्रणाली आणि सेवा नसलेल्या समुदायांमधील अंतर तंत्रज्ञान कसे भरून काढत आहे याचे परीक्षण करूयात. वर्तनात्मक अर्थशास्त्राच्या क्षेत्रात अधिक ज्ञानवर्धक दृष्टीकोन आणि व्यावहारिक गोष्टी समजून घेण्याच्या या प्रवासात सामील व्हा.आणि यासाठी आमच्या संपर्कात कायम राहण्यसाठी प्रयत्नशील राहा !! धन्यवाद !!!

प्रदीप जोशी 9422429103

आज व्हॅलेंटाईन डे!!
आज व्हॅलेंटाईन डे!!

आज आपल्या वॅलेन्टाईनला आपण नव्या स्वरूपाच्या गिफ्ट देऊन अर्थसाक्षर करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकायला शिकवा ! अशा वेगळ्या स्वरूपाच्या चार गिफ्ट्स मी आज सांगणार आहे !

१ ) आपल्या वॅलेंटाईनच्या नावे डिमॅट खाते उघडून त्याचा पासवर्ड द्यावा की ज्यामुळे equity इन्व्हेस्टमेंट संबंधी माहिती घ्यायला सुरवात होऊ शकेल !

२ ) बरेच लोक आज दागिने खरेदी करून गिफ्ट देतात पण मी आपल्याला आज *गोल्ड बॉण्ड खरेदी करून गिफ्ट द्यावी असे सुचवत आहे ! ते सांभाळणे सोपे असून विक्री करून पैसे उपलब्ध करणे सोपे असते !

३) आपले कुटुंबीय हेही आपले एका तऱ्हेने वॅलेन्टाईनच असतात , त्यांना वेळ देऊन त्यांच्याशी गुंतवणूक आणि होणारे फायदे यासंबंधी चर्चा करण्यासाठी वेळ दयावा

४ )आपण पदवीधर होईपर्यंत एखाद्या शाखेचे शिक्षण घेतलेले असते पण इतर अनेक गोष्टींमध्ये ज्ञान मिळवणे हे सुद्धा कोरोना कालावधीतील अनुभव पाहता अत्यावश्यक झाले आहे !असे लहान कोर्सेस शिकण्यासाठी प्रवेश घेऊन त्याची गिफ्ट सुद्धा आपण देऊ शकता आणि कधी ना कधी ह्या हॉबीचे रूपांतर एखाद्या व्यवसायात होऊन आपल्यालाच आर्थिक हातभार लागू शकतो !

चला तर ठरवा आणि निर्णय घ्या !

यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधा !

प्रदीप जोशी

9422429103

गोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी
गोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी

भारतीय लोकांना कोणत्याही शुभप्रसंगी सोने खरेदी करण्याची पारंपारिक सवय आहे. पण प्रत्यक्ष खरेदी केलेल्या सोन्यामधील गुंतवणूक सोने विकून गरजेच्या वेळी सोडवून घेणे थोडेसे गुंतागुंतीचे असते किवा अशा अत्यंत गरजेच्या वेळी “सोनेतारण कर्ज घेणे” आवश्यक ठरते.

नेमकी हीच गरज ओळखून भारत सरकारने “Sovereign Gold bonds” ही योजना सर्वसामान्यांसाठी सुरु केली आहे.

यामध्ये कोणतीही व्यक्ती १ ग्रॅम पासून ४ किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो व हे सोने प्रत्यक्ष हातात न देता ते आपल्या demat खात्यात जमा होते. आणि ५ वर्षानंतर केव्हाही आपण त्यावेळी जो बाजारभाव असेल त्याप्रमाणे त्याची विक्री करू शकतो आणि कोणतीही वजावट न होता त्यावेळच्या सोन्याच्या किमंतीनुसार पूर्ण रक्कम एका दिवसात आपल्या बँक खात्यात जमा होऊ शकते.यामध्ये कोणतीही फसवणूक आणि चोरी होण्याचा धोका नाही तसेच आपल्याला वाटले तरच आपण ही विक्री करावी अन्यथा नाही केली तरी चालते.

यावर्षी अशा पद्धतीत सोने खरेदीची संधी 12 फेब्रुवारी ते 16  फेब्रुवारी या कालावधीत उपलब्ध होणार आहे !!

फक्त यासाठी आपले DEMAT खाते असणे आवश्यक आहे असे demat खाते उघडण्यासाठी आपल्याला काहीही खर्च येत नाही.

या खरेदी कालावधीत R.B.I. तर्फे जो भाव ठरविला जातो त्याच भावाने खरेदी करण्यात येते. आत्ता प्रस्तावित असलेल्या या सोने खरेदीचा भाव रु 6263 प्रति ग्रॅम असा आहे ! भाववाढ झाली तरी त्याचा परिणाम आपल्या खरेदीवर लादला जात नाही.

मात्र अशा खरेदीसाठी आवश्यक ती रक्कम आपल्या demat खात्यात आपल्याला एक दिवस आधी जमा करावी लागते किंवा नेट बँकिंगने अदा करण्याची तयारी ठेवावी लागते.

माझे   या सदरच्या वाचकांना, या महिन्यात  उपलब्ध होणारे हे sovereign Gold Bonds खरेदी करण्याचे आवाहन असून यासंबधी अधिक माहिती हवी असल्यास माझ्याशी संपर्क साधण्यात यावा, ही विनंती.

प्रदीप जोशी

(९४२२४२९१०३)

गुंतवणूक सुरक्षित ठेवणारी व्यवस्था
आजकाल अधूनमधून एखादी बँक दिवाळखोरीत गेली किंवा तिचा रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला असी बातमी पेपर तसेच टीव्हीवर वरचेवर दिसून येते. यात बऱ्याचदा लहान सहकारी बँकांचा समावेश असतो तथापि यात पीएमसी किंवा रुपी बँकेसारखी मोठी सहकारी बँक सुद्धा दिसून येते. नुकतेच रिझर्व्ह बँकेने पेटीम पेमेंट बँकेवरही २९ फेब्रुवारी २०२४ नंतर काही निर्बंध लागू केले आहेत. भविष्यात सुद्धा एखाद्या सहकारी बँक, लघुवित्त बँक, पेमेंट बँक तसेच खाजगी बँकेवरही असी वेळ येऊ शकते. जेव्हा एखाद्या बँकेवर अशी वेळ येते तेव्हा सगळ्यात मोठा परिणाम प्रामुख्याने सबंधित बँकेच्या ठेवीदारांवर होत असतो. यामुळे एकूणच बँक ठेवीदारांचा बँकांवरील विश्वास डळमळीत होते आणि बँक व्यवसाय हा प्रामुख्याने ठेवीदारांच्या विश्वासावरच चालत असल्याने बँकिंग व्यवसायावरील विश्वासार्हता टिकून राहावी व बँकिंग व्यवसायास स्थैर्य रहावे या उद्देशाने केंद्र सरकारने १५ जुलै १९७८ रोजी आरबीआय अंतर्गत डीआयसीजीसी अॅक्ट १९६१ नुसार डीआयसीजीसीची (डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट ग्यारंटी कॉर्पोरेशन) स्थापना केली.

डीआयसीजीसी अॅक्ट १९६१ नुसार डीआयसीजीसीचे अधिकृत भाग भांडवल रु. ५० कोटी इतके असून ते आरबीआयनेच देऊ केले आहे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर डीआयसीजीसीचे पदसिद्ध चेअरमन असतात. याशिवाय संचालक मंडळात आरबीआयने नियुक्त केलेला एक अधिकारी (जो सामान्यत: आरबीआयच्या कार्यकारी संचालकांपैकी एक असतो , एक केंद्र सरकारने नियुक्त केलेला अधिकारी असतो तर अन्य पाच संचालक आरबीआयच्या सल्ल्याने केंद्र सरकारने नियुक्त केलेले असतात. या केंद्र सरकार नियुक्त पाच संचालकांपैकी तीन जण बँकिंग, इंश्युरन्स, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ तर अन्य दोन संचालक सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. डीआयसीजीसीचे कार्यालय mumbai येथे असून दैनंदिन कारभार कार्यकारी संचालकामार्फत चालविला जातो.

डीआयसीजीसीचे संरक्षण राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, भारतात कार्यरत असलेल्या विदेशी बँका, ग्रामीण बँका , लघुवित्त बँका, पेमेंट बँका तसेच सहकारी बँका यांच्याकडे असणाऱ्या ठेवींना दिले जाते. ठेवीमध्ये बचत खाते , चालू खाते, मुदत ठेव खाते व पुनरावर्ती ठेव खाते या खात्यांमधील ठेवींचा समावेश असतो. पूर्वी हे संरक्षण एका व्यक्तीच्या एकाच बँकेत असणाऱ्या वरील सर्व प्रकारच्या एकत्रित ठेवींच्या रु.एक लाख इतके होते मात्र आता ४ फेब्रुवारी २०२० पासून ही मर्यादा रु. पाच लाख इतकी केली आहे. ( ही कमाल मर्यादा व्याजासहित आहे). या वाढीव रु.पाच लाखाच्या मर्यादेमुळे बँकांतील सुमारे ९८% ठेव खाती डीआयसीजीसी कव्हर मिळण्यास पात्र झाली आहेत.

हे इन्शुरन्स कव्हर मिळविण्यासाठी संबंधित बँक डीआयसीजीसीकडे नोंदणी करावी लागते व दरवर्षी डीआयसीजीसीस प्रीमियम द्यावा लागतो. प्रीमियमचा रेट (टक्केवारी ) आरबीआय ठरवत असते मात्र डीआयसीजीसी अॅक्ट १९६१ नुसार हा रेट ०.१५% पेक्षा जास्त असता कामा नये. सध्या १ एप्रिल २०२० पासून हा रेट ०.१२% इतका आहे म्हणजे रु.१०० च्या ठेवीवर १२ पैसे इतका आहे. प्रीमियमची आकारणी दर सहामाहीच्या अखेरच्या सबंधित बँकेच्या एकूण ठेवींच्या रकमेवर केली जाते. व प्रीमियमचे पेमेंट पुढील दोन महिन्याच्या आत सबंधित बँकेस करावे लागते . ( ३१ मार्च अखेरीच्या ठेवीवरील प्रीमियम ३१ मे च्या आत तर से३० सप्टेबरअखेरीच्या ठेवीवरील प्रीमियम ३० नोव्हेंबरच्या आत भरावा लागतो.)जर प्रीमियम वेळेत भरला गेला नाही तर अर्ध वर्ष्याच्या सुरवातीपासून ते प्रीमियम भरे पर्यंतच्या तारखे पर्यंत बँक रेट +८% इतक्या दराने प्रीमियम रकमेवर व्याज द्यावे लागते. तसेच दरम्यानच्या काळात ठेवींवर विमा सौरक्षण मिळत नाही , आवश्यक तो प्रीमियम वेळेत भरणे ही बँकेची जबादारी असून त्याची वसूल ठेवीदारांकडून केली जात नाही हा खर्च बँकेस सोसावा लागतो. सलग तीन सहामहींचा प्रीमियम भरला गेला नाहीतर डीआयसीजीसी कडून सबंधित बँकेची नोंदणी (रजिस्ट्रेशन) रद्द केली जाते. तसेच जर आरबीआयने सबंधित बँकेस नवीन ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली, परवाना (लायसेन्स) रद्द केला किंवा बँक दिवाळखोरीत गेली तर डीआयसीजीसी नोंदणी रद्द केली जाते.

एखादी बँक दिवाळखोरीत गेल्यास ठेवींवरील विमा रक्कम प्राप्त कारण्यासाठी खातेदारांना आता फार ताटकळावे लागणार नाही. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC Bill 2021) अंतर्गत ठेवींवरील पाच लाखापर्यंतची विमा भरपाई ९० दिवसांत खातेदाराला मिळणार आहे. कोणतीही बँक दिवाळखोरीत निघाल्यास किंवा त्याचा परवाना रद्द झाल्यास, रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केल्यास ठेवीदारांना ९० दिवसांत त्यांच्या ठेवीवरील विमा भरपाई मिळणार आहे.एखादी बँक अशा संकटात सापडली तर सुरुवातीच्या ४५ दिवसांत खातेदार, ठेवीदारांची माहिती गोळा केली जाईल त्यानंतर ज्यांचे विमा दावे असतील ते डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनला सोपवले जातील. पुढील ४५ दिवसांत ठेवीदारांना त्यांची रक्कम सुपूर्द केली जाईल.

खालील प्रकारच्या बँक ठेवींवर डीआयसीजीसी कवचउपलब्ध होत नाही

-केंद्र व राज्य सरकारच्या बँकांमधील ठेवी

-विदेशी सरकारी ठेवी

-बँकांच्या आपापसातल्या ठेवी (इंटर बँक डीपॉझीट)

-बँकांना भारता बाहेर मिळालेल्या ठेवी

-राज्य भूविकास बँकेच्या स्टेट कोऑपरेटीव्ह बँकेतील ठेवी

एखादी बँक दिवाळखोरीत गेल्यावर डीआयसीजीसीस ठेवीदारांना क्लेम देणे क्रमप्राप्त असते त्यासाठी लिक्विडेटर नेमला जाऊन त्याच्या मार्फत डीआयसीजीसीकडे क्लेम दाखल करावा लागतो व मिळालेल्या क्लेमचे वितरण सबंधित ठेवीदारास लिक्विडेटर क्लेम रकमेनुसार मार्फत केले जाते. जर एखादी बँक दुसऱ्या बँकेत मर्ज (विलीन) किंवा अमालगमेट(एकत्रिकरण )झाली तर अशा वेळी विलीनीकरण /एकत्रिकरण होताना नवीन बँकेकडून जी रक्कम ठेवीदारास मिळेल ती वजा जाऊन ठेवी दाराची व्याजासह असलेली ठेव किंवा पाच लाख या दोन्हीतील कमी असणारी रक्कम क्लेम पोटी दिली जाते. डीआयसीजीसीमुळे ठेवीदारांना खूप मोठ्याप्रमाणावर दिलासा मिळाला आहे व यामुळे बँकाच्या ठेव वाढ होऊन पर्यायाने बँक व्यवसाय वाढीस निश्चितच चालना मिळेल.

या उत्पन्नावर लागत नाही एक रुपयाचाही कर
नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच पगारदार लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची लगबग सुरू करतात. दरवर्षी आयकर रिटर्न भरण्यापूर्वी नियोक्ता किंवा तुमच्या कंपनीला गुंतवणुकीचा पुरावा द्यावा लागतो. नोकरदार लोकांसाठी हा काळ विशेषतः महत्वाचा असून आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी गुंतवणूक करून त्याचा पुरावा सादर करणे खूप महत्वाचे असते. देशभरात वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नावर कर भरावा लागतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का की असे काही उत्पन्न आहेत ज्यावर कर आकारला जात नाही.

शेतीतून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असून तुम्ही एखाद्या कंपनीत भागीदार असल्यास नफा वाटणी म्हणून मिळणारी रक्कम करमुक्त आहे कारण, कंपनीने त्यावर आधीच कर भरला असतो. त्याच वेळी, तुमच्या काही गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर लागू होत नाही.

बचत खात्यावरील व्याज

सेव्हिंग अकाउंटमधील रकमेवर दर तिमाहीला व्याज जाते. आयकर कायद्यानुसार व्याजाची रक्कम तुमचे उत्पन्न मानले जाते, ज्यावर आयकर कायद्याच्या कलम 80TTA नुसार आयकर सूट मिळू शकते. बचत खात्यावरील वार्षिक १०,००० रुपयांपेक्षा जास्त व्याजावर तुम्हाला आयकर भरावा लागेल.

ग्रॅच्युटी

पगारदार लोकांना ग्रॅच्युइटीचे नियम समजणे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही संस्थेत सलग पाच वर्षे काम केल्यास तुम्हाला ग्रॅच्युटीचा लाभ दिला जातो. ग्रॅच्युटीची संपूर्ण रक्कम कर सवलतीच्या कक्षेत येते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युटी करमुक्त आहे तर खाजगी कर्मचार्‍यांसाठी १० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युटी करमुक्त आहे.

PPF गुंतवणूक

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा पीपीएफमध्ये वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करण्याची संधी असून तुमची गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारे पैसे पूर्णपणे करमुक्त आहेत.

EPF गुंतवणूक

ईपीएफवरील कराचे नियम वेगळे आहेत मात्र, प्रत्यक्ष पाहिल्यास पाच वर्षे सलग गुंतवणूक केल्यानंतर काढलेल्या रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही

स्वेच्छानिवृत्ती

सरकारी कर्मचाऱ्याने निवृत्तीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास ही रक्कम ५ लाख रुपयांपर्यंत करमुक्त असते. मात्र ही सुविधा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे.

HUF कडून मिळालेली रक्कम

आयकर कायद्याच्या कलम १०(२) अन्वये अविभक्त हिंदू कुटुंबाकडून (HUF) किंवा वारशाने मिळालेली कोणतीही रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.

पालकांकडून मिळालेले पैसे/दागिने/मालमत्ता

पालक किंवा कुटुंबाकडून वारशाने मिळालेली मालमत्ता, दागिने किंवा कॅशवर शून्य कर भरावा लागतो. मृत्युपत्रात मिळालेल्या मालमत्ता आणि रोख रकमेवरही कर भरावा लागत नाही. मात्र करदात्याला पालकांकडून मिळालेली रक्कम गुंतवून कमाई करायची असेल तर मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागेल.

भेटवस्तूही करमुक्त

वास्तविक भेटवस्तूंवर कर भरावा लागतो. आयकर कायदा १९६१ च्या कलम ५६(२)(x) अंतर्गत करदात्यांना भेटवस्तूंवर कर भरावा लागतो. पण, लग्न आणि मित्र व नातेवाईकांनी दिलेल्या भेटवस्तूंवर कोणताही कर नाही मात्र भेटवस्तू ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी. तथापि, आयकर नियमांनुसार, काही लोकांकडून लग्नानिमित्त मिळालेल्या भेटवस्तूंची किंमत ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असली तरीही ते आयकराच्या कक्षेत येत नाहीत. खालीलप्रमाणे त्याची यादी तपासा…

१. पती-पत्नीकडून मिळालेली भेटवस्तू

२. भाऊ किंवा बहिणीकडून मिळालेली भेट

३. पालकांच्या भाऊ किंवा बहिणीकडून मिळालेल्या भेटवस्तू

४. वारसा किंवा मृत्युपत्राद्वारे मिळालेली मालमत्ता

५. कलम १० (२३सी) अंतर्गत कोणताही निधी/फाउंडेशन/विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्था, रुग्णालय किंवा इतर वैद्यकीय संस्था, ट्रस्ट किंवा संस्थेकडून मिळालेली भेटवस्तू

५. कलम 12A किंवा 12AA अंतर्गत नोंदणीकृत कोणत्याही धर्मादाय किंवा धार्मिक ट्रस्टकडून मिळालेली भेट करमुक्त आहे.

रिट्स संबंधित थोडीफार माहिती.
रिट्स संबंधित थोडीफार माहिती.

प्रत्येकाला जमीन जुमला, घर अशा स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे यामध्ये बऱ्यापैकी स्वारस्य असते.परंतु प्रत्येक शहरातील वेगवेगळे नियम ,प्रत्येक राज्यातील वेगवेगळे नियम, आणि त्यातील गुंतागुंत पाहता प्रत्येकाला रियल एस्टेटमध्ये स्वतःहून गुंतवणूक करणे सोपे वाटत नाही.तसेच यामध्ये लिक्विडिटी खूप कमी असते , व विक्री करताना सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते.पण या क्षेत्रामध्ये होत असलेल्या वाढीचा फायदा आपल्याला घेण्यासाठी रिट्स ही एक अत्यंत चांगली सुविधा आपल्याला उपलब्ध झाली आहे.

रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजे REITS .

हा ट्रस्ट लिस्टेड कंपन्यामध्ये येत असून यातील गुंतवणूक ही पूर्णतः लिक्विड राहते.आपण जसा शेअरचा व्यवहार करतो तशा पद्धतीने या शेअर्सचा सुद्धा व्यवहार करणे शक्य असते.आपण रिट्सचा एक शेअर घेऊ शकतो किंवा कितीही शेअर्स घेऊ शकतो !! त्यामुळे यातील गुंतवणूक म्हटली तर अमर्यादित पद्धतीची होऊ शकते.

रिट्स ही एक संस्था असून लोकांकडून पैसे गोळा करून रेसिडेन्शियल किंवा कमर्शिअल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करते.रिट्स कार्यालय , व्यावसायिक संकुले, हॉटेल्स, मॉल, औद्योगिक जागा किंवा हॉस्पिटल्स विकत घेतात आणि त्या मोठ्या आणि नावाजलेल्या कंपन्यांना भाडेतत्त्वावर पुरवून त्यातून आपला आर्थिक फायदा करून घेतात.तसेच अशा मोठ्या व्यावसायिक संकुलांची देखभालसुद्धा या कंपन्याकडून केली जाते.ह्या रिट्सचे आपण शेअर घेतले किंवा युनिट घेतली की त्यामध्ये आपण गुंतवणूक केली असा त्याचा अर्थ होतो;आणि यामध्ये आपल्याला शेअरचा भाव वाढला की जसा फायदा होतो तशाच स्वरूपाचा फायदा हे शेअर्स विकल्यावर होऊ शकतो.

भारतामध्ये याची सुरुवात 2019 साली झाली आहे . सध्या चार कंपन्या रिट्सद्वारे लिस्टेड असून त्यामधील शेअर्सचे व्यवहार आपण करू शकतो. यातून मिळणारा परतावा हा साधारणपणे साडेआठ ते दहा टक्के या रेंजमध्ये असतो.या व्यवहारामधून आपल्याला तोटा होण्याची शक्यता खूप कमी असते. कारण रिट्सच्या जागा या तज्ज्ञ मंडळींमार्फत खरेदी किंवा विक्री केल्या जातात ! आणि सर्व व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवली जाते !!

यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास आपण आमच्याकार्यालयाशी केव्हाही संपर्क साधू शकाल.मात्र यातून.मिळणारा परतावा हा कन्सिस्टंट असतो हे मात्र निश्चित!!

धन्यवाद.

प्रदीप जोशी

नवीन वर्षासाठी आर्थिक संकल्प
नवीन वर्षासाठी चांगले आर्थिक संकल्प करतांना मूलभूत आर्थिक बाबी समजणे हिताचे आहेत. याच बाबी पुढे तुमचे आर्थिक संकल्प बनतात !!

आपल्या पहिल्या पगारापासून गुंतवणूक सुरू करा.

आपल्या जीवनाची आर्थिक उद्दीष्टे ओळखा. त्यांना अल्प मुदतीच्या, मध्यम-मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या श्रेणीमध्ये विभाजित करा. ध्येय-आधारित गुंतवणूक सिद्धांतानुसार(Goal Based Investment Theory) गुंतवणूक करा.

ध्येयाविरहित गुंतवणूक करू नका. केलेली प्रत्येक गुंतवणूक आपल्या आर्थिक ध्येयाशी संबंधित करा.

मूलभूत गरजा आणि इच्छिक गरजा (needs and wants) या खर्चाच्या पॅटर्न नुसार आपल्या खर्चाचे विश्लेषण करण्यास प्रारंभ करा. आपण WANTS वर जास्त खर्च करीत आहात की नाही ते तपासा.

मासिक जमाखर्च आणि ताळेबंद मांडा तसेच मासिक बचत दर निश्चित करा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करा. उत्पन्न-खर्च = बचत करण्याऐवजी मिळकत-बचत = खर्च फॉर्म्युलाचे अनुसरण करा.

विमा आणि गुंतवणूकीची कधीही सरमिसळ करू नका. जीवन विम्याच्या गरजेसाठी विमा कंपन्यांच्या पारंपारिक विमा पॉलिसी खरेदी करणे थांबवा.

गुंतवणूकीचे पर्याय म्हणून फक्त आवर्ती ठेवी (RD) आणि मुदत ठेवींना (FD ) चिटकून राहू नका.

शेअर्स बाजाराला सट्टा बाजार समजू नका. आवश्यक ते ज्ञान संपादन करून शेअर्स बाजाराला गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून विचारात घ्या.

गुंतवणूक म्हणून फक्त रिअल इस्टेट आणि सोने खरेदी थांबवा. ही मालमत्ता तरल नाही.

आपण नसल्यास आपल्या प्रियजनांच्या जीवनशैलीचे रक्षण करण्यासाठी टर्म विमा योजना खरेदी करा.

मुलांच्या शैक्षणिक उद्देशाने त्यांच्या नावावर विमा पॉलिसी खरेदी करू नका.

चांगल्या परताव्यासाठी आणि तरलतेसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा.

नियोक्ताद्वारे प्रदान केलेल्या आरोग्य योजनेशिवाय (employer health insurance) स्वत: साठी आणि पालकांसह कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी पुरेसे आरोग्य कवच खरेदी करा.

आरोग्याचा विमा प्रीमियम पैशाचा अपव्यय मानू नका. जेव्हा तुम्ही निरोगी, तंदुरुस्त आणि ठीक असाल तेव्हा आरोग्य योजना घ्या.

करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर घर विकत घेण्यापासून आणि स्वत: ला प्रचंड ईएमआयमध्ये वचनबद्ध करण्यास टाळा.

तरुण असतांना प्रथम द्रव आर्थिक मालमत्तेचा (liquid financial asset) थोडा आधार बनवा आणि त्यानंतर भौतिक मालमत्तेचा (physical asset) विचार करण्यास सुरवात करा.

उत्पन्नाच्या अनेक स्त्रोतांचा विचार करा. केवळ उत्पन्नाच्या एका प्रवाहावर अवलंबून राहू नका. आपण पासिव्ह उत्पन्न कसे मिळवू शकता याबद्दल विचार करा. आपल्यासाठी पैसे कमावण्यासाठी पैश्याला कामाला लावा.

मित्र, सहकारी किंवा नातेवाईकांनी सूचित केलेल्या कोणत्याही कंपन्यांच्या समभागात विचार न करता गुंतवणूक करू

मार्केटमधून अवास्तव परतावा मिळण्याची अपेक्षा करू नका . जेव्हा अपेक्षेनुसार परतावा मिळत नसेलतर गुंतवणूक तोट्यात असतानाही कोणताही अभ्यास वा विश्लेषण न करता ताबडतोब त्या गुंतवणुकीतून बाहेर पडू नका.

अल्प मुदतीत चढ उतारांना घाबरून दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला थांबवू नका.

गुंतवणूकीतून जास्तीत जास्त परतावा मिळवण्याच्या अट्टाहासापेक्षा पडत्या बाजारात जास्त नुकसान होऊ नये म्हणून नकारात्मक जोखीम व्यवस्थापन (downside risk management) करण्यावर जोर देणे फार महत्वाचे आहे. .

जेव्हा शेयर बाजार कोसळतो तेव्हा म्युच्युअल फंडाच्या सुरु असलेल्या एसआयपी थांबवून आणि बाजार पुन्हा चढता झाल्यावर परत एसआयपी सुरू करणे दीर्घ मुदतीच्या संपत्ती निर्माणासाठी घातक आहे . अश्या मानसिकतेला कळपांची मानसिकता (herd mentality) म्हणतात

इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये मागील एक किंवा दोन वर्षांचीच कामगिरी पाहता गुंतवणूककरणे जोखिमेचे असते . खरे तर मागील ५ ते १० वर्षांच्या परताव्याचे विश्लेषण गरजे चे असते .

गुंतवणुकीसाठी निवडलेले इक्विटी म्युच्युअल फंड हे आपल्या जीवनाच्या आर्थिक ध्येय तसेच त्या ध्येयाच्या कालावधी नुसार योग्य आहे की नाही हे तपासून पाहणे अत्यंत महत्वाचे आहे

दीर्घ मुदतीच्या आर्थिक लक्ष्यांसाठी इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीचा दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे

सेवानिवृत्तीच्या नियोजनापेक्षा सुट्टी मध्ये सहली ला जाणे , इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तू खरेदी करणे तसेच मुलांचे शिक्षण आणि लग्नाच्या नियोजनाला अधिक महत्त्व देणे योग्य नाही.

यासारख्या अल्पावधीतील आणि मध्यम अवधितील उद्दीष्टे आणि दुय्यम लक्ष्यांना सेवानिवृत्तीच्या नियोजनापेक्षा अधिक महत्त्व दिल्यास आर्थिक नियोजन फसू शकते.

अतिरिक्त परताव्याच्या लोभापायी कोणत्याही फसव्या (प्रॉक्सी) योजनेत गुंतवणूक करणे प्रकर्षाने टाळा.

गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक उत्पादनांची (financial products) संपूर्ण वैशिष्ट्ये, गुणविशेष आणि साधक आणि बाधक गोष्टींचे विश्लेषण करणे अत्यावश्यक आहे.

कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःच्या जोखमीचे विश्लेषण (risk profiling) करून घ्या. विशिष्ट लक्ष्यासाठी मालमत्ता वाटपानुसार (asset allocation) केलेली गुंतवणूक नेहमीच फायदेशीर असते

गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेले स्वतःचे तसेच आर्थिक उत्पादनाचे जोखीम व्यवस्थापन करून घ्या.

आपत्कालीन निधी, स्वत: चा पुरेसा जीवन विमा आणि स्वत: व कुटुंबातील सदस्यांसाठी पुरेसा आरोग्य विमा या तीन गोष्टी गुंतवणुकीपूर्वी करून घ्या .

क्रेडिट कार्डचा अतिरिक्त वापर करू नका आणि दरमहा आलेल्या बिलाच्या रकमेमधून पूर्ण रक्कम फेडण्यावर भर द्या

गुंतवणूकीत स्वयं शिस्त तसेच सातत्य राखा .

शेअर बाजाराच्या अल्प मुदतीच्या चढ-उतारांबद्दल अति भीती बाळगू नका .

या अल्प मुदतीच्या चढउतारांच्या आधारावर घाईने निर्णय घेऊन गुंतवणूक करणे थांबवल्यास दीर्घकाळात मिळणाऱ्या कंपाऊंडिंग फॅक्टरच्या फायद्यापासून आपण वंचित राहू शकतात

अति लोभ आणि अति भीतीमुळे भारतीय सर्वसामान्य गुंतवणूकदार दीर्घकाळात कमाऊ शकणारा पैसा गमावतात आणि गुंतवणूकीद्वारे कधीही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करु शकत नाहीत.

त्यामुळे अति लोभ आणि अति भीती या मानवीय भावनांना गुंतवणुकीच्या संदर्भात वरचढ होऊ देऊ नका.

यासंबधी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रदीप जोशी :- 9422429103

अत्यंत सोपी सुविधा
अनेकदा आपल्यापैकी बहुतेकांना लहान मोठ्या रकमेची नितांत गरज भासते.

आपल्याकडे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ठेवलेले पैसे उपलब्धही असतात पण बँकेला दिलेल्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन प्रमाणे त्याची गुंतवणूक ही एस आय पी मधून म्युच्युअल फंडामध्ये होणारी असते व ही रक्कम वापरणे आपल्यालाच गैरसोयीचे होते.

कारण अशी रक्कम वापरताना आपली स्टॅंडिंग इन्स्ट्रक्शन फेल गेल्यास आपल्याला आपलीच बँक दंड लावते .

तसेच म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक बंद झाल्यास आपल्याला भविष्यात होणारा फायदा आणि आपली आर्थिक उद्दिष्टे गाठणे कठीण होऊ शकते.

म्हणून वोल्ट मनी या प्लॅटफॉर्म द्वारे एक अत्यंत सोपी सुविधा आपल्याला प्राप्त होत आहे त्याची माहिती या ठिकाणी मी थोडक्यात देत आहे.

आपल्याच एम एफ मधील गुंतविलेल्या शिल्लक रकमेवर वोल्ट मनी द्वारे आपल्याला साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटात आवश्यक असणारी रक्कम प्राप्त होण्याची ही सुविधा आहे.

या प्लॅटफॉर्मवर एकदा नोंदणी केल्यानंतर पुन्हा कोणतीही नोंदणी करावी लागत नाही आणि अक्षरशः पंधरा मिनिटात आपल्याला पाहिजे ती रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होऊन आपली तत्कालीन आत्यंतिक आर्थिक गरज भागवली जाऊ शकते !!

ही ओव्हरड्राफ्ट प्रकारची सुविधा असल्याने आपण जितके दिवस पैसे वापरू तितक्याच दिवसांचे आपल्याला व्याज द्यावे लागेल.

तसेच म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक रीडीम न केल्याने आपला होणारा भविष्यातील तोटा टाळला जाऊ शकतो! या ओव्हरड्रॉफ्टवर लागणारे व्याज हे साधारणपणे दहा टक्के प्रति वर्ष याप्रमाणे असेल!

आपल्याला किती रक्कम मिळू शकते ? हे समजण्यासाठी केवळ आपला मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड क्रमांक आम्हाला कळवल्यास आम्ही फक्त दीड ते दोन मिनिटांमध्ये या सुविधेद्वारे उपलब्ध होणारी रक्कम आपल्याला कळवू शकतो !

पूर्णतः पेपरलेस अशी ही सुविधा आहे ! नोंदणी करताना प्रथम फक्त बँक डिटेल व केवायसी डिटेल्स व्हेरिफाय केली जातात आणि आवश्यक ती रक्कम साधारणपणे एक तासाभरात आपल्या बँक खात्यात जमा होऊ शकते !! सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यासाठी आपले म्युच्युअल फंडचे खाते कोणत्याही संस्थेकडे असले तरी चालते !

हे सर्व प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपाची असल्याने कोठेही प्रत्यक्ष हजर राहून डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक नसते!!

ही सुविधा उपलब्ध करून घेतल्यावर तिचा वापर केलाच पाहिजे असे बंधन नाही त्यामुळे सुविधा उपलब्ध आहे म्हणून काही रक्कम दरमहा दरवर्षी आपल्याकडून आपोआप वळती होईल असेही नाही!

सणासुदीला करावी लागणारी खरेदी , अचानक प्रवास करावा लागल्यास त्यासाठी आवश्यक असलेली लिक्विडिटी , अचानक उद्भवलेले आजारपण किंवा अन्य तत्सम कारणे यासाठी कुठून तरी भरमसाठ व्याजाने पैसे घेण्यासाठी लागणारी पळापळ यामुळे आता करावी लागणार नाही !

तसेच सर्व प्रक्रिया खात्रीशीर असल्याने यामधून कोणताही गैरव्यवहार होण्याची शक्यता नाही !! या सर्व बाबींची खात्री करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या कार्यालयाशी केव्हाही संपर्क साधू शकता !

धन्यवाद !

9422429103

महिंद्रा मनुलाइफ फोकस्ड फंड
महिंद्रा मनुलाइफ फोकस्ड फंडाला १९ नोव्हेंबर रोजी तीन वर्षे पूर्ण होत असल्याने या फंडाची दखल घेणे उचित ठरते.

मागील तीन वर्षांचा विचार केल्यास हा फंड सातत्याने ‘टॉप’ किंवा ‘अपर मिडल क्वारटाइल’ मध्ये राहिला आहे. या फंडात १९ नोव्हेंबर २०२० मध्ये गुंतविलेल्या १ लाखाचे १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार १,९०,३९६ (वार्षिक लाभ २४.०४ टक्के) झाले होते आणि १९ नोव्हेंबर २०२० रोजी पाच हजार रुपयांची ‘एसआयपी’ सुरू केलेल्या १,०८,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार २,३६,७३४ झाले (वार्षिक लाभ १८.६६ टक्के) आहेत.

मॉर्निंगस्टार एखाद्या फंडाला तीन वर्षांनंतर ‘स्टार रेटिंग’ बहाल करते. फंडाच्या चमकदार कामगिरीमुळे या फंडाला चार तारांकित (‘फोर स्टार’) किंवा पंचतारांकित (‘फाइव्ह स्टार रेटिंग’) मिळण्याची शक्यता आहे. या फंडाला जर ‘फोर स्टार’ किंवा ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ मिळाले तर पदार्पणात ‘फोर स्टार’ किंवा ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ मिळविणाऱ्या १५ टक्के फंडात या फंडाची गणना होईल. पदार्पणात ‘फोर स्टार’ किंवा ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ मिळविणे म्हणजे पदार्पण केलेल्या कसोटी सामन्यात शतक झळकवण्यासारखे आहे.

या फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ८७९.०५ कोटी रुपये आहे. रेग्युलर प्लानचा व्यवस्थापकीय खर्च २.२ टक्के असून फंडाचा मानदंड (बेंचमार्क ) ‘निफ्टी ५०० टीआरआय’ आहे. या फंडाचे कृष्णा संघवी हे मुख्य निधी व्यवस्थापक तर फातिमा पाचा या सहनिधी व्यवस्थापिका आहेत. काही गुंतवणूकदारांचा (यूट्यूब पाहून गुंतवणूक करणाऱ्या) असा गैरसमज आहे की, फोकस्ड फंड हे थीमॅटिक किंवा सेक्टर फंड्सइतकेच धोकादायक असतात. परंतु महिंद्रा मनुलाइफ फोकस्ड फंडाने १३ उद्योग क्षेत्रात गुंतवणूक केल्याने, जोखीम कमी केली आहे. तथापि, अधिक वैविध्यपूर्ण फंडांच्या तुलनेत फोकस्ड फंडांमध्ये कंपन्यांच्या ध्रुवीकरणाचा धोका किंचित जास्त असतो. महिंद्रा मनुलाइफ फोकस्ड फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ३० कंपन्यांचा समावेश आहे. आघाडीच्या ५ उद्योगक्षेत्रातील गुंतवणूक ४५ टक्के आहे. आघाडीच्या ५ कंपन्यांतील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या ३५ टक्के आहे. या फंडाची शिफारस करण्यामागे फंडाच्या कामगिरीतील सातत्य हे कारण आहे. ‘पॉइंट टू पॉइंट’ किंवा ‘ट्रेलिंग रिटर्न’ अनकेदा दिशाभूल करणारे असू शकतात, विशेषतः सध्याची बाजार परिस्थिती फंड व्यवस्थापकाला अनुकूल आहे.

एसआयपी कुणी करावी?
एसआयपी कुणी करावी?

प्रथमच शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी एसआयपी आवर्जून करावी. त्याचप्रमाणे वेतनधारक, नोकरदार किंवा ज्यांचे उत्पन्न ठराविक तारखेला येणारे आहे, अशांनीही एसआयपी करावी. दीर्घकाळ नियमित गुंतवणुकीची सवय स्वतःला लावून घेण्यासाठी एसआयपी करावी.

इतके महत्त्व का वाढले?

शेअर बाजारात डिमॅट खात्यांची संख्या वाढण्यास करोनासंसर्ग आणि लॉकडाउन कारणीभूत ठरले. लॉकडाउन किंवा ‘वर्क फ्रॉम होम’च्या काळात लोकांचा वेळ वाचू लागला. या वेळेचा सदुपयोग अनेकांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी किंवा शेअर बाजार शिकण्यासाठी केला. यामुळे म्युच्युअल फंडांकडे ओढा वाढला. साहजिकच हा ओघ एसआयपीच्या माध्यमातून वाढू लागला. यावर्षी एप्रिल ते जुलै या काळात ६.८० कोटी एसआयपी खाती झाली असून याद्वारे ५८ हजार ४५६ कोटी रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडांत आली. व्यापक स्तरावर विचार करता काही तोटे असले, तरी दीर्घकाळ गुंतवणूक करण्यासाठी चिंतामुक्त पर्याय म्हणून एसआयपीकडे पाहता येते. अर्थात, असे करण्यापूर्वी आपण जो म्युच्युअल फंड निवडणार आहोत, त्याची माहिती घेण्यास विसरू नये.

फायदे कोणते?

सर्वांत मोठा फायदा म्हणजे रोज चढउताराचा मागोवा घेत बसावे लागत नाही. दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फंड गुंतवत राहतो. त्यामुळे बाजारातील चढउतारांची चिंता वहावी लागत नाही. एसआयपीमुळे नियमित गुंतवणुकीची सवय लागते. खर्चण्यायोग्य पैशांच्या (डिस्पोझेबल इन्कम) गुंतवणुकीसाठी एसआयपी उपयोगी पडते. नियमित तारखेला बँक खात्यातून रक्कम गुंतवण्याची व्यवस्था करता येते. किमान ५०० रुपयांपासून सुरुवात करता येत असल्याने ऐपतीनुसार दरमहा गुंतवणुकीची रक्कम निश्चित करता येते. होते. यास्तव एसआयपी ‘कॉस्ट इफेक्टिव्ह’ ठरते. कारण चलनवाढीसारख्या आर्थिक घडामोडींचा यावर परिणाम होत नाही. याखेरीज, एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडाकडे दिली जाणारी रक्कम अप्रत्यक्षरित्या विविध क्षेत्रांतील कंपन्यांत गुंतवली जाते.

ही गुंतवणूक फंडाने केलेल्या अभ्यासानुसार होत असल्यामुळे याचे व्यवस्थापन काटेकोर होते. याचा दीर्घकालीन लाभ नक्की मिळतो.